Submitted by सुर्या--- on 19 November, 2021 - 06:28
मायबोलीकरांनो सर्वांनाच एव्हाना अनुभव आलाच असेल. वाद विवाद करणारे आणि त्यासाठी निमित्त शोधणारे. चला तर तुमची हिम्मत दाखवुन इथे अश्या लोकांना उघड करा. कदाचित वेमा हा धागाच उडवेल. कारण वादग्रस्त विषयाला हात घातल्यावर बऱ्याच जणांचे धागे दणाणणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जे कुणी वाद घालतात तो त्यांचा
बिनडोक धागा
मला आवडते वैचारीक वाद घालायला
मला आवडते वैचारीक वाद घालायला. मनोरंजन होते. बुद्धीचा व्यायाम होतो. अश्या उदात्त कारणांमुळे वाद घालत असल्याने कोणावर वैयक्तिक आकस ठेवत नाही, वा कोणाच्या भावना दुखावायला जात नाही. कोणी ईरीटेट होत असेलही, पण तो माझा नाईलाज आहे. स्वतःहून कोणाची कळ काढायला जात नाही. तर माझे प्रॅक्टीकल आणि प्रामाणिक विचार मांडतो. त्यावर ठाम राहतो. ते कोणाला पटले नाही तर लोकं येतातच चर्चा करायला. कोणी माझ्याशी वाद घालून थकला आणि ब्रेक घेतला तर त्याला जाऊ देतो. उगाच विषय ताणत नाही. बहुतेक वेळा पुन्हा कधीतरी ते फिरून येतातच. शेवटी दुनिया गोल आहे. आणि माबोवरचा प्रत्येक विषय खोल आहे
१. कोण ? : तुम्ही - आम्ही.
१. कोण ? : तुम्ही - आम्ही.
२. का? : Somebody is wrong on the internet!
एक दोन तीन करा सुरू.
एक दोन तीन करा सुरू.
माझं माबोवर येणं कमी झाल्याने
अलाईनमेंट गंडल्यामुळे पोस्ट खुप वेळा संपादित केली. परत वाचली नाही तरी चालेल.
माझं माबोवर येणं कमी झाल्याने पहिल्या -दुसऱ्या पानावर असेल तेवढंच वाचुन निघुन जाते, त्यामुळे बरंच काही निरीक्षणातुन सुटलं आहे. पण पटकन आठवेल असे काही आयडीज.
आयडी आणि त्यांचे हमखास वादाचा विषय
नेहमी चाललेल्या विषयाला विनोदी वळणाने काँट्रॅडीक्ट करणार.
DJ - कट्टर ब्राह्मणविरोधी - यासाठी निमित्त लागत नाही
भरत - अँटी BJP
अरारा - quack दिसले की सोलुन काढणार
आशुचॅम्प - ऋन्मेषची ऍलर्जी
अमा - नॉनसेन्स इग्नोर करणार नाहीत. समजेल न समजेल असा चिमकुटा नक्की काढणार
जिज्ञासा - पर्यावरणहानी करणारा विचार / कृती करेक्ट करणार. मग त्यासाठी योग्य तो वाद घालणार
जामोप्या / ब्लॅककॅट - अँटी हिंदु
बोकलत - एक विषय नाहीच
परिचित - धागा काढतात तो वादाचा विषयच असतो. साधे सरळ विषय नाहीच.
ऋन्मेष - शाहरुख खानची प्रत्येक धाग्यावरील उपस्थिती आणि धाग्यांचा पुर
हुश्श.. शेवटी का होईना माझे
हुश्श.. शेवटी का होईना माझे नाव आले...
तरीही हे माझ्यासाठी लांच्छनास्पद आहे की वाद घालणार्या आयडी आठवताना माझे नाव ईतक्या उशीरा आठवावे.
पण मी याने निराश न होता, हे सकारात्मक घेणार
आणि दुप्पट जोमाने कामाला लागणार
अब सैsलाब आयेगा मदन चोपरा....
उशिरा नाही आहे ते
उशिरा नाही आहे ते
आणि काशीनाथ घाणेकर
तसे आहे ते
आणि ... रूनमेश
मीरा , मला फक्त अँटी बीजेपी
मीरा , मला फक्त अँटी बीजेपी आणि फक्त अँटी काहीतरी म्हणून गुंडाळल्याबद्दल निषेध.
