१. चिकन.
तंदूर करायचं आहे असं सांगून कापून आणावा. ही पीसची साईज झाली. त्याने चिरे मारून दिले नाहीत तर आपण चिकनला चिरे द्यावेत. आमच्याकडे ब्रॉयलर चिकनचा एक 'लेग' किंवा चेस्ट पिस (तंग्डी/सीना) सुमारे ६० रुपयांना मिळतो. आदमासे २५० ग्राम.
२. लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ. (एक छोटे लिंब होईल इतक्या साइजचि चिंच घेऊन थोड्याश्याच कोमट पाण्यात भिजवावी. अर्ध्या तासाने कुस्करून गाळून घ्यावी.)
३. तिखट. हे झणझणीत हवे.
४. जिरं. चहाचा सुमारे आदपाव चमचा.
५. मीठ. तितकंच./चव बघा.
६. मध किंवा गूळ. तुम्हाला हवा तसा.
७. थोडंसं भाजलेलं जिरं
८. किमान १ इंच आलं. किसलेलं.
९. एक बटाटा. वेजेस करून.
१०. उल्लुसं तेल/तूप्/बटर
अ) चिकन भाजणे:
१. घटक क्र. २ ते ८ एकत्र करून घ्या.
२. त्यात स्वच्छ धुतलेली चिरे मारलेली कोंबडी प्लस वेज केलेला बटाटा घाला.
३. इतर कामे होईपर्यंत झाकून ठेवा. अर्धा-पाऊण तास.
४. एयर फ्रायर प्रीहीट करा, १८० डिग्री से. तोवर अॅल्युमिनियम फॉइलची बशी बनवून त्यात चिकन + बटाटा ठेवा.
५. २० मिनिटे टाईम सेट करा. एयर फ्रायरला कमी वेळ लागतो. ओटीजी = एफ्रा टाईम गुणिले २, कन्व्हेक्शन मावे साठी गुणिले २.५ मिनिटे.
६. मधे मधे चिकन बघा. सगळी चिकनं सारखी नसतात. काही लवकर तर काही शिजतच नाहीत.
यूज्वली मी पहिले १०-१२ मिन १८० ला ठेवतो, त्यानंतर सुमारे ७-८ मिन्टे १६० च्या आसपास. त्यानंतर थोडं तेल्/तूप लावून परत शेवटले २-४ मिन फुल्ल २०० वर. बाहेरच्या कॅरमलायझेशन साठी.
वाटीत ब वाला सॉस आहे.
ब).
मॅरिनेशन केल्यानंतर भांड्यात खाली जे काय लिक्विड उरते, त्यात थोडा गूळ अन पाणी घालून एका पॅन मधे शिजवून "रिड्यूस" करा. म्हणजे आटवायचं आहे. चव घेऊन हवं तसं तिखट/मीठ/गूळ इ. अॅड करा.
भात किंवा तुमच्या आवडीच्या नूडल्स, + प्लस तुमचे चिकन्+बटाटा वेजेस, हवे असतील तसे कोबी/बीन्स् /ब्रोकोली/इ. भाज्या स्टर फ्राय + हा सॉस, हवा तसा. थोडासाच बनेल पण लय भारी बनतो. अन पुरतो. तो ओता.
आणि
क).
हाणा!
हा फोटो एयरफ्रायर पॉटचा आहे. खाली अॅल्युमिनियम फॉइलची बशी बनवली, तर ज्यूसेस खाली सांडत नाहीत. ही एक्स्ट्रा टिप.
मस्त पाककृती आहे . तोंपासू.
मस्त पाककृती आहे . तोंपासू.
( पहिला फोटो चांगलाय , पण अजून जरा व्यवस्थित प्रेझेंटेशन हवे होते त्यामुळे ९/१० मार्क. एक गुण कापलेला आहे )
सोपी आणि मस्त पाककृती!
सोपी आणि मस्त पाककृती!
भारी तों पा सु एकदम..!!
भारी तों पा सु एकदम..!!
जिरं दोन दा झालंय.
जिरं दोन दा झालंय.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
( पहिला फोटो चांगलाय , पण
( पहिला फोटो चांगलाय , पण अजून जरा व्यवस्थित प्रेझेंटेशन हवे होते त्यामुळे ९/१० मार्क. एक गुण कापलेला आहे )
<<
रेस्पी सगळी एफ्रा मधली आहे.
पॅनमधे सॉस रिड्यूस केल्यानंतर खाली जो काय कॅरामेलाइज्ड गुडनेस उरतो ना, तो चाटून पुसुन खाण्यासाठी पॅनमधे चिकन ओतलंय. :फिदि:
त्या चवीपुढे प्रेझेंटेशनच्या नानाची टांग!
मस्त! करून बघायला पाहिजे. एअर
मस्त! करून बघायला पाहिजे. एअर फ्रायरशी झटापट मीही करतो (त्यामुळे फॉईल वापरण्यातले दुहेरी फायदेही खूप लौकर जाणवले आहेत - ग्रेव्ही व इतर गोष्टी न सांडणे व नंतरची साफसफाई फारशी न करावी लागणे
) त्यामुळे करून बघता येइल.
