Submitted by भोचकभवानी on 25 April, 2021 - 12:14
माझे वडील ठाण्यात राहतात. त्यांना वयोमानानुसार हिंडता फिरता येत नाही आणि कोरोनामुळे तर आता शक्यच नाही.
त्यांच्या बॅंकेचे व्यवहार भावाला करायचे आहेत पण पॉवर ऑफ ॲटर्नीशिवाय शक्य नाही.
कोणी भावाच्या घरी जाऊन करून देतील का?
कुठे जायचे असल्यास भाऊ येऊ शकतो पण वडील नाही येऊ शकणार. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या माहितीप्रमाणे:
माझ्या माहितीप्रमाणे:
बँकेच्या साईट वरून POA फॉरमॅट डाऊनलोड करायचा, सगळे डीटेल्स भरायचे. त्यावर कितीचा स्टॅम्प लावायचा हे बँकेला विचारायचे.
जाऊन बाबांची सही घ्यायची, दोन साक्षीदार लागतील.
मग ते घेऊन नोटरी कडे जाऊन नोटराईझ्ड करायचे
हे तुमच्या भावाला करता येईल.
एकदा त्या बँकेत फोन करून विचारून बघायला सांगा.
या नावाने कसं कोण ओळखणार पण ?
या नावाने कसं कोण ओळखणार पण ?
पण ब्यांकेचे कसले व्यवहार
पण ब्यांकेचे कसले व्यवहार दुसरा करू शकत नाही ?
पैसे चेक ने भरणे , 20 ह पेक्षा कमी केश भरणे , हे कुणीही करू शकतो
पैसे काढायला बेअरर चेक दिला तर ब्यांक त्याची सही मागे घेऊन पैसे देते , दुसऱ्याला चेक दिला तर दुसरा भरून त्याच्या अकाउंट वरून काढू शकतो,
ATM घरचे वापरू शकतात
सहीच करणे जमत नसेल , paralysis इ असेल तरच असा कागद लागेल ना ?
भावाला ऑनलाईन बँकिंगवरून
भावाला ऑनलाईन बँकिंगवरून व्यवहार करायचे आहेत. जसे की बीलं भरणं, नर्सिंग ब्युरो ला पैसे देणं वगैरे.
वडील बाहेर जाऊ शकत नाही आणि त्यांना पार्किसन्स असल्याने सही न करता बोटांचा ठसा वापरावा लागतोय. बॅंक म्हणून ऑनलाईन ॲक्सेस देत नाही. पण POA केलं तर भाऊ हे सगळं करू शकतो.
Ok.
Ok.
पार्किन्सन , paralysis , ह्यांना ब्यांक पी ओ ए देऊ शकेल
हो पण वडील घराबाहेर न पडता
हो पण वडील घराबाहेर न पडता भाऊ कसे करू शकेल? वकील लागेल का? घरी कोणी येऊ शकेल का?
टेक्निकली: साक्षीदार आणि
टेक्निकली: साक्षीदार आणि बाबांनी नोटरी समोर सही/अंगठा करायला पाहिजे. साक्षिदार तर तुमच्या भावाला आणावे लागतील.
एक नोटरी गाठा. त्याला सांगा बाबा येऊन शकत नाही बाहेर, घरी येतो का? तो येईल किंवा अजून काय सुचवेल ते बघा. एक गाठला की होऊन जाईल काम कसे ना कसे.
धन्यवाद, लगेच कामाला लागतो.
धन्यवाद, लगेच कामाला लागतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बॅंकमधे नोटरी केलेली POA
बॅंकमधे नोटरी केलेली POA चालते का ? की रजिस्टर केलेलीच लागते?
Online banking देत नाही
Online banking देत नाही म्हणजे काय? बँक अकाऊंट उघडला की ऑनलाईन मिळतेच ना? देत नसेल तर बँक बदला. जॉइंट अकाऊंट नाही करता येणार का? का पेन्शन अकाऊंट आहे आणि त्याला जॉइंट नाही करता येत असे काही आहे?
त्याच बँकेत दुसरा जॉइंट अकाऊंट उघडा आणि तिकडे दरमहा पैसे ट्रान्स्फर करायची सूचना बँकेला फोन बँकिंग मधून देता आली पाहिजे.
ऑनलाइन सुरू व्हायच्या
ऑनलाइन सुरू व्हायच्या आधीच्या काळातले बँक अकाउंट असतात. त्यांना ऑनलाइन अॅक्सेस, व्यवहारासाठी वेगळा अर्ज द्यावा लागतो.
पॅरालिसिस झालेल्या रुग्णाची सही नीट होत नसल्याने तो 'तोच' हे पाहायला बँकवाल्यांनी त्यांचा कर्मचारी घरी पाठवल्याचे पाहिले आहे.
बँकेचं काम सही मॅच होण्यावरच चालतं. आता खातेधारक पॉवर ऑफ अॅटर्नीवरही सही करू शकणार नाही.
रिझर्व बँके चं सर्क्युलर पहा.
नोटरीची गरज नसावी.https://www.rbi.org.in/commonman/english/scripts/Notification.aspx?Id=1353
*चेक साठी नोटरीची गरज नाही. पण POA साठी असावी. त्यामुळे वरचा प्रतिसाद संपादित केला आहे.
रच्याकने , तुमचं बेअरिंग
बरं , तुमचं बेअरिंग सुटलंय बघा.
बेअरिंग सुटलंय >>>
बेअरिंग सुटलंय >>>![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
धन्यवाद, लगेच कामाला लागतो ??
धन्यवाद, लगेच कामाला लागतो ?????
तो भाऊ वडीलान कडे जावून करू
तो भाऊ वडीलान कडे जावून करू शकत नाही का.
वडिलांचे वय झाले आहे तर त्यांचे पैसे कोणाला हवे आहेत.