या मोबाईलच्या युगात आपण भेटकार्डे देणे-घेणे विसरलो आहोत का?
स्वहस्ते बनवलेली भेटकार्डे, त्यातली चित्रे, मजकूर अगदी सहज समोरच्याला आपल्या मनातलं सांगून जातात.
मग चला, कामाला लागा, मायबोलीकरांनो ! आपल्या कल्पनाशक्तीला कामाला लावा आणि बनवायला घ्या,
शुभेच्छापत्रे किंवा मराठीत ग्रीटींग कार्ड्स !! ..
(अ) लहान गट : वय वर्ष ५ ते १५
(ब) मोठा गट : १५ वर्षापुढील
* नियमावली :*
१) कलाकृती स्वतः तयार केलेली असावी.
२) स्पर्धेच्या प्रवेशिका १० सप्टेंबर २०२१ पासून पाठवू शकता. (IST)
३) एक आयडी प्रत्येकी २ प्रवेशिका देऊ शकेल.
४)कलाकृतींची क्रमवार किमान २-३ प्रकाशचित्रे देणे बंधनकारक आहे.
५) प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
६) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
हस्तकला स्पर्धा- मोठा गट - भेटकार्ड बनवणे - मायबोली आयडी.
हस्तकला स्पर्धा- छोटा गट - भेटकार्ड बनवणे - तुमचा मायबोली आयडी - छोट्यांचे नाव
७) प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार २६ सप्टेंबर २०२१ रात्री १२ पर्यंत (भारतीय प्रमाणवेळ)
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
भेटकार्डाचा विषय(जसे लग्न
भेटकार्डाचा विषय(जसे लग्न/वाढदिवस/परिक्षेत यश/सण/आरोग्य/नवीन वास्तू) कोणताही चालेल ना?
हो. भेटकार्ड् कुठल्याही
हो. भेटकार्ड् कुठल्याही प्रसंगाचे चालेल
मस्त.
हा विषय देखिल मस्त.
भरपूर प्रवेशिका येणार इथे.
हा विषय देखिल मस्त.
हा विषय देखिल मस्त.
भरपूर प्रवेशिका येणार इथे.>>>+१११
छान विषय. माझे एक निरिक्षण
छान विषय. माझे एक निरिक्षण आहे की स्पर्धेचा निकाल जर public poll करून लावला तर बहुतेक लोक आपल्या ओळखीच्या आयडी ला मत देतात.
समजा स्पर्धकानी आपआपल्या प्रवेशिका संयोजक आयडी ला
पाठवल्या आणि स्पर्धकाचे नाव न येता प्रवेशिका आल्यात तर public poll निष्पक्ष होईल असं मला वाटतं. निकालच्या वेळेस विजेत्या स्पर्धकाचे नाव जाहीर करता येईल. अर्थात् हे माझे वैयक्तिक मत आहे
मनिम्याऊंना अनुमोदन.. ह्या
मनिम्याऊंना अनुमोदन.. ह्या सुचनेचा जरूर विचार करावा.
@मनिम्याऊ, वृषाली
@मनिम्याऊ, वृषाली
आपण जेंव्हा मतदान घेतो तेंव्हा प्रत्येक स्पर्धकाला किती मते मिळाली आहेत हेच उघड होते. कुणाचे मत कुणाला मिळाले ते उघड होत नाही. त्यामुळे तुम्हाला जी प्रक्रिया अपेक्षित आहे तीच संयोजक आयडीला मधे न घेताही होते. उदा, हे गेल्या वर्षीचे मतदान पहा.
https://www.maayboli.com/node/76578
कुणाचे मत कुणाला मिळाले ते
कुणाचे मत कुणाला मिळाले ते उघड होत नाही. >>> हो पण त्यांना असे म्हणायचे आहे कि काही लोक प्रवेशिका कोणती सर्वात छान आहे ते बघण्यापेक्षा स्पर्धक कोण आहे ते बघून मतदान करतात. ते टाळण्यासाठी संयोजकाकडे प्रवेशिका पाठवाव्यात व त्यांनी त्या नाव उघड न करता मायबोली वर दाखवाव्यात. मग माबोकर फक्त प्रवेशिका बघून मत देतील. शेवटी निकाला नंतर नावे उघड करावीत.
पण यातही पळवाट काढता येऊ शकते. स्पर्धक आपल्या ओळखितल्यांना खासगीत आपली प्रवेशिका कोणती आहे हे सांगू शकतात. मग संयोजकांचे काम कशाला वाढवायचे? त्यापेक्षा स्पर्धेत भाग घ्या आणि आवडलेल्या प्रवेशिकांना मनापासून दाद द्या. आनंद घ्या, आनंद वाटा.
काही लोक प्रवेशिका कोणती
काही लोक प्रवेशिका कोणती सर्वात छान आहे ते बघण्यापेक्षा स्पर्धक कोण आहे ते बघून मतदान करतात. ते टाळण्यासाठी संयोजकाकडे प्रवेशिका पाठवाव्यात व त्यांनी त्या नाव उघड न करता मायबोली वर दाखवाव्यात. मग माबोकर फक्त प्रवेशिका बघून मत देतील. शेवटी निकाला नंतर नावे उघड करावीत.
>>
हेच म्हणायचे आहे मला
सगळे शुभेच्छुक वाट बघतायत .
सगळे शुभेच्छुक वाट बघतायत . चला, पटापट भेटकार्ड बनवून पाठवा.
स्पर्धेची प्रवेशिका पाठवायची
स्पर्धेची प्रवेशिका पाठवायची मुदत किती आहे नक्की??
3) एक आयडी प्रत्येकी २
3) एक आयडी प्रत्येकी २ प्रवेशिका देऊ शकेल.>>> हा नियम वाचलाच नाही मी. ( : कपाळावर हात: )