अँटी हिंदू म्हणे
अँटी हिंदू म्हणे
समीर दाऊद वानखेडेच्या विरोधात लिहूनपण ?
मी तर मोदींच्या चमत्कारांचं
मी तर मोदींच्या चमत्कारांचं कौतुक करणारा धागा काढला. त्यांना कसला तरी पुरस्कार मिळाला, त्यावर धागा काढला. (तो पुरस्कार परत कोणालाच मिळाला नाही )
तरी मी अँटी भाजप
वाद व्हायला हरकत नाही कारण
वाद व्हायला हरकत नाही कारण निदान त्यातुन दोन्ही भल्या बुर्या बाजू समजतात. पण एखादा प्रामाणीक पणे त्याची चुक कबुल करत असेल तरी मागचे मुद्दे व चुका वारंव्वार उगाळुन त्याला / तिला ट्रोल केले जाते. वाद व मूळ मुद्दा राहतो बाजूलाच.
विट्ठलपंत कुलकर्णी,
विट्ठलपंत कुलकर्णी, गोदावरीबाई कुलकर्णी यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांप्रती माझ्या इतका संताप इतर कोणा आयडीने व्यक्त केला नसावा.
निवृत्ती कुलकर्णी, सोपान कुलकर्णी, मुक्ता कुलकर्णी, ज्ञानेश्वर कुलकर्णी या चार भावंडांच्या हाल-अपेष्टा करणार्या समाजाविरुद्ध पोटतिडकीने माझ्या इतकं कोणीही लिहिलं नसेल.
कावेरीबाई अनाजीपंत सुरनीस यांना सदैव त्रास देणार्या नीच पतीबद्दल अन त्याच्या विखारी विचारधारेबद्दल तर मी कायम आवाज उठवत असतो.
दाभोळकर यांच्या विचारांना मारु न शकलेल्यांना आजही मी त्यांची लायकी दाखवून देत असतो.
हे सर्व कोण होते...? मी कधीही कोणाची ज्ञाती काढत नाही किंवा विचारातही घेत नाही. चूक ते चूक अन बरोबर ते बरोबर या तत्वाने मी लिखाण करतो. तरिही मी एका ठराविक ज्ञातीविरोधात लिहितो अन त्यासाठी कारणही लागत नाही हा आरोप माझ्यावर वैनींनी केला असता तर मी एकवेळ समजू शकलो असतो परंतू मीरा.. ताईंना साधीभोळी समजण्यात मी चूक तर केली नाही ना अशी आता मला शंका येऊ लागली आहे.
चला तर तुमची हिम्मत दाखवुन
चला तर तुमची हिम्मत दाखवुन इथे अश्या लोकांना उघड करा.
>>
काय बोलायचं आता!!
म्हणजे नक्की कुणाचं नाव लिहिलं की तुमच्या आत्म्याला शांती मिळेल?
सदरील पोस्ट वाचून माझं आकलन एवढंच की कोणाशी तरी पर्सनल स्कोअर सेटल करायचा आहे, परंतु धागा लेखकाची स्वतःची हिम्मत होत नाहीये म्हणून तो इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारायचा प्रयत्न करतोय.
ऑ मला रु ची ऍलर्जी नाहीये हो,
ऑ मला रु ची ऍलर्जी नाहीये हो, मी फक्त त्याचा सततच्या मी मी, नी मला मला आणि ते अजीर्ण होईल इतकं शाखा याला वैतागलो आहे
आणि माझ्यासारखेच अनेक जण असणारेत फक्त मी बोलून दाखवतो, सगळे दाखवतीलच असे नाही
माझं नाव पण आहे
माझं नाव पण आहे
विट्ठलपंत कुलकर्णी,
विट्ठलपंत कुलकर्णी, गोदावरीबाई कुलकर्णी यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांप्रती माझ्या इतका संताप इतर कोणा आयडीने व्यक्त केला नसावा.
निवृत्ती कुलकर्णी, सोपान कुलकर्णी, मुक्ता कुलकर्णी, ज्ञानेश्वर कुलकर्णी या चार भावंडांच्या हाल-अपेष्टा करणार्या समाजाविरुद्ध पोटतिडकीने माझ्या इतकं कोणीही लिहिलं नसेल.
कावेरीबाई अनाजीपंत सुरनीस यांना सदैव त्रास देणार्या नीच पतीबद्दल अन त्याच्या विखारी विचारधारेबद्दल तर मी कायम आवाज उठवत असतो.
