![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2021/06/06/Screenshot_20210606_145320.jpg)
1 वाटी खजूर
1 वाटी अंजीर
अर्धा वाटी बदाम
अर्धा वाटी काजूगर
अर्धा वाटी बेदाणे
2 चमचे साजूक तूप
1. खजूर मधील बिया काढून ,मिक्सरवर फिरवून घ्यावा
2.अंजीर चे तुकडे करून मिक्सर ला फिरवून घ्यावा..
3. 1 चमचा तूप मंद आचेवर गरम करून त्यात काजू बदाम परतून घ्यावे..गॅस बंद करावा...जरा गार झाले की त्याचे तुकडे करून घ्यावे..
4. गॅसवर कढई ठेवून 1 चमचा तूप घालावे...गरम.झाले की त्यात, खजूर - अंजीर चा चुरा घालायचं...आच मंद ठेवून चांगले परतून घेणे..3 ते 4 मिनिट परतून झाले की त्यात काजू बदाम तुकडे घालायचे...चांगले.मिक्स करून गॅस बंद करावा..
5. हे मिश्रण जास्त थंड होण्याआधी , म्हंजे जरा गरम असतानाच लाडू वळावे..वळताना बेदाणे घालावे..
++ काजू बदाम ची पूड केली तरी चालेल..घरात खाणारी माणसं कुठल्या वयाची आहेत त्यानुसार...
++ यामध्ये खसखस ,पिस्ता तुकडे देखील वापरू शकतो...
छान.
छान.
मी पण एकदा बनवले होते असे काजू बदाम पुड करून.. छान लागतात.
छान!
छान!
छान.
छान.
मस्त
मस्त
सोपी आणि healthy रेसिपी
सोपी आणि healthy रेसिपी