Submitted by स्मिता श्रीपाद on 16 September, 2021 - 07:48
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय.
तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
डोळे दिपले रे...नुसता केशरी रंग भरुन राहिलाय आसमंतात.
हळुहळु डोळे सरावतात तो काय प्रकट होते आहे हे पुढ्यात.
कोण उभे आहे हे माझ्या समोर...तेजस्वी कांती आहे, कमरेला पितांबर आहे,अजानुबाहु, एका खांद्यावर धनुष्य आहे, दुसरीकडे बाणांचा भाता,प्रेमळ डोळे..माझा रामराणा.
त्याच्या तेजाने सगळं लख्ख दिसतय आता.
इतके दिवस या घळीतल्या गुहेत स्वत:ला शोधत होतो,काय करायचं ते समजत नव्हतं,आता सगळं स्पष्ट कळलंय.
कल्याणा, कुठे आहेस रे,
घे बरं तो टाक - बोरु आणि बैस इथे असा माझ्या समोर.
पहिल्या पानावर शीर्षक लिही…"दासबोध"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
अहाहा... काय सुंदर!
अहाहा... काय सुंदर! डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.
छान!
छान!
छान...
छान...
फार सुंदर.
फार सुंदर.
सुंदर
सुंदर
Are va!
Are va!
सुंदर.
सुंदर.