शिंगाडे (उकडून) १०-१२
हिरव्या मिरच्या - २ (बारीक चिरून)
जीरे - १ चमचा
तूप - १ चमचा
'भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतीय लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत एक झटपट बनणारा छत्तीसगढी पदार्थ. तलावांचा प्रदेश म्हणून ओळख असलेलया भागात 'शिंगाडे' हे सहजासहजी उपलब्ध असतात. ही एक पाणवनस्पती आहे. पाने पाण्याच्या पृष्ठभागावर गोलाकारात पसरतात.
( स्रोत : इंटरनेट )
तर खाली मुळाशी हे टोकदार शिंगे असलेले फळ धरते. (शिंगे असतात म्हणून नाव शिंगाडे)
( स्रोत : इंटरनेट )
तर पाककृती एकदम सोपी आहे.
उकडलेले शिंगाडे सोलून घ्यावेत
त्यांचे पातळ काप करून घ्यावेत.
पॅन मध्ये तूप गरम करून जिरे घालावे.
जिरे तडतडले की बारीक चिरलेलया हिरव्या मिरच्या घालाव्या
शिंगाड्याचे काप घालावेत आणि खरपूस होईपर्यंत परतावेत.
मधल्या वेळेत खाण्यासाठी साधी - सोपी डिश आहे.
आपण उपासाला जे शिंगाड्याचं पीठ वापरतो त्याच शिंगाडा भाजीचे हे फ्राईज.
(प्रादेशिक मधे 'छत्तीसगढी' ऑप्शन नसल्यामुळे वैदर्भीय लिहितेय. पण हि मूळात छत्तीसगढची डिश आहे. )
छान
छान
आधी हिरवे असतात
शिजले की काळे होतात
एयर फ्रायर मध्ये करून
एयर फ्रायर मध्ये करून उपवासाच्या स्पर्धेत देता आली असती. उशीर केला! छान आहे.
मस्त रेसिपी..!
मस्त रेसिपी..!
मस्त आहे!
मस्त आहे!
होय आत्ता कळले वॉटर चेस्टनट
होय आत्ता कळले वॉटर चेस्टनट जे मिळतात इथे चायनिज पदार्थात सढळ हस्ताने वापरले जातात ते म्हणजेच शिंगाडे. फोटोमुळे कळले.
छान आहे
छान आहे
मस्तच आहे रेसिपी! यांना
मस्तच आहे रेसिपी! यांना शिंगाडे का म्हणतात हे आज कळलं!
हिंदीत पानीफल मिळतात
हिंदीत पानीफल म्हणतात
छानच.
छानच.
तुमच्या या अनवट पाककृती खूप
तुमच्या या अनवट पाककृती खूप रोचक आहेत. छान documentation करत आहात.
छान..
छान..
छान, नवीन रेसिपी.
छान, नवीन रेसिपी.
मस्तच रेसिपी. लिहिलं पण छान
मस्तच रेसिपी. लिहिलं पण छान आहे.
यांना शिंगाडे का म्हणतात हे
यांना शिंगाडे का म्हणतात हे आज कळलं!....+१.
छान.
छान वाटते ही पाककृती.
छान वाटते ही पाककृती.
शिंगाडे कधी खाल्ले नाहीत.
ओह नविनच रेसिपी! भारतात
ओह नविनच रेसिपी! भारतात काळ्या शिंगाड्यांच्या गाड्या कितीतरी दिसायच्या पण कधीही खाऊन पाहीले नाहीत.
यांची चव कशासारखी लागत असेल अंदाज येत नाही. रताळ्याटाईप लागतात का?
रताळ , काजू , फणस बी इ चे
रताळ , काजू , फणस बी इ चे कम्बोणेशन
काळे असतात ते डायरेक्त सोलून खावेत
मस्तच आहे रेसिपी! यांना
मस्तच आहे रेसिपी! यांना शिंगाडे का म्हणतात हे आज कळलं! >>> मम.
मस्त रेसिपी. ते गाडीवरचे
मस्त रेसिपी. शिंगाड्याच्या झाडाच्या फोटोंबद्दल विशेष आभार.
ते गाडीवरचे काळे शिंगाडे लहानपणापासून खूप खाल्ले आहेत. खास अशी काही चव सांगता येणार नाही. ब्लँडच असतात पण मस्त लागतात. हिरवे कच्चे पण खाल्ले आहेत.
