
मोगर्याची ताजी फुलं : 25-30
पाणी : दोन लिटर
साखर : दोन-तीन साध्या वाट्या
केसर (ऑप्शनल)
मोगर्याची ताजी टवटवीत फुलं स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची. दुसर्या दिवशी ते पाणी फुलांसहित उकळायचं. पाण्याचं प्रमाण जवळपास निम्म होईल इतका वेळ. मग त्यात साखर घालायची. केसर टाकायचं. साखर पुर्णपणे विरघळली की गॅस बंद करायचा. थंड झालं की गाळून बाटलीत भरून फ्रीज मध्ये ठेऊन द्यायचं.
सर्व्ह करताना एक तृतीयांश हे सिरप आणि बाकी पाणी असं मिक्स करून सर्व्ह करायचं.
करायला अतिशय सोपं आणि चवीला अतिशय सुंदर असं हे सरबत करून पहायला हवं असं आहे. आपल्याकडे आपण फुलांचा स्वयंपाकात फार कमी (शक्यतो नाहीच) उपयोग करतो. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही फुलं शेवटी निर्माल्य बनून जातात. मोगरा खूप थंड आणि स्कीनसाठीही खूप उपयोगी आहे. प्रतिकारशक्तीही त्याने वाढते.
मला या सरबताची कृती गोव्याच्या प्रसिद्ध फॉटोग्राफर असावरी कुलकर्णी यांच्याकडून समजली. त्यांच्या organic food recipes अतिशय सुंदर असतात आणि त्या व्यक्ति म्हणूनही खूप भन्नाट आहेत.
मागच्या उन्हाळ्यात प्रथम मी हे सरबत बनवलं होतं. ते अतिशय अप्रतिम लागतं. मे महिन्यातल्या प्रखर उन्हावरचं हे रामबाण औषध आहे.
ज्यांच्या-ज्यांच्या घरी मोगरा आहे, त्या सर्वांनी अवश्य करून पहा
मोगऱ्या ची ताजी टवटवीत फुलं..
मोगऱ्या ची ताजी टवटवीत फुलं....पाण्यात उकळायला जीव धजणार नाही....!!
वेगळच आहे. ग्लासातील द्रव्य
वेगळच आहे. ग्लासातील द्रव्य अल्कोहोलिक वाटतेय
वेगळंच आहे. पिऊन बघितलं
वेगळंच आहे. पिऊन बघितलं पाहिजे.
छान दिसते आहे. मोगऱ्याचेही
छान दिसते आहे. मोगऱ्याचेही सरबत करतात ते आता कळले.
मला पण नवीन आहे माहिती.
मला पण नवीन आहे माहिती.
चांगलं वाटतंय.
मोगऱ्याचं पाणी माहितेय पण हे
मोगऱ्याचं पाणी माहितेय पण हे सरबत नव्याने कळले. छान
मोगऱ्याचं पाणी माहितेय पण हे
मोगऱ्याचं पाणी माहितेय पण हे सरबत नव्याने कळले > +१
उन्हाळ्यात वाळा आणि गुलाब यांचे सरबत पिल्याशिवाय जीवाला थंडावा नाही लाभत. मोगरा नाही आमच्याकडे सध्या पण जमल्यास हे सरबतपण आवडेल बनवायला.
मागच्या वर्षी रमा
मागच्या च्या मागच्या वर्षी रमा माधवरावांच्या सिरीयल मध्ये होती हि रेसिपी रमाबाईंच्या आईंच्या बऱ्याच रेसिपीज होत्या सिरीयल मध्ये.
कुठल्या चॅनेल वर ते आठवत नाही. कलर्स मराठी असेल.
सांज तुमची पण रेसिपी छान आहे.
मस्त! आमच्या एक आजी नेहमी
मस्त! आमच्या एक आजी नेहमी बनवायच्या. उन्हाळ्यात ताप वगैरे आला की हमखास प्यायला द्यायच्या.
स्वामिनी सिरीयल चं नाव आठवलं
स्वामिनी सिरीयल चं नाव आठवलं
मोगरा सरबत पहिल्यांदाच पाहतेय
मोगरा सरबत पहिल्यांदाच पाहतेय. केशर घातल्याने रंग ही छान आलाय. आम्ही ताजी फुलं माठात टाकतो. छान लागतं ते पाणी प्यायला.
भरपूर फूलं आहेत ..नक्की करेन
भरपूर फूलं आहेत ..नक्की करुन बघणार...
बाप रे मोगरा उकळायचा?
बाप रे मोगरा उकळायचा? नहीईईईईईईईईईईईईईईईईईई
सर्व प्रतिसादकान्चे आभार
सर्व प्रतिसादकान्चे आभार
छान. करून बघेन एकदा.
छान. करून बघेन एकदा.
फुलं मिळाली तर करून बघायला
फुलं मिळाली तर करून बघायला आवडेल. सुगंधाचे वेड आहे.
