Submitted by हरचंद पालव on 11 September, 2021 - 09:03
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
मंतरलेला ताईत काढल्यावर दरवाजा आपोआप उघडेल, हे त्याच्या कल्पनेतही नसतं. दबकतच प्रवेश करून पाहतो, तर सभागृहाच्या मध्यभागी पावसाचं पाणी गळत असतं. अचानक जोराच्या वार्याने एक झाड हवेलीवर कोसळतं. त्या भयानक आवाजासह छपराचा अर्धा भाग अक्षरशः त्याच्या पुढ्यात कोसळतो आणि आकाशवाणी होते, 'मूर्खा, तुला काय वाटलं, इथे तुला माँजोलिका भेटेल? ह्या शापित दालनात प्रवेश केल्यामुळे तू आता केवळ दहा वर्षांनी, आजच्यासारख्या अमावास्येच्या रात्री मरशील'.
केमोथेरपीनंतर डोक्यावर आलेल्या केसांवरून हात फिरवत तो स्वतःशीच म्हणतो, 'डॉक्टरांनी तर सहा महिनेच सांगितले होते!'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
छान आहे, आधी क्रीपी मगं
छान आहे, आधी क्रीपी मगं सकारात्मक शेवट हा प्रयोग आवडला.
धन्यवाद! मध्येच माँजोलिका
धन्यवाद! मध्येच माँजोलिका टाकल्यामुळे जरा गांभीर्य जातं आहे, पण मला राहवलं नाही
शाप हाच वर ठरला!
शाप हाच वर ठरला!
हो. विज्ञान शाप की वरदान छाप
हो. विज्ञान शाप की वरदान छाप निबंधांची आठवण झाली. तेव्हा असं काहीतरी लिहायला हवं होतं निबंधात.
शाप देउन ऋषी पस्तावला
शाप देउन ऋषी पस्तावला
छान!!
छान!!
मस्तच..
मस्तच..
छान कथा...
छान कथा...
(No subject)
शी बाई.. पण असे दहा वर्षांनी मरायचा शाप कोण देते का .. फाऊल आहे हा .. आपल्या प्राचीन शाप संस्कृतीचा अपमान आहे
(No subject)
असे दहा वर्षांनी मरायचा शाप
असे दहा वर्षांनी मरायचा शाप कोण देते का >>
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार!
छान
छान
छान.
छान.
धन्यवाद BLACKCAT (क्षमस्व )
धन्यवाद BLACKCAT (क्षमस्व ) आणि देवकी. प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता.