..
साधारण 1 लहान जुडी कोथिंबीर,
10 पाकळ्या लसूण
1 कांदा
1 तुकडा आले किसून
2 हिरवी मिरची
2 चमचे लोणी
चवीनुसार मीठ साखर
1 चमचा मिरपूड
2 चमचे लिंबू रस
2 लहान चमचे तांदूळ पीठ / कॉर्नफ्लोअर ( थिकनेस साठी हवे असल्यास )
1. 4 वाटी पाणी उकळत ठेवावे..
2. कोथिंबीर स्वच्छ धुवून , देठा सहित या उकळत्या पाण्यात टाकायची..
3. 5 मिनिट उकळून घेऊन गॅस बंद करायचा..
4.एका पातेल्यात हे मिश्रण गाळून घ्यावे..खाली पाणी येईल ते ठेवून द्यावे, आणि गाळण्यावर जी कोथिंबीर राहते, ती मिक्सर ला बारीक लावून घेणे..
5.लसूण चे बारीक तुकडे,मिरची चे तुकडे, कांदा तुकडे करून घेणे..मिरपूड तयार करून घेणे..
6. कढई गॅसवर ठेवा..त्यात लोणी घालायचं..ते वितळल की लसूण तुकडे,कांदा , आले ,मिरची घालून 2 ते 3 मिनिट परतून घेणे...त्यावर , गाळून उरलेले पाणी ( कृती क्र 4 मध्ये केले आहे) घालायचे...त्यातच मिक्सर वर फिरवून घेतलेली कोथिंबीर ची पेस्ट घालावी...
7. चांगले ढवळून घ्यावे..जर जास्त पातळ वाटले,तर दाटपणा येण्यासाठी, 1ते 2 चमचे तांदूळ पीठ पाण्यात पेस्ट करून ,यात घालावे...
8. चवीनुसार मीठ, साखर घालायची..
9.4 ते 5 मिनिट उकळून घ्यावे..
10. वरून लोणी मिरपूड घालून गरमच सर्व्ह करा..
Healthy tasty yummy soup ready!!
..
## कोथिंबीर सहज उपलब्ध होते..त्यामुळे करायला जमेल आणि लहान मुले , वयस्कर व्यक्ती याकरिता चविष्ट पदार्थ..
छान
छान
छान वाटते आहे कृती.
छान वाटते आहे कृती.
मस्त आहे कृती..
मस्त आहे कृती..
छान. करून पहाणार
छान. करून पहाणार
मस्त
मस्त
2 चमचे लिंबू रस??
2 चमचे लिंबू रस??
आंबट करायचं सूप?
2 चमचे रस सगळ्यांसाठी आहे..
2 चमचे रस सगळ्यांसाठी आहे...एक बाऊल सूप साठी नाही...
वरच्या साहित्यात साधारण 6 ये 7 बाऊल सूप तयार होते..त्याला एवढं रस लागलाच मला...जास्त आंबट नाही होत...
एक शन्का.
एक शन्का.
कोथिम्बीर = इम्युनिटी बूस्टर, याला "इम्युनिटी" हा शब्द मानणार्या कोणत्याही (पियर रिव्ह्यूड) मेडिकल जर्नलचा संदर्भ देणार काय?
"किडनीच्या आजारांत कोथिंबीर उत्तम. इम्युनिटी वाढून आपले फार भले होईल." हे वाक्य बरोबर आहे काय?
साहेब , पाकक्रुती उत्तम असणे, चव सुंदर असणे हे वेगळे अन अमुख खाणे = इम्युनिटी बूस्टर, अमुक आजार बरा कर्णार वगैरे भोंदूगिरी कशाला हविये त्यात? स्वत:सोबत इतरांना मूर्ख का बनवताहात? :रागः
***
लेमन कोरिएंडर सूप ची रेस्पी म्हणा. सोप्पं पडेल
साधी सायकल पंक्चर झाली तरी
साधी सायकल पंक्चर झाली तरी घरी काढता येत नाही तुम्हाला, पंक्चर वाला लागतो. अख्खा जीव रिपेयर करायला डाक्टरकी कशाला करता घरी बसून अमुक खा अन तुमुक खा करून?
आ रा रा +१२३४५६७८९
आ रा रा +१२३४५६७८९
यातला नेमका कोणता घटक immunity वाढवतो ते सांगणार का?
इम्युनिटी म्हणजे काय ते जरी
इम्युनिटी म्हणजे काय ते जरी योग्य प्रकारे सान्गितलं तरी पुरेल मला. सुखाने डोळे मिटेन, ३०+ वर्षे डॉक्टरकी करून *क मारली म्हणून.
यातला नेमका कोणता घटक
यातला नेमका कोणता घटक immunity वाढवतो ते सांगणार का?
<<
२ चमचे लिंबाच्या रसातलं क जीवनसत्व !
हुस्शरै ना मी? :माझी लाल सांगणार्या माकडाची भावली:
(No subject)
सूप हे अपेटायझर आहे
सूप हे अपेटायझर आहे
त्यामुळे भूक वाढते
म्हणून मग मनुष्य चौरस आहार खातो
त्यामुळे इम्युनिटी वाढते
चौरस आहार भरपेट खाल्ले की झोप येते
मग मनुष्य घरीच लोळत पडतो
जास्त बाहेर न फिरल्याने इन्फेक्शन होत नाही
त्यामुळे इम्युनिटी मेंटेन रहाते
पण सूप बनवणे ही एक कला आहे
पण सूप बनवणे ही एक कला आहे
आम्हाला आजवर कशाचेच सूप करणे जमले नाही
हे जरा सोपे वाटते, करून बघू
"सूप हे अपेटायझर आहे"
"सूप हे अपेटायझर आहे"
<<़
जांमोप्या, एवढ्या एकाच चुकीच्या वाक्याबद्दल रॅगिंग घेऊ का तुमची?
