प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे यांच्या एका व्हिडिओचा हा सारांश आहे. सध्या १०/१२ वी ची मुले करिअरच्या दृष्टीने विविध कोर्सेसची माहिती घेत असतात. पण डॉ. बर्वे यांनी कोर्स शोधण्याआधी स्वत:ला शोधण्याच्या दिलेल्या या पायर्या
१) ज्ञान कसं साठवता ते शोधा.
Visual - पाहून लक्षात राहतं
Auditory - ऐकून लक्षात राहतं
Kinesthetic - कृतीतून लक्षात राहतं
२) काय चांगलं करता येतं ते शोधा
चांगलं गाता येणं, संगीत देता येणं,नृत्य करता येणं, सुसंवाद करता येणं असं जे उत्तम जमतं ते शोधून काढा.
३) कोर्स आणि करिअर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काय करायला मनापासून आवडतं ते म्हणजे करिअर.
४) मी कशाप्रकारचा व्यक्ती आहे?
मी अंतर्मुखी आहे की बोलका आहे? मला नवीन गोष्टींचं टेन्शन येतं की नाही येतं? मी लोकांमधे रममाण होणारा आहे की एकांतात बसून काम करणारा आहे? मी नवीन गोष्टी शिकायला तयार असतो की जुनी कौशल्येच वापरणं आवडतं? नवीन गोष्टी शिकत बसलो तर माझ्या कामाचा दर्जा बिघडत(हाय न्युरॉटिझम ट्रेट) मी नवीन ठिकाणी, नवीन परिस्थितीशी पटकन जुळवून घेऊ शकतो की ते मला जमत नाही? (अॅडाप्टिबिलिटी)
खूप महत्त्वाचे
जे काही तुमचं व्यक्तीमत्व आहे, त्याचे जे कंगोरे आहेत त्यात चूक की बरोबर हे अजिबात शोधू नका. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. करिअर हे असं सतत 'हे चूक की बरोबर' पैसे मिळवण्याच्या दृष्टीने किती फायदा आहे हे पाहून शोधू नये. तसे केल्याने आपल्याला आपल्या खर्या व्यक्तीमत्त्वाचा शोध लागत नाही.
मूळ व्हिडिओंचे दुवे
https://youtu.be/mreJIrBjfDs
16:18 पासून
https://youtu.be/ufgP20kkX4U
6:48 पर्यंत
------------------------------------------------------
आता यावर माझे प्रश्न
१) भारतासारख्या तुफान लोकसंख्येच्या आणि एखादा व्यक्ती पैसे किती मिळवतो याला महत्त्व असलेल्या देशात इतकं पिनपॉईंट करिअर घडवणं शक्य आहे का? ज्यातून फार पैसे मिळणार नाहीत असे करिअर निव्वळ आवडीपोटी निवडणे धोक्याचं नाहीये का?
२) व्हिडिओतला प्रेक्षकवर्ग बहुतेक उच्चशिक्षित आणि खाऊनपिऊन सुखी अशा पालकांची मुले असावीत. तसे असेल तर डॉक्टरांनी सांगितलेला मार्ग झोपडपट्टयांतल्या गरीब मुलांसाठी फारसा उपयोगाचा नसावा. त्यांना त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करावी लागत असल्याने ज्याचे चांगले पैसे मिळतात ते काम स्विकारणे हे करावे लागते. म्हणजे खर्या गरजू मुलांना या मार्गदर्शनाचा तितकासा उपयोग नसावा ना?
३) व्यक्तीमत्त्व फुलवणं याला डॉ.साहेबांनी इतकं महत्त्व का दिलं असावं?