यांना शिंगाडे का म्हणतात हे आज कळलं! >>> +१
हिंदीत पानीफल म्हणतात. >>> पानीफल नाव मस्त आहे. हिंदीत सिंघाडे पण म्हणतात.
वॉटर चेस्टनट = शिंगाडे बरोबर. पण समहाऊ चायनिज रेसिपीमधले जास्त क्रंची लागतात.
मला वाटायच शिंगाडे सीफूड आहे.
मला वाटायच शिंगाडे सीफूड आहे.
छान माहिती आणि रेसिपी.
गाडीवर शिजवलेले शिंगाडे
गाडीवर शिजवलेले शिंगाडे विकायला असतात, ते मलाही खूप आवडतात. हल्ली इथे कमी दिसतात.
शिंगाडे पिठुळ असतात. मला
शिंगाडे पिठुळ असतात. मला आवडतात. भरपूर पिष्टमय असणार.
लहानपणी आम्ही यांना लहान
लहानपणी आम्ही यांना लहान कोळसाच समजायचो. भय्याच्या हातगाडीवर चिंचा, बोरं, कालाखट्टा सोबत हेही असायचे. उकडून तिखटमीठा बरोबर सुद्धा चवदार लागतात. वरील पाकृ सुद्धा फारच सोपी आहे. छायाचित्रांसाठी अनेक धन्यवाद.
किती सोपीकृती आहे.
किती सोपीकृती आहे.
ही सीरीज मस्त्च आहे. अजुन लिहित रहा.
आमच्या आजीचे खूप उपास असायचे.
आमची आजी एक भुक्त होती. ( दुपारी एकदाच जेवायचं आणि रात्री उपासाला चालणार काही तरी म्हणजे साबुदाण्याचे खिमट , खीर, एखाद केळं किंवा कॉफी एवढंच घेत असे. ) ते ही फार नाही अगदी लिमिटेडच. ह्यात शिंगाडे ही असत कधी कधी कारण शिंगाडे चालतात उपासाला. तेव्हा विकत पीठ मिळत नसे. आणि असत तरी विकतच चालणं अशक्य होतं आजीला. उन्हाळ्यात सोललेले शिंगाडे वाण्याच्या दुकानात मिळत असत. ते चार दिवस उन्हात वाळवून खलबत्त्यात थोडे कुटून नंतर जात्यावर दळून त्याच पीठ करत असे आजी. हे पीठ वर्षभर टिकत . रात्री कधीतरी ती शिंगाड्याच्या पिठाची दुधातली किंवा ताकातली लापशी करत असे. आधीच खूप नसे करत ती त्यात आम्ही सगळे इतके मागत असू की तिला द्यावीच लागे थोडी थोडी आम्हाला. त्या लापशीची चव अजून तोंडावर आहे.
शिंगाडे म्हटलं की सैपाकघरातला डीम लाईट , ओट्यावर बसलेली आजी आणि तिच्या भोवती कोंडाळ करून कधी आमच्या बशीत लापशी पडतेय ह्याची वाट बघत बसलेले आम्ही हेच आठवतं.
अनवट प्रकार !
अनवट प्रकार !
रताळ्याचे चिप्स/ फिंगरचिप्स बरेचदा करतो. हे शिंगाड्याचे कधी केले-चाखले नाहीत.
करून बघणार- at very first opportunity 👍
मस्तच!
मस्तच!
मंगोलिअन ग्रिल मध्ये हे हमखास असतात. गरम गरम भाज्या आणि आवडत असेल ते मीट, तिखटसर सॉसेस आणि शिंगाड्याचे काप घालून नूडल्स त्या मंगोलिअन भल्या मोठ्या तव्यावर परतून काय अशक्य सुंदर लागतात. माझं कंफर्ट फुडच्या पण वरचं काही आहे.
शिंगाडा म्हणजेच वॉटर चेस्टनट
शिंगाडा म्हणजेच वॉटर चेस्टनट का?
आत्ता फोटो पाहीला. होय वॉटर चेस्टनटच.
मी हे आत्ता पहिलेंदा पाहते
मी हे आत्ता पहिलेंदा पाहते आहे... मस्त वाटते आहे रेसिपी.
अरे.... बऱ्याच काळानंतर वर
अरे.... बऱ्याच काळानंतर वर आला की हा धागा... नवीन प्रतिसादकांचे आभार