दाभोळकर यांच्या विचारांना मारु न शकलेल्यांना आजही मी त्यांची लायकी दाखवून देत असतो.
हे सर्व कोण होते...? मी कधीही कोणाची ज्ञाती काढत नाही किंवा विचारातही घेत नाही. चूक ते चूक अन बरोबर ते बरोबर या तत्वाने मी लिखाण करतो. तरिही मी एका ठराविक ज्ञातीविरोधात लिहितो अन त्यासाठी कारणही लागत नाही हा आरोप माझ्यावर वैनींनी केला असता तर मी एकवेळ समजू शकलो असतो परंतू मीरा.. ताईंना साधीभोळी समजण्यात मी चूक तर केली नाही ना अशी आता मला शंका येऊ लागली आहे.>>>>>>.
डिजे. जेव्हा आपल्याच कुटुंबाचा एखादा सदस्य दुसर्यावर जेव्हा अन्याय करुन आपल्या अख्ख्या कुटुंबाची व इतरांची मान खाली घलायला लावतो, तेव्हाची शर्मनाक स्थिती वेगळीच असते. त्या काळातल्या अक्षम्य चूका आज ही आमच्या सारख्यांना अस्वस्थ करतात. पण म्हणून वारंवार अनाजी अनाजी असे ढोल बडवुन तुम्ही काय साध्य करत आहात माहीत नाही. सारवा सारव करतांना म्हणता की अनाजी सारखी प्रवृत्ती. पण दुसरीकडे वाहत्या धाग्यावर किंवा इतर ठिकाणी जानवे वगैरेचा उल्लेख करायचा. हे काय दर्शवते?
हे वरील लोक नीच , नालायक, माणुसकीहीन आणी सत्तांध होते. पण मला एकच विचारायचे आहे की फक्त नी फक्त ब्राह्मणांनीच अन्याय केला , बाकीच्यांनी नाही हे खरे आहे का ? छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ सोडला तर दलितांवर अन्याय करणारे नुसते ब्राह्मणच नव्हते तर क्षत्रिय सुद्धा होते, ज्यांना आजच्या काळात मराठा म्हणले जाते. हे तुम्ही मान्य करु शकता का? आजही खेड्या पाड्यात जातीभेद पाळणारे ब्राह्मणांबरोबर मराठा सुद्धा आहेत हे तुम्ही मान्य करु शकता का? मी उदाहरणे जवळुन बघीतलीत आणी त्याला दोन्ही समाज जबादार आहे.
आज इतकेच, धागा राहीला तर सोमवारी लिहीन. उद्या नी परवा मला वेळ नाही.
मीरा यांना त्यांची लिस्ट
मीरा यांना त्यांची लिस्ट अपडेट करायची संधी याच धाग्यावर मिळते आहे. पाहू करतात का.
भरत
भरत

मीरा यांना त्यांची लिस्ट
मीरा यांना त्यांची लिस्ट अपडेट करायची संधी याच धाग्यावर मिळते आहे. पाहू करतात का.>>
सार्वजनिक संकेत स्थळावर सर्व
सार्वजनिक संकेत स्थळावर सर्व प्रकार ची लोक असतात.
सर्वच त्यांच्या जागेवर योग्य असतात.
मतभेद कुटुंबात असतात तर इथे कोण कुठले मतभेद असणार च.
शिवी गाळ दमदाटी, हे मात्र स्वीकारता येणार नाही
बाकी आपल्या मता शी विपरीत मत व्यक्त करणारे वाईट व्यक्ती नक्कीच नाहीत.
फक्त कॉमेंट ची संख्या वाढावी म्हणून इथे कोणी जास्त कॉमेंट करू नये नाही तर दुसरा ऋनमेष चा जन्म माय बोली वर होईल.
मग घ्या सहन करून.
Dj ह्यांच्या कॉमेंट मी वाचतो
Dj ह्यांच्या कॉमेंट मी वाचतो च वाचतो.ते ब्राह्मण जाती वर टीका करत नाहीत त्या वृत्ती वर टीका करतात.
ब्राह्मण कसे समजतात आम्ही च श्रेष्ठ बाकी सर्व जाती शूद्र.
ही ब्राह्मणी वृती इथे काही आयडी मध्ये आहे ते हिंदुत्व ची चादर घेवून ब्राह्मणी पना दाखवतात.
