फ्लॉवरचा एक गड्डा
२ चमचे बेसन
२ चमचे घट्ट दही
१ चमचा तेल
१ चमचा कसुरी मेथी बssssरीक चुरून
२ मसाल्याचे चमचे तंदुरी चिकन मसाला
१ मसाल्याचा चमचा प्रत्येकी धणे पूड, जिरे पूड, हळद आणि तिखट
१ छोटा चमचा प्रत्येकी आले आणि लसूण पेस्ट
चवीप्रमाणे मीठ
फ्लावरचे तुरे काढून नीट धुवून, निथळून ठेवावेत. बेसन कोरडंच भाजून त्यात मीठ वगळता इतर सर्व जिन्नस घालून नीट फेटून घ्यावं. फ्लावरचे तुरे त्यात घालून ते मिश्रण सगळ्या बाजूनं लागेल असं हलवून घ्यावं. झाकण घालून फ्रिजमध्ये ठेवावं. तासाभरानं मीठ घालून पुन्हा मिसळून मग तेलाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये ते तुरे ठेवून हाय ब्रॉइलवर ग्रिल करावेत. ७-८ मिन. एका-एका बाजूनं असे १५-१६ मिनिटांमध्ये झाले.
इथे भारतीय रेस्टॉरन्टमध्ये सिझलर पॅनमध्ये पनीर टिक्का आणि इतर ग्रिल्ड भाज्या मिळतात अगदी तशी चव येते.
हेच मॅरिनेशन वापरून पनीर, चिकन, *ब्याडवर्ड*टाटे, मिक्स व्हेजी ग्रिल करता येतील. ग्रिलिंगचा वेळ कमी-जास्त होइल मात्र.
एका फ्रेन्डकडे याच पद्धतीनं
एका फ्रेन्डकडे याच पद्धतीनं केलेल्या चिकनची सगळ्यांनी फारच तारीफ केली म्हणून मी हा शाकाहारी प्रकार ट्राय केला. कालच केले होते, आता पुन्हा केल्यावर फोटो टाकेन.
छान रेसिपी.
छान रेसिपी. सोपी वाटतेयं. फ्लावरचं काही नवीन मिळाले तर हवेच असतं.
मस्तच. किती वेळ लागला फ्लावर
मस्तच. किती वेळ लागला फ्लावर ग्रिल व्हायला ?
७-८ मिन. एका-एका बाजूनं असे
७-८ मिन. एका-एका बाजूनं असे १५-१६ मिनिटांमध्ये झाले. तुकडे किती मोठे आहेत त्याप्रमाणे थोडा कमी-जास्त होइल वेळ.
भारीच आहे हे... नक्की करून
भारीच आहे हे... नक्की करून बघेन..!
अरे भारी दिसतंय रेस्पीवरून.
अरे भारी दिसतंय रेस्पीवरून. करके देखेंगा. ऑफिशिअली ब्याडवर्ड वापरून बगीन.
रिक्षा.https://www.maayboli
रिक्षा.
https://www.maayboli.com/node/50982
मस्त ! तन्दुरी मसाला कोणता
मस्त ! तन्दुरी मसाला कोणता वापरलास?
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/77933
Gobhi मुसलम
हेही क्रिस्पी करतात म्हणे
://www.maayboli.com/node
://www.maayboli.com/node/50982 >>>> अर्र काल रेसिपी लिहिली तेव्हा शोधाशोध न करताच लिहिली. फोटो छान आलाय फ्लावरचा.
ब्लॅककॅट, तुमची ती मुस्सलमची रेसिपी भारी आहे एकदम.
मसाला शान किंवा नॅशनल कुठलाही चालेल.
डिजे, योकु - करा नक्की. योकोबा, लोखंडाच्या कढईत करू नकोस![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आज नान सोबत खायला केले. मस्त
आज नान सोबत खायला केले. मस्त झाले. धन्यवाद.
छान आहे फ्लावर मागवले आहे त
छान आहे फ्लावर मागवले आहे त बिग बास्केट वर. आजकाल आमी डाएट प्लॅन वर असल्याने रोज एक भाजी बन्वावी लागते त्यात हे अॅड करेन प्लस ब्रॉकोली व मशरूम्स ला पण असे बनवत येइल ना.
चांगला लागतो हा प्रकार, यात
हा आवडता प्रकार, यात बेसनाबरोबर मी थोडं तांदूळाचं पीठ घालते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फ्लॉवर, ब्रोकोली वापरून एअर फ्रायर मध्ये पण छान क्रिस्पी होतो. कोरडा अॅपेटायझर म्हणून किंवा थोडा सॉस करुन त्यात हे तंदूर प्रकार परतून पोळी/नान बरोबर भारी लागतो
एअर फ्रायर मध्ये मागे केलेले तंदूरी गोभी आणि खरपूस तंदूरी ब्रोकोली .
१>
![Tandoori_gobhi.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u391/Tandoori_gobhi.jpg)
२>
![Brokoli_tandoori.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u391/Brokoli_tandoori.jpeg)
तृप्ती, मस्त आणी सोपी पाकृ.
तृप्ती, मस्त आणी सोपी पाकृ. आवडली.
आता एअर फ्रायर बाहेर काढला पाहीजे. आधी मीपूणेकर ने टाकलेला फोटो पाहुन मला वाटले की अरारा यांनीच ते करुन फोटो टाकलाय. मग खाली पाहीले तर मीपूणेकर. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चटपटीत रेसिपी दिसतेय. करून
चटपटीत रेसिपी दिसतेय. करून बघणार.
पुणेकर, फोटोतुन छान दिसतेय, फोटो बघून करावीशी वाटली.
म्हणून रेसिपीत फोटू हवाच.
हो, लिहायचे राहीले. मी पुणेकर
हो, लिहायचे राहीले. मी पुणेकर, तंदूरी गोभीचा फोटो अफलातुन आलाय. अगदी प्रोफेशनल टच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोपी वाटतीय रेसिपी..पण तंदुरी
सोपी वाटतीय रेसिपी..पण तंदुरी चिकन मसाला नाहीये..गरम मसाला चालेल का?:)
मी पुणेकर फोटो खरोखर अफलातून
मी पुणेकर फोटो खरोखर अफलातून आलेत.. जबरी
गरम मसाला जिभेची फार जळजळ
गरम मसाला जिभेची फार जळजळ करेल
Black cat.. हो का? मग काय
Black cat.. हो का? मग काय पर्याय?
गरम मसाला चिमूटभर वापरा हवा
गरम मसाला चिमूटभर वापरा हवा तर , पण बिर्याणी मसाला जास्त घालावा लागेल
http://www
http://www.littlekitchenbigworld.com/homemade-tandoori-masala-recipe-for... इथे मसाल्याची कृती आहे.
मसाला जमणेबल वाटतोय:)
मसाला जमणेबल वाटतोय:)
तांदूळाच्या पिठीची युक्ती
तांदूळाच्या पिठीची युक्ती आवडली आहे. कुरकुरीत होईल. फोटो मस्त मीपुणेकर.
छान पाकृ !!
छान पाकृ !!
मिपू, एएरफ्रायर मध्ये किती वेळ ठेवायचं ?
मीपुणेकर, दोन्ही फोटो फारच
मीपुणेकर, दोन्ही फोटो फारच भारी आहेत.
स्वाती२, करून लगेच फीडबॅक दिल्याबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही आज याच रेसिपीनं पनीर ग्रिल केलं होतं. पनीर एका बाजूनं ५ मिन. असं एकूण १० मिनिटांत झालं.