बाकी हे तुमच्या राजकीय पोस्ट्सारखे झाले. मुद्दा योग्य, प्रेझेण्टेशन, नॉट सो मच![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान रेसिपी...
मस्त रेसिपी...
छान दिसतेयं चिकन..!
छान, आणि सोपी पाकृ.
छान, आणि सोपी पाकृ.
जिरं दोन दा झालंय. > मला वाटलं आधीचं न भाजलेलं आणि नंतरचं भाजलेलं दोन्ही हवेत, मे बी इट्स द सिक्रेट ऑफ द टेस्ट.
तसंही चालेल.
तसंही चालेल.
त्या चवीपुढे प्रेझेंटेशनच्या
त्या चवीपुढे प्रेझेंटेशनच्या नानाची टांग!>>>
फारएण्ड >>> सही पकडे हय![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
काय दिसतोय लेगपीस.मस्त.
काय दिसतोय लेगपीस.मस्त.
तोंडाला पाणी सुटले ते बघून..
तोंडाला पाणी सुटले ते बघून.. आणखी काय असते प्रेझेंटेशन
बघितल्यावर तुटून पडावेसे वाटायला हवे, नुसते बघत बसावेसे नाही वाटले पाहिजे
बाकी लेगपीसचा आकारच निसर्गाने असा बनवला आहे ना, की तो शेप बघूनच निमुळता भाग हातात पकडून गुबगुबीत भागाचा पटकन एक चावा घ्यावासा वाटतो.
वरचे वाक्य वाचून माझ्या एका
वरचे वाक्य वाचून माझ्या एका चावट मित्राच्या साहसकथा आठवल्या
फ्रीझमधे चिंचगुळाची चटणी आहेच
फ्रीझमधे चिंचगुळाची चटणी आहेच.त्यत आले किसून आणि तिखट वाढवून हे चिकन करण्यात येईल.फॉईलची आय्डिया मस्त आहे.मग ओटीजीऐवजी पॅनमधेच फॉईल्ड चिकन ठेवेन.
चिंच गुळा तली कोंबडी म्हणा की
चिंच गुळा तली कोंबडी म्हणा की. मी हे लिंबूरस घालून करते. पहिला फोटो खाउन उरलेली प्लेट असे वाट्ते आहे. दुसरा अगदी एक्स्ट्रीम क्लोज अप आहे. पण तुमची स्टाइल ती. अव्हन फिवन नसेल एअर फ्राय र वगैरे तरी ग्रिल पॅन मध्ये हे बनवता येइल.
छान. करून बघतो.
छान. करून बघतो.
मला चिकन किती शिजलं की बास करायचं अजिबात समजतं नाही आणि मग ते फ्लेकी बनतं. कच्चं नको राहायला म्हणून जरा ठेवू नडते. मीट थर्मामीटर घेऊन बघणारे, त्याआधी काही सोपी युक्ती आहे का?
चिंच गुळा तली कोंबडी म्हणा की
चिंच गुळा तली कोंबडी म्हणा की.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
<<
खरं तर तेच आहे. पण जरा इंग्रजी नाव दिलं की प्रेझेंटेशन चे मार्क मिळतात
*-
पहिला फोटो खाउन उरलेली प्लेट असे वाट्ते आहे
<<
ती सॉस बनवलेली फ्राइंग पॅन आहे. त्यात एफ्रामधून डायरेक्ट काढून फोटो काढलाय.
**
अमितव,
मीट थर्मामीटर असला तरी कोंबडीचा बट्ट्याबोळ करणारे लोकही आहेत.
हॉटेलमधे ते लोक स्टेप बाय स्टेप भाजतात. अगदी तंदूरी चिकन देखिल अर्धवट भाजून टांगून ठेवलेले असते. तसं थोडं कमी भाजून मग दुसरी स्टेज असं करता येतं. बेसिकली थोडं बोन्सपासून मोकळं व्हायला लागलं की होत आलं असं समजायचं. पीसला खोल चिरे दिले असलेत तर आतपर्यंत नीट शिजतं नाहीतर कच्चं रहातं. जाड मोठे पिसेस असले तर असं होतं. ओव्हनमधलं मीट 'रेस्ट' केलंच पाहिजे. मग नीट होतं.
अन हो, कच्ची कोंबडी खाल्ली की सल्मोनेला होऊन मेलाच असला प्रकार मी तरी फक्त ऐकलेलाच आहे. तेव्हा थोडी अंडर राहीली तरी चालते. आतील भाग अंडर कुक्ड वाटली तर सरळ पीस चिमट्यात धरून गॅसच्या ओपन फ्लेमवर धरा. मस्त भाजली जाते. हळु हळू जजमेंट येतं.
मग ओटीजीऐवजी पॅनमधेच फॉईल्ड
मग ओटीजीऐवजी पॅनमधेच फॉईल्ड चिकन ठेवेन.
<<
फॉइल मधे गुंडाळून नाही ठेवले. तसे केले तर चिकन शिजते, पण क्रिस्पी भाजल्याचा इफेक्ट येत नाही.
एयरफ्रायर पॅन ला खाली छिद्रं असतात. त्यातून मीट ज्यूसेस खाली गळून नंतरची साफसफाई वाढते. म्हणून फॉईलची बशी करून त्यात चिकन अन बटाटे भाजायला ठेवले होते.