एका पुतळ्याचे रहस्य
©प्रसाद शेज्वलकर
आपल्या पैकी बर्याच जणांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ या स्टेशनला कधीना कधीतरी भेट दिली असेल. या स्टेशन चे पुर्वीचे नाव ‘बोरीबंदर’, नंतरचे नाव’ व्हिक्टोरिया टर्मिनस ‘आणि आताचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ‘. या स्टेशनला व्हिक्टोरिया राणीने कधीही भेट दिली नव्हती किंबहुना भारतालाच कधीही या राणीने भेट दिली नव्हती. बोरीबंदरचे पहिले स्थानक लाकडी इमारतीत होते, सध्याची इमारत एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी बांधली. इमारती वरील नक्षीकाम जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चे डीन ग्रिफीथ्स यांच्या देखरेखीखाली झाले. बांधकाम 1878 साली सुरू झाले, ते 1888 मधे पूर्ण झाले. 1887मधे व्हिक्टोरिया राणीची ज्युबिली झाली त्यानिमित्ताने बोरीबंदर स्टेशनला राणीचे नाव दिले.
मुंबईचा वृत्तान्त या पुस्तकातले व्हि. टि. स्टेशनचे वर्णन "स्टेशनचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे, बाजूच्या कुंपणावर वाघ व सिंह यांची भव्य शिल्पे आहेत. मधल्या चौकातल्या दर्शनी भागावर वर्तुळाकृती दगडी कोदण आहे त्यात सर जमशेदजी जिजीभाँय, लाँर्ड एलफिस्टन, लाँर्ड रे, माऊंट स्टुअर्ट एलफिस्टन, सर बार्टल फ्रियर, नाना शंकरशेठ यांचे मुखवटे कोरले आहेत. बाजूच्या कोपऱ्यात भारतातली निरनिराळ्या जमातींच्या प्रातिनिधिक पुरुषांचे मुखवटे कोरले आहेत. वरच्या घुमटाखाली साडे आठ फूट व्यासाचे घड्याळ बसविले आहे. घड्याळाखाली साडेसात फूट उंच व्हिक्टोरिया राणीचा पुतळा आहे. घुमटाच्या शिरोभागी प्रगतीचा निर्देशक असा साडेसोळा फूट उंचीचा पुतळा आहे. "
आताही या सगळ्या गोष्टी अशाच आहेत ,फक्त घड्याळाखालील व्हिक्टोरिया राणीचा पुतळा गायब आहे. माहितीच्या अधिकारात इंडियन एक्सप्रेस च्या वार्ताहराने या पुतळ्या संदर्भात रेल्वे कडे चौकशी केली त्यावेळी हा पुतळा कधी इथून हलवला याची काहीही माहिती रेल्वेकडे नव्हती. रेल्वेच्या एका निवृत्त जनरल मँनेजरच्या माहीती नुसार "1950 मधे सरकारने सरकारी इमारती तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेले ब्रिटिश राज्यकर्त्यांचे पुतळे काढून टाकले. यापैकी बरेच पुतळे राणीच्या बागेजवळील भाऊ दाजी लाड म्युझियमच्या बाहेर मोकळ्या जागेत हलविले. तिथे राणीचा पुतळा 1980 पर्यंत होता, त्यानंतर तो कधीही दिसला नाही."
जेव्हा वार्ताहराने भाऊ दाजी लाड म्युझियम कडे या पुतळ्यासंदर्भात चौकशी केली त्यावेळी त्यांनी राणीचा बसलेल्या स्थितीतील पुतळा दाखविला. म्युझियमच्या लोकांनी त्यांच्याकडे राणीचा व्हि. टी. स्टेशनवरील उभ्या स्थितीतील राणीचा पुतळा कधीही आला नसल्याचे सांगितले.
त्यामुळे या पुतळ्याचे काय झाले असावे?
