काय मंडळी, कसे आहात?
सणवार सुरु झालेत, पण खरतरं ऑलम्पिकचं भूत किंवा फिवर पूर्णपणे उतरलं नाहीये ना अजून ? अहो, कस उतरणार? कारण पाठोपाठ पॅरा ऑलम्पिक सुरू झाले आहेत आणि आपले खेळाडू सातत्याने पदकं जिंकून भारताची मान विश्वात उंचावत आहेत.
त्यातला एखादा खेळ प्रकार, एखादा खेळाडू आपला जरा जास्तच आवडता असेल !
मग आपला आवडता ऑलम्पिक खेळ खेळणाऱ्या बाप्पाचं चित्र काढून रंगवायची कल्पना कशी वाटते...?
मग करा सुरुवात...!
बघुयात, आपल्या मायबोलीवर,
प्रत्येकाचा लाडका बाप्पा कुठल्या, कुठल्या खेळाचं प्रतिनिधित्व करतोय ते....!
धाग्याचे शीर्षक खालीलप्रमाणे असावे.
चित्रकला उपक्रम : ऑलिम्पिकमधील बाप्पा - तुमचा मायबोली आयडी - छोट्यांचे पुर्ण नाव
लक्षात असुद्या, हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
४) बाप्पाचे चित्र स्वतः काढून रंगवलेले असावे. रंग कोणतेही वापरा.
५) चित्रं गणेश चतुर्थीपासून, १० सप्टेंबर २०२१ (भारतीय प्रमाण वेळ) ते रविवार २६ सप्टेंबर २०२१ (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
६) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी
छोट्या दोस्त मंडळींनो, पाठवताय ना मग तुम्ही काढलेली छान छान चित्र ?
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
छान. छोट्या मायबोलीकरांच्या
छान. छोट्या मायबोलीकरांच्या कलेला वाव मिळणार यात.
बाप्पालापण ऑलिम्पिक मध्ये भाग
बाप्पालापण ऑलिम्पिक मध्ये भाग घेऊद्या तुमच्याकडे असलेल्या कुंचल्यामधून. लवकर लवकर चित्रे पाठवा.
गणपती बाप्पा मोरया !!!
या वेळेस बच्चे कंपनी थंड का
या वेळेस बच्चे कंपनी थंड का ब्वॉ?
उलट कोव्हीडमुळे अशा बैठ्या उपक्रमांना उत्साह पाहीजे.