Submitted by MSL on 9 June, 2021 - 10:57

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
1. 2. वाट्या चिरलेली टाकळा भाजी..
2. अर्धी वाटी पावटे
3. 5 - हिरव्या मिरच्या
4. तेल हिंग हळद जिरे मोहरी फोडणीसाठी
5. मीठ चवीपुरते..
6. गूळ
7. अर्धी वाटी ओले खोबरे
क्रमवार पाककृती:
1. कढई गरम करून त्यात पावटे चांगले पिवळसर होईपर्यंत भाजून घ्यावे..
2. त्यात 2 वाटी गरम पाणी घालून एका डब्यात, आणि दुसऱ्या डब्यात चिरलेली टाकळा भाजी असे कूकर ला लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यावा..
3. कुकर गार झाल्यावर , टाकळा भाजी चे पाणी , पिळून काढून टाकावे...
4..कढईत तेल गरम करावे...जिरे मोहरी हिंग हळद घालून ,हिरवी मिरची घालावी..त्यावर शिजलेले पावटे ,गुळ घालावा..
वर पालेभाजी घालून परतून घ्यावे..चवीनुसार मीठ घालायचं...ओले खोबरे घालून 2 मिनिट वाफ काढावी..
5..भाजी भाकरी पोळी सोबत खावी...
वाढणी/प्रमाण:
3 ते 4
माहितीचा स्रोत:
सासारेबुवा
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा!
वा!
मस्त भाजी आहे .
मस्त भाजी आहे .
अरे वा! वेगळी पद्धत आहे.
अरे वा! वेगळी पद्धत आहे. आमच्याकडे बहुतेक पीठ पेरून करतात. कित्येक वर्षांत खाल्ली नाही.
छान
छान
मस्त! नुसत्या भाजीचा फोटो
मस्त! नुसत्या भाजीचा फोटो असेल तर तो पण टाका ना लेखात. बाजारात भाजी ओळखणे सोपे जाईल.
छान आहे रेसिपी.. जिज्ञासा
छान आहे रेसिपी.. जिज्ञासा म्हणते तस नुसत्या भाजीचा पण फोटो टाका..
आंम्ही याला टायकुळा म्हणतो...
आंम्ही याला टायकुळा म्हणतो... याच्या बियांची पावडर आमचं ऑफीस export करतं. (Cassia Gum Powder)
प्रचि.. नेटवरुन घेतला आहे.
छान रेसिपी. आम्ही याला तरोटा
छान रेसिपी. आम्ही याला तरोटा म्हणतो
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/9351 इथे जागुने लिहीली आहे.
MSL धन्यवाद छान कृती आहे. जागु व तुमच्या पद्धतीने करुन बघता येईल.
Screenshot_20210610_201505
Screenshot_20210610_201505.jpg (55.71 KB)

फोटो टाकला आहे ..
फोटो टाकला आहे
..
माझ्या माहेरी पण टाय काळा
माझ्या माहेरी पण टाय काळा असेच म्हणतात...
जिज्ञासा च्यां जिज्ञासेपोटी फोटो काढताना एक समजल... टाकळा आणि टाकळी असे 2 प्रकार असतात..आपण टाकळा असतो त्याची भाजी करायची.. टाकळी नाही घ्यायची...
....आमच्याकडे फार पूर्वीपासून काम करणाऱ्या शेतकरी माणसाने दिलेली माहिती...
ही भाजी रस्त्याच्या कडेने,
ही भाजी रस्त्याच्या कडेने, मोकळ्या प्लॉटस मध्ये पावसाळ्यात आपोआप उगवून येते तशी दिसतेय. टाकळा च म्हणतो पण भाजी करतात माहिती नव्हतं.
जाड हिरवी देठ असतात तो टाकळा.
जाड हिरवी देठ असतात तो टाकळा...
आणि बारीक जराशी कडाक देठ असतात ती टाकळी...
IMG_20210610_202633.jpg (524
IMG_20210610_202633.jpg (524.96 KB)
धन्यवाद भावना, रश्मी, MSL,
धन्यवाद भावना, रश्मी, MSL, फोटोसाठी!
MSL, टाकळा टाकळी ही नवीन माहिती पण उपयोगी आहे.
आज बघितली बाजारात हि भाजी ..
आज बघितली बाजारात हि भाजी .. पण पाने जरा मोठी जाड होती म्हणून नाही आणली.. कोवळी असेल तर फार कडू नसते.. आमच्याकडे चण्याची डाळ थोडी जाडसर वाटून त्यात हि पाने चिरून घालून ह्याचे वडे करतात ( डाळवडे असतात तसे ) त्याला टायकीला आंबाडो म्हणतात.. ( कोंकणीमध्ये आंबाडो म्हणजे वडा )
फोटो बद्दल thank you .बघते
फोटो बद्दल thank you .बघते कुठे मिळती का
टायकीला आज सोसायटी गार्डन