विष्णूजींच्या मास्टर रेस्पीज मध्ये ही दाखवली आहे. मोस्ट्ली जशीच्या तशी केलेय. करून पाहा उत्तम होतंय आणि चविष्ट एकदम. चटणी चा प्रकार आहे.
तर साहित्य -
अर्धी - पाऊण वाटी कच्चे शेंगदाणे (मूळ रेस्पीत भाजके आहेत. पण नंतर परत परतायचं असल्यानी मी कच्चे घेतलेत)
२०-२५ लाल सुक्या मिरच्या
१५-२० लसूण पाकळ्या
चवीनुसार मीठ
चिमटीभर साखर
२ टेबल स्पून तेल
अर्धा चमचा जिरं
ग्राईंडर च्या चटणी पॉट मध्ये शेंगदाणे, मिरच्या, लसूण, मीठ आणि साखर हे कच्चंच बारीक करून घ्यावं.
२ टेबलस्पून तेल चांगलं गरम करून घ्यावं आणि नंतर आच बारीक करून जिरं फुलवावं आणि त्यात वाटलेली चटणी घालावी.
मंदच आचेवर चटणी चांगली परतून घ्यावी. याला तसा वेळ लागेल, पेशन्स ठेवून आच न वाढवता बारूदीला परत परत परतायची, शेंगदाण्यांचा कचवट पणा गेला आणि मिरची घरभर उधळली की गॅस बंद करून ज्या भांड्यात केली, त्यातच राहू द्यावी.
खुटखुटीत आणि गार झाली की बरणीत भरून ठेवावी.
मिरच्या भरवश्याच्या तिखट हव्यात. प्रमाण कमी करता येइल अर्थात; पण मग त्याला दाण्यांची चटणी म्हणावं.
हे बारूदच आहे, चांगल्यापैकी तिखट आणि खमंग होतं, सो जरा जपून.
चांगलं परतंलं गेल्यामुळे, बरेच दिवस टिकेल असं वाटतं आहे. आमच्या कडलं आजच अर्ध झालं आहे पण.
अरे वा! करून बघायला पाहिजे.
अरे वा! करून बघायला पाहिजे.
मस्त वाटतंय बारूद..बनवावे
मस्त वाटतंय बारूद..बनवावे वाटतय एकदा.
बाबोऊ, 20- 25 मिरच्या?
बाबोऊ,
20- 25 मिरच्या?
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
भारीच एकदम.
भारीच एकदम.
मस्त.
मस्त.
(राहिलेल्या अर्ध्याचा का होईना फोटू टाका.)
झणझणीत
झणझणीत
छान लागणार हे नक्की पण
छान लागणार हे नक्की पण इतक्या मिरच्या झेपायच्या नाहीत. थोड्या मिर्च्यात कर असा निरोप मातोश्रींना दिलेला आहे. आज दुपारी चटणी ताटात येईल
हे हे ते टीपा वाचा ना!
हे हे ते टीपा वाचा ना!
बारूद सार्थ नाव आहे छान
बारूद सार्थ नाव आहे छान पिटुकल्या लालेलाल लवंगी मिरच्या आणून करणार. दाणे भाजून आणि कच्चे अशा दोन्ही प्रकारात किती फरक पडतो ते कळायला हवं.
ब्याडगी सुक्या मिरच्या वापरू
ब्याडगी सुक्या मिरच्या वापरू का?तिखट आहेत.
आणि मिरची घरभर उधळली की गॅस
आणि मिरची घरभर उधळली की गॅस बंद करून ज्या भांड्यात केली, त्यातच राहू द्यावी.>> घरभर का अजून दुसरे काही लिहायचे होते. समजण्यात गडबड झाली की वेगळा अर्थ आहे. घरातील लोकांना ठसका लागेपर्यंत का?
घरातील लोकांना ठसका
घरातील लोकांना ठसका लागेपर्यंत का?>> येस! मिरची उधळली म्हणजे तिखटाचा वास नाकात जावुन सगळे शिन्कायला लागले की झाल.
त्याला मिरचिचा ठसका,खकारा उठला असेही म्हणतात.
क्रुती मस्त आहे, एवढ तिखट झेपत नाही.
आम्ही खकाणा म्हणतो त्याला.
आम्ही खकाणा म्हणतो त्याला.
खरच बारुद आहे. आता एवढं तिखट
खरच बारुद आहे. आता एवढं तिखट खायची सवय गेली माझी. म्हणुन पास.
नागपूरचे पाहुणे येतील तेव्हा करता येईल.
20 25 मिरच्या आणि चिमूटभर
20 25 मिरच्या आणि चिमूटभर साखर, हमको नही झेपेगा बाबा.