Ref-: Indian express news dtd.21 Dec.2015 by Kalpana Verma
छान
छान
बातमी म्हणून ठीक आहे पण व्ही
बातमी म्हणून ठीक आहे पण व्ही टीचे जुने फोटो पाहून बरे वाटले.
त्या वरच्या प्रगती च्या
त्या वरच्या प्रगती च्या पुतळ्यावर वीज पडून तो भंगला होता
JJ स्कुल ऑफ आर्टस् च्या लोकांनी तो परत सांधला.
ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा एक
ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा एक VT स्टेशन आहे,
पण मुंबईच्या VT पेक्षा कमी शानदार,
दोन्ही नकाशांची कामे इंग्लंडात पूर्ण झाली, मात्र पाठवताना घोळ झाला आणि तिकडच्या स्थानकाचा प्लॅन इकडे आला ,
अशी काहीशी अविश्वसनीय वाटणारी गोष्ट या स्थानकबद्दल ऐकली होती. कोणाला जास्त माहिती असेल तर कृपया सांगा
बहुदा तसे नसावे ,व्हीटी
बहुदा तसे नसावे ,व्हीटी स्टेशन हे ब्रिटिश आर्किटेक फेर्ड्रिक विल्ल्यम स्टिव्हनन्स ने डिझाईन केले होते.
हॉटेल ताज बद्दल ही असेच ऐकले
हॉटेल ताज बद्दल ही असेच ऐकले आहे
ब्रिटनमध्ये बसून आर्किटेकटने काम केले , पण डावी उजवी बाजू की कायतरी चुकले आणि प्रत्यक्ष हॉटेल बघून त्याने आत्महत्या केली म्हणे
Some believed it was built backwards.
Jamshedji Tata wanted the hotel to face away from the harbour because he wanted the rooms to be sea-facing, which was never seen in Indian hotels before then. This is perhaps why people believed that the Taj Mahal Palace hotel was accidentally built backwards. Some stories suggest that the architect committed suicide when he realised the mistake.
https://www.vagabomb.com/10-Interesting-Facts-You-Probably-Didnt-Know-ab...
हि एक दन्तकथा आहे .ताज हॉटेल
हि एक दन्तकथा आहे .ताज हॉटेल चे आर्किटेक सीताराम खंडेराव वैद्य होते .
पण ते अर्धे काम करून गेले ना
पण ते अर्धे काम करून गेले ना ?
ब्लॅक कॅट बहुदा तसे नसावे
ब्लॅक कॅट
बहुदा तसे नसावे
हॉटेल बांधले तेव्हा मागे काहीही नव्हते, अगदी गेट वे सुद्धा नाही, त्यामुळे हॉटेल सिटी कडे तोंड करून असणे सयुक्तिक आहे.
तो बसलेला पुतळा ओव्हरसीज
तो बसलेला पुतळा ओव्हरसीज कम्युनिकेशन सेंटरच्या चौकात म्हणजे एम जी रोडच्या सुरुवातीक्या चौकात होता. १९४२ च्या चळवळीत त्याला डांबर फासले गेले होते आणि पुतळ्याचे नाकही कापले गेले असावे बहुधा . ते नक्की कधी ते आठवत नाही. पण तो पुतळा उशीरा हलवला गेला.
ताजमहाल हॉटेल संबंधी असे वाचले होते की बंदरात शिरणाऱ्या बोटींतल्या प्रवाशांना ताजमहाल इमारतीचे सुंदर दर्शन घडावे म्हणून ती इमारत सागरसन्मुख अशी बांधली गेली.
असे काही वाचले की मनात काही
असे काही वाचले/ बघितले की मनात काही वैषम्यही दाटून येते..... ! एक कलाकार म्हणून, एक हिंदू म्हणुन
अन तरीही, मन निश्चित नि:ष्कर्षा पर्यंत येत नाही, असो!
महादेव मालिका बघितली, तर बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात