श्रीखंड Pie

Submitted by स्वाती_आंबोळे on 6 December, 2021 - 11:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

१४ औंसांचा स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्कचा कॅन
अर्धा कप होल फॅट प्लेन ग्रीक योगर्ट
एक तृतियांश कप लिंबूरस
८ ईंची तयार ग्रॅहॅम क्रॅकर Pie क्रस्ट
आवडीनुसार सुका मेवा, वेलची, केशर, जायफळ इ.

क्रमवार पाककृती: 

ओव्हन ३५० डिग्री फॅरनहाइटला प्रीहीट करत ठेवा.
मिक्सिंग बोलमध्ये कन्डेन्स्ड मिल्क, योगर्ट आणि लिंबाचा रस फेटून छान एकजीव करा.
त्यात वेलचीपूड, केशर, सुक्यामेव्याची पूड (मिल्क मसाला) आवडीप्रमाणे मिसळा.
Pie क्रस्टमध्ये हे मिश्रण ओतून १० मिनिटं ३५० डिग्रीजना बेक करा.
ओव्हन बंद करा, पण आणखी अर्धा तास Pie आतच राहू दे.
अर्ध्या तासाने Pie बाहेर काढून निवू द्या.
रात्रभर (किमान पाच-सहा तास) फ्रीजमध्ये ठेवून सेट होऊ द्या.
खाताना माझी आठवण काढा. Proud

वाढणी/प्रमाण: 
आठ मोठे किंवा बारा बेताच्या आकाराचे पीस
अधिक टिपा: 

लिंबूरस इतका लागतो - Pie आंबट होत नाही.
'कप' म्हणजे मेजरिंग कप. Happy
'मिनि' Pie क्रस्ट्स वापरून सिंगल सर्व्ह व्हर्जन करू शकता - तशी करताना बेकिंगचा वेळ कमी (पाच ते सहा मिनिटं इतकाच) करायचा - बाकी कृती तशीच.
ही माझी रेसिपी अर्थातच नाही, मी खाली स्त्रोत नमूद केला आहे, तिथल्या सूचनांप्रमाणे (शेवटचे व्हिपिंग क्रीम वगैरे लाड वगळून Proud ) तंतोतंत केली.
इतकी सोपी आणि इतकी चवदार रेसिपी शेअर केल्यावाचून राहावलं नाही.
पॉटलकला वगैरे न्यायला परफेक्ट पदार्थ आहे - यात अंडी नसल्यामुळे शाकाहारी व्यक्तींनाही आस्वाद घेता येईल.

फोटो छान आलेला नाहीये याची धागाकर्तीला कल्पना आहे, कधी एकदा खाऊन बघते असं झाल्यामुळे घाईत काढला गेला आहे. Proud

माहितीचा स्रोत: 
https://www.instagram.com/reel/CVxu4byg0-a/?utm_medium=copy_link
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे..
इंस्टाग्राम अकाउंट चे नाव काय?

लिंबामुळे प्रोटीन्स कोअ‍ॅग्युलेट होऊन पाय सेट होतो - आणि गोडाला बॅलन्सही होतो. (असं रेसिपीच्या जनक नेहा यांनी सांगितलं. Happy )

वा मस्त आहे.
मी परवा गुलाबजाम केक केला होता. रेसिपी लिहितो. Happy

वेगळी रेसिपी!
Pie शब्दासाठी प्रत्येकवेळी आवर्जून रोमन लिपी वापरल्याबद्दल धन्यवाद!! Happy वाचकालाच संदर्भाने तुम्हीच समजून घ्या म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे टाकले नाही हे खूप आवडलं.

जे जोक्स मारायचा मलाच मोह झाला असता ते कोणालाच मारता येऊ नयेत म्हणून ती दक्षता घेतली आहे. Proud

तेव्हा करून आण. >>> हो चालेल Happy (त्या "चहासाठी आलं पाहिजे" वर "हो नक्कीच येणार" - मीम ची नवीन व्हर्जन काढायला हवी Happy )

बाय द वे, "स्वीटण्ड" कण्डेन्स्ड मिल्क आहे - तितकी साखर पुरते की वरून घातली अजून?

खूपच आवडली, एकतर सुटसुटीत सेमी होममेड आणि इम्प्रेसीव्ह. थँक्यू Happy
एक pie नाचव रे श्रीखंडा Wink , अशी प्रसिद्ध होणारे ही पाककृती. मी मोह आवरला नाही.

Lol बस्स्स अस्मिता, आता तुझं फक्त पॉटलकात केबलनिट स्वेटर घालून 'pie लिया हो हो हो' नाचायचं बाकी राहिलं ... असो, पीजे साठी हा धागा ऋन्मेषचा नाही हे जाणून इथून काढता pie घेते.

स्वाती, रेसिपी छान आहे. नक्की करून बघणार.
इथे पाय क्रस्ट मिळेल कि नाही माहिती नाही पण मग डायजेस्टिव्ह बिस्कीट वापरून क्रस्ट बनविता येईल.
नक्की ट्राय करीन.
धन्यवाद

असं रेसिपीच्या जनक नेहा यांनी सांगितलं >> रेसिपीच्या जननी असं वाचून घेतलं. Wink

रेसिपी आणि फोटो बघून तों पा सु. आ क ब.

मी काजू, पिस्ते, बदामाची पूड, वेलची आणि केशर असं (घरात थोडं थोडं होतंच म्हणून) एकत्र दळून घातलं होतं.
पण ते घटकपदार्थ अर्थातच ऐच्छिक आहेत. त्यात चारोळ्या, जायफळ इ.इ.देखील अ‍ॅड करता येईल.
एकूण ज्या स्वादाचं श्रीखंड तुम्हाला आवडत असेल ते (आणि तेवढेच) फ्लेवर्स घातले की झालं. Happy

Pages