ज्यांना वेळ असेल आणि करावेसे
ज्यांना वेळ असेल आणि करावेसे वाटेल त्यांनी करून प्यावे...
ज्यांना फक्त " नाव " असे का दिले यावर चर्चा करायची असेल तर त्यांनी ती चालू ठेवावी...
...आणि मी ही पोस्ट " पाककृती " मध्ये टाकलीय...सो..त्याची रेसिपी महत्त्वाची...नाव काहीपण म्हणा..
आणि जरी , "" immunity booster ""असे म्हणून, हे सूप जर कुणी करून प्याले, तर त्याला फायदाच होईल...नुकसान
नक्कीच नाही..
...बाकी प्रतिसादा बद्दल धन्यवाद...
..
आणि मी मेडिकल क्षेत्रात
आणि मी मेडिकल क्षेत्रात नाहीये..सो, medical चे संदर्भ नाही सांगता येणार..
बाकी रेसिपी बद्दल शंका असेल तर जरूर सांगेन..
नुकसान
नुकसान
नक्कीच नाही..
<<
स्पष्ट शब्दात शुद्ध डॉक्टरी सल्ला सांगतो : मूर्ख आहात.
नुकसान होईल, म्हणूनच इथे प्रतिसाद दिला आहे.
माबोवर पाककृती मी भरपूर लिहिल्या आहेत. अन इथे डॉक्टरी ज्ञान पाजळण्याचा मक्ता मजकडे आहे. कोथिंबीर शरीराला केव्हा अन कशी घातक असते हे माहिती नसेल तर आपले काँम्प्युटराइज्ड ज्ञान पाजळू नका, ही नम्र विनंती.
ते टायटल एडिट करा. "चविष्ट कोथिंबीर सूप" वगैरे छान राहील.
@अॅडमिन, असल्या मिसलिडींग इन्फर्मेशन्स देणे थाम्बवता येईल का माबोवर?
कोथिंबीर शरीराला केव्हा अन
कोथिंबीर शरीराला केव्हा अन कशी घातक असते हे माहिती नसेल>>> या बद्दल सविस्तर माहिती द्याल का? रोजच्या जेवणात कोथिंबीर असतेच असते. पण कोथिंबीरीचे दुष्परीणाम आहेत हे माहित नव्हते.
नवीन Submitted by अंजली on 16
नवीन Submitted by अंजली on 16 June, 2021 - 22:19
<<
मायबोली शोध सुविधा.
ही चर्चा होऊन गेलेली आहे.
कोथिंबीर शरीराला केव्हा अन
कोथिंबीर शरीराला केव्हा अन कशी घातक असते>>>>
मी पण विचारणार होते , मी तर सगळ्याच पदार्थांवर भरपूर कोथिंबीर टाकते.
ही चर्चा होऊन गेलेली आहे.>>>>
ही चर्चा होऊन गेलेली आहे.>>>>>
ओके धन्यवाद.. पाहते.
मायबोली शोध सुविधा.>> ओके.
मायबोली शोध सुविधा.>> ओके. माझ्या वाचनात आलेली दिसली नाही. शोधून बघते, मिळाली तर लिंक इथेच देईन. नाहीतर तुम्ही सांगालच.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/48273
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/48273 ही एक सापडली. पण यात कोथिंबीर घातक असल्याची माहीती मिळाली नाही.
किडनी स्टोन अथवा किडनीच्या विकारांवर कोथिंबीर्चे पाणी उपयोगी पडते अशा कुठलाही शात्रीय, मेडीकल आधार नसलेली माहिती आहे त्या धाग्यात.
नुकसान होईल, म्हणूनच इथे
नुकसान होईल, म्हणूनच इथे प्रतिसाद दिला आहे....
कृपया लिंक द्यावी...
जनरली आपण सगळ्या पदार्थात कोथिंबीर वापरतोच...
त्याच संदर्भाने , इथे सूप ची रेसिपी दिलीये...
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/48273
https://www.maayboli.com/node/46932
रच्याकने. इब्लिस ही माझी मागच्याच्या मगच्याच्या मागल्या जन्मातली आयडि आहे. साती या देखिल एमडी मेडिसिन अॅलोपथिक "अँटि नॅशनल" लुटारू/दुष्ट वगैरे आहेत. सुबोध खरे हे रेडिऑलॉजिस्ट आहेत. इत्यादि.
आरारांशी सहमत. नुसतं चविष्ट
आरारांशी सहमत. नुसतं चविष्ट कोथिंबीर सूप वगैरे म्हणा की. इम्युनिटी बुस्टर वगैरे लेबल लावून लोकांना भुलवायचं कशाला? वॉट्सअॅप करतंय ते काम. तुमची भर कशाला त्यात?
मी कुठेतरी वाचलेली ही माहिती
मी कुठेतरी वाचलेली ही माहिती आहे, त्याचा पडताळा घेतलेला नाही पण करून पहायला काहीच हरकत नाही कारण यात घातक काहीच नाही..
<<
एक शंका विचारू?
बाकी बाबतीत तुम्ही शुअर नाही आहात.
पण,
"यात घातक काहीच नाही.."
हे कशाच्या जोरावर म्हणताहात? काही पडताळा/रिसर्च/वाचन/पुरावा/विदा इत्यादी?
Submitted by इब्लिस on 5 January, 2014 - 00:00
<<
This is the gist of the matter.
रोज अमुक गोष्ट खातो म्हणून त्यात घातक काहिच नाही. तोटा नाहीच, हे म्हणणे तद्दन मूर्खपणाचे असू शकते हे आपल्या आकलनात आणले, तर बरे असते. प्लीज च नोट.
Pages