नुकतच म्हणजे अगदि कालच अमेरीकेतल्या नायगरा फॉल्स ला जाण झाल आणी 'वॉटर ऑफ द वल्ड' चा अदभुत, रोमांचक, अविस्मरणिय क्षण अनुभवास आला. हा क्षण मा. बो. करांसोबत वाटल्या खेरीज आनंद चा पुर्ण अनुभव येण माझ्या साठी तरी मुळीच शक्य नाही म्हणुनच आल्या आल्या माझा अनुभव तुमच्या सोबत वाटण्याचा प्रयत्न करतेय
अमेरीकेत आल्या पासुन म्हणजे गेल्या ४ वर्षात अनेकदा नायागरा फॉल्स ला जायच अस मनात आल पण कधी पक्का बेत ठरला नाही. काही महिन्यांन पुर्वी न्यु यॉर्क मध्ये नवर्याला प्रोजेक्ट मिळाला आणी ह्या वेळी मात्र नायगरा पहायचाच हे पक्क ठरवल पण आम्ही नु यॉर्क ला आलो ते भर गारठ्या थंडिच्या महिन्यात त्यामुळे मे महिना उजाडण्या पर्यंत धिर धरण भाग होत. अखेर मे चा महिना ऊजाडुन 'मेमोरीयल डे' चा विकएंड आला आणी शनिवारी सकाळी ८:४७ ला आम्ही नायगरा ला निघालो
संध्याकाळी साधारण ६:३० च्या सुमारास आम्ही नायागरा फॉल्स स्टेट पार्क ला पोहचलो, पार्क मध्ये जाणार्या रस्त्यावर पायी चालणार्या लोकांची बरीच गर्दि होती आणी पार्क मध्ये तर लोकांची झुंबड गर्दी. कशी बशी गाडी पार्कींग ऐरीया पर्यंत नेली पण पार्कींग फुल! ...पार्क मधुन बाहेर आलो पण आजु बाजुचे सर्व पार्कींग फुल, दूर दूर गाड्या पार्क करुन लोक पायी पार्क मध्ये येत होते. आम्ही ही गाडी पार्क करायला जागा शोधली आणी पायी पार्क कडे कुच केल.
विशेष म्हणजे ६-७ तासांचा प्रवास करुन आपण अमेरीकेतल्याच दुसर्या भागात आलो आहोत अस मुळीच वाटत नव्हत. लोकांच्या झुंबड गर्दीत आपण चक्क भारतात आहोत अस अगदी असच वाटत होत कारण गर्दीत आजु, बाजु, डावी कडे, उजवी कडे, लांब, जवळ, सर्वत्र भारतीयच भारतीय दिसत होते, पसरले होते (भारताच्या विशाल जन संखेची हलकीशी बोच मनाला नकळत लागली
)
ह्या गर्दि ची तमा न करता वेगाने पावले टाकत आम्ही पार्क मध्ये शीरत होतो. माझी नायागरा पहायची उत्कंठा आता आवरेनाशी झाली होती. पार्क मध्ये शीरल्या शीरल्या धबधब कोसळणारा विशाल असा धबधबा दिसेल अस मला वाटलेल पण तस काही झाल नाही.
आधी संथ-मध्यम गतीने वाहणार पाण्याच रुप नजरेस पडल आणी पाण्याच्या वाहत्या दिशेने गेल्यावर काही पावलांवर धप्पकन खाली कोसळुन धबधब्याच रुप घेणार त्याच पाण्याच चंचल रुप दिसल.... नायगरा च पहिल दर्शन अस झाल.
खुळखुळ आवाज करत डोलत डोलत संथ-मध्यम गतीने वाटेत येणार्या दगड-दुगड, झाडी-झुडपांना शांत पणे वेढा घालुन वाहत येणार पाणी एकदम धबधब कोसळु लागत,खळखळ करु लागत, लहान मोठ्या कुठल्याही दगड पाषाणांना न जुमानता उध्धम पणे येणार्या प्रत्येक अडथळ्यावर आदळुन गतीमान पणे धरतीच्या दिशेने स्वःताला झोकुन देत, तुषारांच्या पुंजक्यात सामील होत वा तुषार होवुन हवेत तरंगु लागत
तुषारांचा हा पांढरा शुभ्र पुंजका एखाद्या ढगासारखा वाटतो, जणुकाही ढगाचा तुकडा हवेत तरंगत आहे
नायगरा बाजुने पण खालुन पाहिल्या वर समोरुन कसा दिसेल ते पहाणयची उत्सुकता सहाजीकच झाली उंचावरुन आणी समोरुन नायागरा पहायला आम्ही 'ओबझरवेशन टॉवर वर गेलो तिथेही लोकांची झुंबड गर्दी. दाटी वाटिने सारे नायगर्या कडे डोळे विस्फारुन बघत होते, अश्या गर्दित ही नायगरा बॅक ग्राऊंडला येईल असे फोटो जमेल तिथे जागा करुन उभ राहुन लोक काढत होते :). टॉवरच्या एका बाजुने फॉल्स व दुसर्या बाजुने 'रेनबो ब्रिज' दिसतो.
टॉवर वरुन बघितल तर एका बाजुला गतीमान वेगाने स्वःताला उंचावरुन फेकुन देणार, कोसळणार फेसाळ, शुभ्र धबधब पाणी (धबधबे) आणी दुसर्या बाजुला, ब्रिज च्या खाली शांत-संथ पणे, स्थीर पणे पुढे जाणार शेवाळी रंगाच्या छटेतल मध्ये मध्ये फेसाळ शुभ्र कडा घेत वाहणार तेच पाणी हे एकाच पाण्याचे दोन भिन्न रुप,भीन्न स्वभाव दिसतात.
