1 कैरी चा गर
1 वाटी ओले खोबरे
लाल सुक्या मिरच्या 4
गुळ 1चमचा
मेथी दाणे 4-5
मीठ
हिंग
जीरे
हळद
तूप फोडणीसाठी
१: कैरी वाफवून. गार करून,मग त्याचा गर काढून घ्यावा..
2. ओले खोबरे कोमट पाणी घालून मिक्सरला लावून त्याची रस काढून घ्यावा..( नारळाचे दूध)
3. कढईत तूप फोडणीसाठी घालावे...त्यात जिरे , हिंग, हळद मेथीचे 4 दाणे, असे घालावे...त्यावर कैरीचा गर मॅश करून घालावा...n 2 मिनट झाकण टाकून ठेवावे...नंतर त्यात गूळ n मीठ आणि, 1 ते दीड वाटी पाणी घालून चांगल उकळत ठेवावे..
4. 3-4 मिनिट उकल्यावर नारळाचा रस घालायचा...1 ते 2 मिनिट ढवळायचे....उकळायचे नाही..
5 : गरम झाले की वरून तूप हिंग जिरे लाल सुक्या मिरच्या याची फोडणी द्यावी..
6..गरमागरम सार तयार..भात किंवा डाळ खिचडी बरोबर सर्व्ह करा...
## नारळाचा रस घालायच्या अगोदर जे सार तयार होते, ते तसेही पिऊ शकतो...पचन सुधारण्यास औषधी...
## कैरी चे प्रमाण आंबट पणा नुसार कमी जास्त करा
## गुळ पण जशी चव हवी असेल त्या प्रमाणात वापरावा..
हे आमच्या पद्धतीने https:/
हे आमच्या पद्धतीने https://youtu.be/aFv7F4aA_RE
तुमचेही छान आहे.
छान आहे
छान आहे
मस्तच लागते ही कढी.
मस्तच लागते ही कढी.
माझं फक्त मिरची आणि मेथ्यांची फोडणी दिलेलं व्हर्शन....
वाह मस्त आहे.
वाह मस्त आहे रेसिपी आणि फोटो.
माझे मन फोटो मस्तच.
मी करते पण ओलं खोबरं किंवा नारळाचं दुध नाही घालत.
जागू मस्त आहे youtube रेसिपी. मी साधारण अशीच करते पण एवढी जाडसर नाही, थोडी कमी आणि pulp हाताने कुस्करते. चौलच्या एका शेजाऱ्यांकडून शिकले.
मस्त आहे
मस्त आहे