मूगडाळ ½ किलो, बारीक किसलेला गूळ ½ किलो, तूप, वेलची पावडर, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, बेदाणे आवडीप्रमाणे
प्रथम मूगडाळ धूऊन चाळणीत निथळत ठेवावी. मूगडाळ एक ते दीड तास निथळल्यानंतर मिडियम गॅस वर 20 ते 25 मिनिटे भाजून घ्यावी. डाळीचा रंग गुलाबी होईपर्यंत एकसारखे परतत राहावे. डाळ भाजून थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक रव्यासारखे पीठ करून घ्यावे. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून हे पीठ चांगले भाजून घ्यावे. आवश्यकता वाटल्यास अजून 1 ते 2 चमचे तूप टाकावे. डाळीचे पीठ भाजून झाल्यावर थोड कोमट करावे. काजू, बदाम, पिस्त्याचे काप व चारोळी थोडे परतून घ्यावे. नंतर मूगडाळीच्या पिठात गूळ मिक्स करावे. गूळ एकसारखे मिक्स होण्याकरता एकदा मिक्सरला फिरवून घ्यावे. नंतर त्यात वेलची पावडर, बेदाणे, काजू, चारोळी, बदाम, पिस्त्याचे काप टाकून मिक्स करावे. लाडू वळण्यासाठी मिश्रणात 2 ते 3 चमचे तूप टाकून लाडू वळावेत.
मूगडाळ निथळल्यानंतर लगेच भाजावी वाळवण्याची गरज नाही. संध्याकाळी भुकेच्या वेळी खायला हे लाडू चांगले लागतात.
भारीच प्रकार आहे हा...!
भारीच प्रकार आहे हा...!
लाडू सुंदर दिसत आहेत.
लाडू सुंदर दिसत आहेत.
मला एक शंका आहे एकंदरीतच अशा तुपात भाजून केलेल्या लाडवांविषयी. ह्यात तुपावर भाजलेले कच्चे पिठच आपण खात असतो. म्हणजे न शिजलेले. तर ते पोटाला कसे काय चालते?
पाकातल्या लाडूबाबत म्हणायचं तर गरम पाकात घातल्यावर ते शिजतात आणि मग मऊ होतात तसं इथं होत नाही ना.
मूगडाळ पचायला तशी हलकीच असते.
मूगडाळ पचायला तशी हलकीच असते. ती भिजवून, निथळून, भाजल्यावर त्याची पूड करून पुन्हा तुपात खमंग भाजल्यामुळे त्यातील कच्चेपण संपत असावं अन ते पोटाला त्रासदायक होत नसावं असा माझा कयास.
डाळ भाजलीय की चांगली.
डाळ भाजलीय की चांगली.
पंढरपुरी डाळ्याचं कूट करून न भाजताच त्याचे लाडू करतात.
भरत. ते पंढरपुरी डाळ्याचे
भरत. ते पंढरपुरी डाळ्याचे लाडु कसे करतात सांगा ना प्लीज. दिवाळीच्या चिवड्यासाठी आईने मला ५० ग्रॅम पंढरपुरी डाळं आणायला सांगितलं अन मी चुकून ५०० ग्रॅम आणलं तुम्ही लाडु कसे बनवतात ते सांगितलं तर माझ्या नावाचा उद्धार थांबेल.
मी नाही करत. बघून सांगतो
मी नाही करत.
बघून सांगतो
सांगा सांगा..
सांगा सांगा..
मेधावि-मुगडाळ आधी आपण 20-25
मेधावि-मुगडाळ आधी आपण 20-25 मिनिटे मिडीयम गॅस वर भाजून घेतली. त्यानंतर मिक्सर मध्ये पीठ करून घेतल्यानंतर ते पुन्हा तुपावर भाजून घेतले. त्यामुळे लाडू छान खमंग लागतात. अजिबात कच्चे लागत नाहीत.
छान आहे हीपण पाककृती!
छान आहे हीपण पाककृती!
पापा मम्मी किचनच्या यूट्यूब चॅनलवर आहेत मूगडाळीचे लाडू. पण कृती जरा वेगळी आहे.
छान रेसिपी... फोटो पण मस्त..!
छान रेसिपी... फोटो पण मस्त..!
छानच दिसत आहेत लाड बाईंचे
छानच दिसत आहेत लाड बाईंचे लाडू. मायबोलीवर स्वागत. अजून रेसीपी येउद्या
ह्यात तुपावर भाजलेले कच्चे
ह्यात तुपावर भाजलेले कच्चे पिठच आपण खात असतो. म्हणजे न शिजलेले. तर ते पोटाला कसे काय चालते?>>>>> चणे शेंगदाणे भाजल्यावर खातात की सारे.भाजल्यामुळे शिजले जाते.
आमच्याकडे बारीक रव्याचेही विनापाकाचे लाडू करतात.तेही बाधत नाहीत.
छान आहे पाककृती..
छान आहे पाककृती..
आमच्याकडे बारीक रव्याचेही विनापाकाचे लाडू करतात. <<
मला हे लाडू खुप आवडतात पाकातल्या लाडवापेक्षा .
मला तर संध्याकाळीच काय कधीही
मला तर संध्याकाळीच काय कधीही खायला चालतील लाडू.
लाडू सुरेख दिसतायत. करून
लाडू सुरेख दिसतायत. करून बघायला हवे
बारीक रव्याचे पाकाशिवायचे
बारीक रव्याचे पाकाशिवायचे पांढरे शुभ्र लाडू दिसायला छान दिसतात.
बारीक रव्याचे विना पाकाचे
बारीक रव्याचे विना पाकाचे लाडू दिसायला शुभ्र पांढरे असे छान दिसतात.