टॉवर वर च्या गर्दितुन थोडावेळ नायगरा आणी ब्रिज बघुन आम्ही परतण्याचा विचार करत होतो, दिवस भराच्या प्रवासाने खूप खकलो होतो आणी भुक ही लागली होती पण वाजले किती बघितल तर ९:००... आता रोषणाई सुरु होणार मग काय तो पहण्याचा मोह कसा आवरणार
रात्री ९ च्या सुमारास धबधब कोसळणार्या पाण्यावर गुलाबी, पिवळा, निळा, हिरवा, मोरपंखी असे विविध रंग सोडले जातात आणी हे चंचल पाणी अगदि म्हणजे अगदि सहज प्रत्येक रंगाला आपलस करुन त्या रंगात रंगुन जातः
*************
मेड ऑफ द मिस्ट (Maid of the Mist)
नायागरा फॉल्स जवळुन पहाण्याचा हा एक रोमांचक अनुभव. 'मेड ऑफ द मिस्ट' हा जहाजा वरुन नायगराच्या जवळ जाण्याचा सफर. सकाळी ९:१५ पासुन फेर्या (Ferry) आणी तिकीट विक्री सुरु होते. तिकीटा साठी तासंतास रांगेत उभ रहाव लागत ही माहिती आम्हाला बर्याच लोकांन कडुन मिळालेली म्हणुन दुसरे दिवशी सकाळी ८ वा. आम्ही पार्क मध्ये गेलो , पहातो तर काय आमच्या आधी बरेच लोक लोक रांगेत उभे होते आणी तिकीट खीडकी उघडण्याची वाट पहात होते :).
तिकीट घेवुन आम्ही फेरी च्या रांगेत गेलो ही रांग पण भली मोठी होती. रांग खालुन सुरु होते ती 'ऑबझरवेशन टॉवर' वर जाते, तेथुन लिफ्ट ने खाली नेतात आणी जहाजावर जाण्या आधी निळ्या रंगाचे प्लॅस्टिक चे कोट घालायला देतात
(आम्ही 'ऑबझरवेशन टॉवर' वर रांगेत उभे होतो तेव्हा खाली जहाजावर जाण्यास तयार असलेल्या चमु चा टिपलेला फोटो)
हा 'ऑबझरवेशन टॉवरचा खालुन घेतलेला फोटु
बर्याच वेळा नंतर आमचा ही नंबर आला आणी आम्ही निळे निळे कोट घालुन जहाजा वर जाण्यास सज्ज झालो. जहाजावर कडेची जागा मिळविण्यासाठी सगळ्यांची धड्पड सुरु होती. जहाज वर आणी खाली दोन्ही मजल्यांवर माणासांनी खच्चुन भरल होत.
('मेड ऑफ द मिस्ट' ची फेरी पुर्ण करुन आलेल्या एका जहाजाचा फोटो)
जहाज सुरु होताच जहाजा वरचा कप्तान नायागराची माहिती सांगु लागतो जी लोकांच्या गोंधळात एकु येत नाही ....जो तो धो धो पडणार्या पाण्याला डोळ्यात, कॅमेर्यात सामाविण्याचा प्रयत्न करत असतो. जहाज जस जस धबधब्याच्या जवळ जावु लागत आपण एखाच्या पांढर्या शुभ्र ढगात शिरतोय अस वाटु लागत. उफाळुन खाली कोसळत असलेल्या पाण्याचे असंख्य तुषार मिळुन दाट धुक्याचा जणु ढग तयार झालेला असतो.
पाण्याचे काही तुषार अंगावर येतात. जहाजावर कडेची जागा न मीळाल्याने मी जहाजावर आत लोकांच्या गर्दित होते पण पाण्याचे वेगवान तुषार माझ्या अंगावर पावसाच्या थेंबां प्रमाणे येत होते ... जस जस जहाज धबधब्याच्या आणखी जवळ जाऊ लागत लोकांचा जल्लोष वाढु लागतो... तुषार रुपी धुक्याचा ढग थोड्याच अंतरावर असतांना कप्तान जोरात घोषणा करतो.... "Ladies & Gentelman" धिस ईज नायागरा फॉल्स... ह्या क्षणी हिंदी, चिनी, अमेरिकन, युरोपियन, ईटालियन, मॅक्सिकन.... जहाजा वर असणारी भिन्न जातीय, प्रातींय माणासे एका सुरात "हो!!!" चा आनंद आश्चर्य रोमांच व्यक्त करणारा जल्लोष करतात... हा क्षणात डोळ्यांना दिसणारा नायागरा कुठल्याही श्ब्दात, भाषेत व्यक्त होऊ शकत नाही वा कॅमेर्यात कुणी त्याला टीपु शकत नाही... तरीही त्याला टीपण्याचा केलेला हा प्रयत्न
मेड ऑफ द मिस्ट नंतर आम्ही कुच केल ते Caves of the Wind
Caves of the Winds:
रोमांचक !!!
रोमांचक !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान !!
छान !! नायगाराचे ह्या कोनातून फोटू बघितले नव्हते.
दक्षीणा,
दक्षीणा, दिनेश दा आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)