त्यांचा विरोध dj अतिशय योग्य पने करतात.
भरत, अहो अजुन 2 तास आहेत
भरत, अहो अजुन 2 तास आहेत संपादन करायला, पण नाहीच करणार आहे.
मी माबो उघडल्यावर असा सनसनाटी विषय दिसला आणि प्रतिसाद शून्य होते, म्हटलं धाग्याला जरा धक्का देऊ.
बाकी तुमच्यावर पॉझिटिव्ह लिहायचं तर मी 2 पानी निबंध लिहु शकते. पण धाग्याच्या विषयाला धरून लिहिताना 2 शब्दातच लिहिता आलं. वाईट वाटुन नका घेऊ.
DJ, अय्या, तुम्ही मला साधीभोळी समजत होतात. नाहीए मी. पण तरीही थँक्स ! तुमच्या ब्राह्मणविरोधी असण्याबद्दल मी तुम्हाला आधीही एकदा टोकलं होतं. कारण एकच की तुम्ही सगळ्या पोस्ट्स ईथुनतिथुन त्या विषयावर येतातच. प्लिज नाकबुल नका करू. सगळेजण तुम्हाला हेच सांगतील. आणि तुम्ही इतर विषयावर छान गप्पा मारता म्हणुन या विषयावर घसरलात की मला आश्चर्यपूर्ण खेद वाटतो. आणि जाता जाता हे पण सांगुन जाते की तुम्ही रश्मीशी वाद घातलेत तरी तिला वहिनी म्हणता ते मला फार आब राखुन वाटतं. किंवा तुमच्या पोस्टस पण फार शिवराळ नसतात. ( माझ्या वाचण्यात तरी नाही आल्या)
मीरा, मीपण धाग्याला धक्काच
मीरा, मीपण धाग्याला धक्काच देतोय.
नाही तर दुसरा ऋनमेष चा जन्म
नाही तर दुसरा ऋनमेष चा जन्म माय बोली वर होईल.
>>>>
असंभव
असंभव
असंभव
आणि असे झालेच तर मी मायबोली सोडून जाईन
जिथे आपले वेगळेपण नाही तिथे राहू नये असे आज्जी म्हणायची
म्हटलं धाग्याला जरा धक्का देऊ
म्हटलं धाग्याला जरा धक्का देऊ.
मीपण धाग्याला धक्काच देतोय.
>>>>
तुम करे तो धक्का
हम करे तो हायजॅक
थोडा कंटेक्सट सेट करण्यासाठी
थोडा कंटेक्सट सेट करण्यासाठी हा धागा वाचवा
https://www.maayboli.com/node/80520
हेमंत यांच्यावर स्कोर सेटल करण्यासाठी हा धागा आहे.
वैनींनी आज परत कोणता अध्यायायचे पारायण केले?
थोडा कंटेक्सट सेट करण्यासाठी
थोडा कंटेक्सट सेट करण्यासाठी हा धागा वाचवा
https://www.maayboli.com/node/80520
हेमंत यांच्यावर स्कोर सेटल करण्यासाठी हा धागा आहे.>>
अरे बापरे.. हे प्रकरण आहे होय..? मी तर पाहिलाही नव्हता तो धागा.. त्या धाग्यावर मी एक टिंबसुद्धा प्रतिक्रिया दिलेली नसताना माझं नाव वाद घालणार्या लिस्ट मधे पहिलं तेही मी करत नसलेल्या उठाठेवींबद्दल..!! खर्याची दुनव्या नाय र्हाईली रे बाबा....... खाया पिया कुछ नही अन गिलास तोडा बारा आना.....!!!!!
इच्छुकांनी लाभ घ्यावा
इच्छुकांनी लाभ घ्यावा
अच्छा असे आहे होय. बरे झाले
अच्छा असे आहे होय. बरे झाले झम्पुजी खुलासा केलात. आता चर्चा योग्य ट्रॅकवर येईल. उगाच संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.
माझ्या यादीत धागाकर्त्याचे
माझ्या यादीत धागाकर्त्याचे नाव टॉपला टाकायला हवं? आणि जिज्ञासाचे नाव डिलीट करायला हवं. कारण त्या आग्रहाला वाद म्हणू शकत नाही.
DJ, यापुढे तुमच्या हातुन ग्लास फुटला आणि मला आवाज आला की मी काचा गोळा करायला येत जाईन.
Pages