गुलाबाचा गुलकंद, रोझ् सिरप की
गुलाबाचा गुलकंद, रोझ् सिरप की कायसंसं करून खातात/पितात, मग मोगऱ्यान काय घोडं मारलंनित? बिनधास्त प्या हो! मोगरकंद होतो का बघायला पाहिजे.
एकदम नविन माहीती.
एकदम नविन माहीती.
गुलाबाचा गुलकंद, रोझ् सिरप की कायसंसं करून खातात/पितात, मग मोगऱ्यान काय घोडं मारलंनित?
>>>> तेच तर
इथे खूप मिळतो मोगरा. वीस
इथे खूप मिळतो मोगरा. वीस रूपये पावकिलो.
बनवून बघावे लागेल एकदा.
गुलाबाचा गुलकंद, रोझ् सिरप की
गुलाबाचा गुलकंद, रोझ् सिरप की कायसंसं करून खातात/पितात, मग मोगऱ्यान काय घोडं मारलंनित? बिनधास्त प्या हो! मोगरकंद होतो का बघायला पाहिजे >>>
मोगरकंद ला जाम हसले आहे.
मोगरकंद ला जाम हसले आहे.
सरबत छान वाटतं आहे,
पण इतक्या मोगर्यांना अॅक्सेस नसल्याने सध्या नुसते दर्शन सुख.
गुलाबाचा गुलकंद, रोझ् सिरप की
गुलाबाचा गुलकंद, रोझ् सिरप की कायसंसं करून खातात/पितात, मग मोगऱ्यान काय घोडं मारलंनित? बिनधास्त प्या हो! मोगरकंद होतो का बघायला पाहिजे. >>
अगदि अगदि :))
@धनुडी
@धनुडी
हो का.. मला माहीत नव्हतं. हो, पण स्वामींनी मध्ये अशा बर्याच जुन्या रेसिपींचा उल्लेख असायचा असं ऐकलंय. उदाहरणार्थ, ऊसाच्या रसामधलं पिठलं.
@मनिम्याऊ
हो देत असावेत उन्ह लागल्यावर वगैरे. फार थंड असतं हे. दोन ग्लास सलग पिले तर शिंका यायला लागतात.
@वावे, सोनाली, ऋतुराज, प्रणवंत, वर्णीता, आसा, मी_अनु
धन्यवाद
@लावण्या, मानव, अस्मिता, मृणाली
नक्की करून बघा आणि इथे शेअर पण करा.
@आंबट-गोड , सामो
मला खात्री आहे एकदा सरबत प्यायल्यावर तुम्ही आनंदाने मोगरा उकळाल
चिकन आणि मटण बनवताना कोंबडी
चिकन आणि मटण बनवताना कोंबडी आणि बोकड कापताना जीव बरा धजावत नाही.. मोगऱ्याने काय घोडे मारलंय...
भारी आहे सरबताची कल्पना...
भारी आहे सरबताची कल्पना... मोगर्याच्या सुवासानेच तरतरी येते तर त्याचं सरबत पिल्यावर कसं वाटेल या विचारानेच शिरशिरी आल्या सारखं झालं
शिवाय हे सरबत अत्तर म्हणुन पण वापरता येईल (अर्थात साखर न टाकता एखादी बाटली फ्रीज मधे ठेवता आली तर..!)
चिकन आणि मटण बनवताना कोंबडी
चिकन आणि मटण बनवताना कोंबडी आणि बोकड कापताना जीव बरा धजावत नाही.. >>> खाटिक कापतो ना त्यांना, आपण फक्त आणलेल्या मांसाचे तुकडे करतो. इथे सुंदर मोगरा अलगद हातात घ्या, मग त्याच्या सुगंधाने मोहीत व्हा, त्याच्या बद्दल काही आठवणी असतील तर तिथे थोडे रेंगाळा…. असं काही झाल्यावर पाण्यात उकळायला जीव कसा धजावेल.
डीजे , अत्तराची कल्पना मस्त
डीजे , अत्तराची कल्पना मस्त आहे. अमा याबाबत काही टिप्स देऊ शकतील.
(No subject)
डीजे, मी हा प्रयोग गुलाबांवर
डीजे, मी हा प्रयोग गुलाबांवर केला होता, अनिष्का च्या पद्धतीने गुलाबजल केलेलं. सुगंधित होतं. पण मी ते चुकून फ्रिजबाहेर ठेवलेलं. 8,10 गावठी गुलाबाचं. छोटी स्प्रे ची अर्धी बाटली भरलेली. मी जपून जपून वापरत होते लगेच समपेल म्हणून . मध्ये 2 दिवस वापरलं नाही . 6/7 दिवसात त्याला बुरशी आली. दुसरं फ्रीज मध्ये ठेवलं ते छान टिकलं.
अरे वा वर्णिता.. तुम्ही तर
अरे वा वर्णिता.. तुम्ही तर एकावर एक फ्री योजना दिलीत. धन्यवाद
Pages