1 जुडी पालकची पाने, शेंगदाणे ½ वाटी अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवणे, लसूण 4 ते 5 पाकळ्या, कांदा 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून, 5-6 कढीपत्त्याची पाने, हळद ¼ चमचा, राई ¼ चमचा, मालवणी मसाला 1 ते दीड चमचा, तेल 2 चमचे, मीठ चवीनुसार
पालकची पाने बारीक चिरून घेणे. भिजवलेले शेंगदाणे व चिरलेला पालक थोडे पाणी व अर्धा चमचा मीठ टाकून कूकरला 2 शिट्ट्या काढून शिजवून घेणे.
वाटणासाठी – ¼ वाटी ओल खोबर, ¼ वाटी सुक खोबर किसलेले, 2 मोठे कांदे, 3 ते 4 पाकळ्या लसूण – हे सर्व साहित्य पॅन वर भाजून त्याचे वाटण करून घेणे.
कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यात 3-4 लसूण च्या पाकळ्या ठेचून घालाव्या. लसूण परतल्यावर त्यात राई, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पाने, हळद व मसाला घालून परतून घ्यावे. त्यात वाफवून घेतलेले पालक व शेंगदाणे घालावेत. नंतर त्यात तयार केलेले वाटण व आवश्यकतेनुसार पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. (आपण पालक शिजवताना थोड मीठ टाकलेले असल्याने नंतर मीठ कमी घालावे). छान उकळी आली की पालक शेंगदाण्याची आमटी तयार.
मालवणी मसाला नसल्यास 1 चमचा लाल तिखट व ¼ चमचा गरम मसाला टाकणे.
छान आहे रेसीपी
छान आहे रेसीपी
अळूच्या फतफत्याचेच मटेरियल
अळूच्या फतफत्याचेच मटेरियल आहे
छान आहे हीपण पाककृती!
छान आहे हीपण पाककृती!
मस्त.करून पाहीन.
मस्त.करून पाहीन.
छान वाटतेय, करून बघीन
छान वाटतेय, करून बघीन
छान. मालवणी मसाला मिळेल पण
छान. मालवणी मसाला मिळेल पण आणला तर तो वापरून इतरही काही पाककृती लिहा. वालाची उसळ सोडली तर मालवणी मसाला फार वापरला जात नाही. पडून राहतो.
(ते पोह्याच्या आप्पेचा फोटो पण मनावर घ्या हो.)
रेसेपी मस्त आहे. पब्लिक करता
रेसेपी मस्त आहे. पब्लिक करता आली तर उत्तम सध्या फक्त ग्रुप मेंबर करता आहे.
मस्त दिसतेय आमटी. नक्की करून
मस्त दिसतेय आमटी. नक्की करून बघणार.
सीमंतिनी- मालवणी मसाला माझ्या
सीमंतिनी- मालवणी मसाला माझ्या रोजच्या वापरातला आहे. भाजीत लाल तिखट व गरम मसाला टाकणार असाल तर त्याऐवजी मालवणी मसाला वापरू शकता.
पोहयाचे आप्पे मागच्या आठवड्यात बनवले होते पण गरम गरम खाऊन झाले सगळ्यांचे आणि फोटो नाही काढला. पुन्हा केले की फोटो टाकते.
mrunali.samad , धनुडी,
mrunali.samad , धनुडी, पार्वती - हो नक्की करून बघा भातासोबत छान लागते तसेच गरम गरम भाकरीसोबतही छान लागते.
स्वाती लाड मालवणी मसाल्याची
स्वाती लाड मालवणी मसाल्याची रेसिपी लिहाल का..आमच्या कोल्हापूर साईड ला बनवत नाहीत आणि वापरत पण नाहीत..
छान सोपी पाकृ. कांदा-लसूण
छान सोपी पाकृ. कांदा-लसूण वाटण आणि पुन्हा ईतर जिन्नस तळताना सुद्धा कांदा-लसूण असे केल्याने जास्त रुचकर भाजी होते का? प्रयोग करून पाहतो.