
लहानपणी वीज गेल्यावर मेणबत्तीच्या पुढे हातांच्या बोटांची वेगवेगळ्या प्रकारे गुंफण करून भिंतीवर ससा, कुत्रा, बदक यासारख्या प्राण्यांच्या सावल्या तयार करण्याचा खेळ आपण सगळ्यांनी नक्कीच खेळला असेल. आम्ही यावेळी घेऊन आलो आहोत, सावली चित्र म्हणजेच शॅडो आर्ट हा तुमच्या कलागुणांना वृद्धिंग्रत करणारा उपक्रम. यात आपल्याला टॉर्चच्या उजेडापुढे वेगवेगळ्या कोणत्याही वस्तू विशिष्ट प्रकारे रचून त्यापुढे दिसणाऱ्या सावलीतून चित्र साकार करायचे आहे.याची कृती खालीलप्रमाणे.
१. आधी एक चित्र निश्चित करा आणि ते तुमच्यापुढे ठेवा. (कागदावर उतरलेले किंवा कॉम्पुटर/ मोबाईल वर असलेले ).
२. घरातील दिवे बंद करा.
३. टॉर्च चालू करा आणि एका ठिकाणी स्थिर ठेवा.
४. टॉर्चच्या उजेडापुढे आपल्याला पाहिजे तशी सावली तयार होईपर्यंत एक एक वस्तू रचत जा.
५. आधी चित्रातील मोठा भाग पूर्ण करण्यासाठी मोठ्या वस्तू वापर, मग छोटे आकार येण्यासाठी छोट्या छोट्या वस्तू व्यवस्थित रीतीने रचा.
६. सावली पूर्ण झाल्यावर फ्लॅश बंद ठेऊन मोबाईलवर फोटो काढा.
७. दोन फोटो आवश्यक आहेत. एक सावलीचा आणि दुसरा वस्तूंसकट सावलीचा.
८. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी
हा उपक्रम मोठी मंडळी आणि छोटे दोस्त हे मिळूनसुद्धा करू शकतो कारण छोट्या दोस्तांना याबद्दल भारी आयडिया सुचतात.
खास टीप : हे करताना सोबत हळू आवाजात गाणी चालू ठेवा मग कंटाळा नाही येत आणि चित्र लवकर तयार होते..
तर मग आपल्या कलाशक्तीची अजून उंच शिखरे पादाक्रांत करण्यासाठी चालू करा सावली चित्र तयार करायला.
एक आयडी एका वेळी एकच चित्र देऊ शकतो. एकापेक्षा जास्त द्यायचे असेल तर वेगळा धागा काढावा.
१० सप्टेंबर २०२१ नंतर धागे चालू होतील.
धाग्याचे नाव खालीलप्रमाणे
सावलीचित्र - चित्राचे शीर्षक - मायबोली आयडी - छोट्या दोस्तांचे नाव ( जर छोट्या दोस्तांच्या पण यात सहभाग असेल तर )
हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
वाह! हे फार अवडलंय. एकदम मस्त
वाह! हे फार अवडलंय. एकदम मस्त काय काय बघायला मिळेल. सावली ज्या हस्त रचनेतून / वस्तू रचनेतून झालीये तिचे पण फोटो टाका बरं लोकहो म्हणजे आम्हाला पण करून बघता येईल
वॉव! हे भारी आहे. संयोजकांची
वॉव! हे भारी आहे. संयोजकांची कल्पनाशक्ती फार उत्तम काम करत्येय आणि यामुळे माबोकरांच्या कल्पनाशक्तीलाही भरपूर वाव मिळेल. यातील प्रवेशिका बघायला फार उत्सुक आहे.
हा सगळ्यात कमाल उपक्रम आहे!
हा सगळ्यात कमाल उपक्रम आहे! आज रात्रीपासून प्रॅक्टिस चालू केली पाहिजे!
सॉलिडच आयडिया
सॉलिडच आयडिया