![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2021/08/24/FE32AC30-FF09-41EA-8EBC-2F1C4118CABF.jpeg)
८-१० पिकलेली अंजिरं (बारीक चिरून)
अर्धा कान्दा बारीक चिरून
बारीक चिरलेल्या २ मोठ्या मिरच्या
रॉकसॉल्ट
जल्जिरा पावडर (नसेल तर चाट मसाला किंवा आमचुर पावडर चालेल)
लोणच्याचा मसाला ~ १ चमचा
लाल तिखट
गुळाची पावडर/ गूळ (चवी प्रमाणे)
फोडणीसाठी : तेल , मोहरी, जिरे + (मेथी आणि बडिशेप कुटून), हळद आणि चिमूटभर हिंग.
सध्या इथे अंजिराचा सिझन एकदम पिक वर आहे (लॉस एंजलिस/ सदर्न कॅलिफोर्निया एरीयात.)
लेट समर ते अर्ली फॉल मधे आमच्या गार्डन मधल अंजिराचं गुणी झाड अगदी भरभरून अंजिरं देतं !
घरी अगदी पोटभर खाऊन , मैत्रीणींना वाटून आणि पक्ष्यांना थोडी खाऊ दिल्यानंतरही दररोज भरभरून अंजिरं येतात.
मग अशा काहीतरी रेसिपीज शोधते.
तर अंजिराच्या चटणीची/अंजिर डिप ची ही रेसिपी :
१. पॅन मधे तेल गरम करायचं, त्यात मोहरी आणि जिरे तडतडून घ्यायचे.
२. टिस्पून बडिशेप +४-५ मेथीदाणे एकत्र छोट्या खलबत्यात कुटून फोडणीत टाकायचे, त्यात हळद हिंग टाकायचे.
३. फोडणीमधे बारीक चिरलेली मिर्ची टाकायची आणि चिरलेला कान्दा मंद आचेवर परतून घ्यायचा.
४. आता चिरलेली अंजिरं टाकून तेलात परतून आणि एकजीव करायची, त्यात रॉकसॉल्ट, जल्जिरा , लोणच्याचा मसाला , १ चमचा लाल तिखट आणि चवी प्रमाणे गूळ टाकून २-३ मिनिटं शिजवायचं, त्यात साधारण अर्धा कप गरम पाणी घालून गॅस बारीक करून दहा मिनिटं शिजवायचं, चटणी तयार !
ही रेसिपी संजीव कपुर रेसिपी वरून इन्स्पायर्ड आहे पण त्यात मी बदल केले त्या वरून केलेले हे माझे व्हर्जन.
मूळ रेसिपी मधे जल्जिरा,लोणच्याचा मसाला , गूळ इ. नाही (त्यांच्या मूळ रेसिपीत फोडणीत कलौंजी आहे, माझ्याकडे नव्हती, लोणच्याच्या मसाल्यात कलौंजी असते असे वाचले होते म्हणून हे बदल केले शिवाय गोड चव बॅलन्स करायला मी जल्जिरा टाकला.
या चटणीची चव थोडी मेथांब्या टाइप लागते
रेसिपीचा मी छोटासा टिकटॉक व्हिडिओ टाकलाय : https://vm.tiktok.com/ZMR6r4xdE/
* हिरवी मिर्ची आणि लोणच्याचा मसाला यामुळे चटणी बर्यापैकी तिखट लागते त्यामुळे लाल तिखट सांभाळून टाका.
* फोडणीत मेथी आहे आणि लोणच मसाल्यातही मेथी असते त्यामुळे मेथीचे दाणे जास्तं घालु नका,
* आवडत असेल तर शेवटी पुदिन्याची बारीक चिरलेली पानं घातलेली छान लागतात.
* गोड चव आवडत असेल तर पाणी घालण्या आधी भिजवलेल्या मनुका/बेदाणे अॅड करु शकता छान काँप्लिनेम्ट करतील.
* चीज ट्रे स्प्रेड मधे हे डिपिंग छान लागतं .
मस्त लागेल .... करून पाहिल्या
मस्त लागेल .... करून पाहिल्या , खाल्ल्याशिवाय कसं कळेल ...
छान
छान
छान!
छान!
नाव वाचल्यावर सुके अंजीर मनात आले.म्हटलं तेच तोंडात टाकायचे की,तर झाडाचा फोटो पाहिला. रेसिपीमुळे अंजिराचे झाड पाहिले.हे कलम आहे की इतकेच उंच असते?
डिजे, अंजीरं मस्त दिसताएत गं!
डिजे, अंजीरं मस्त दिसताएत गं! पण इथे मुंबईत चांगली अंजीरं बरीच महाग असतात. ती नुसती खाऊनच संपतील. माझ्या लेकाच्या तावडीतून (चटणी करण्यासाठी ) अंजीर सुटायचे नाही. बघू कधी मुहूर्त लागतो. चांगली लागेल, कांद्याबद्दल जरा साशंक आहे.
रेसिपीमुळे अंजिराचे झाड पाहिले. >> देवकी+१
अंजीरे मस्त दिसत आहेत. झाडही
अंजीरे मस्त दिसत आहेत. झाडही मस्त असेच फूलू-फळू दे.
अंजीराची चटणी कधी खाल्ली नाही. पण पाककृती आवडली.
मस्त आयडिया! दिसतेय पण मस्त.
मस्त आयडिया! दिसतेय पण मस्त. मागे एकदा नवर्याने ढीगभर प्लम्स आणले होते तेव्हा त्याची चटणी केल्याचे आठवले.
छान वाटतेय रेसिपी. पुढच्या
छान वाटतेय रेसिपी. पुढच्या वेळी आणले अंजीर की थोड्यांची करून पाहते ही चटणी.
मस्त दिसतेय.अगदी तोंपासू.
मस्त दिसतेय.अगदी तोंपासू.
अंजीर बर्फी माहीत होती.
अंजीर बर्फी माहीत होती. चटकदार चटणी पाकृ बद्दल धन्यवाद. टिकटॉक चित्रफीत छानच.
हे फार मस्त आहे! पहिल्या
हे फार मस्त आहे! पहिल्या फोटोला एक मेडिटेरेनियन लूक आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुसत्या अंजिरांचा फोटो काय
नुसत्या अंजिरांचा फोटो काय भारी आहे !! अंजिरं - माझा वीक-पॉइंट
रेसिपी वाचायला लागल्यावरच जाणवलं, की हे मेथांब्यासारखं लागणार.
छान
छान
रेसिपीमुळे अंजिराचे झाड
रेसिपीमुळे अंजिराचे झाड पाहिले. >> + 1
छान आहे पाकृ , फोटो तर जबरी.
धनुडी म्हणते तसं एकतर अंजीर महाग असते तसे आणि नुसतेच खाऊन सम्पते ,चटणी साठी कोणी ठेवणारच नाही माझ्यासकट.