शेवग्याच्या शेंगांची भाजी

Submitted by जेसिका on 15 April, 2021 - 06:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/४ वाटी मुग डाळ
४-५ शेवग्याच्या शेंगा
२ कांदे
सुक खोबर
१ टोमाटो
७-८ लसूण पाकळ्या
आल
२-३ हिरव्या मिरच्या
मोहरी
हळद
मिरची पावडर
गरम मसाला / मटण मसाला
मीठ
कोथीम्बीर

क्रमवार पाककृती: 

१. शेवग्याच्या शेंगांचे छोटे- छोटे तुकडे करून घ्यावेत.
२. मूगडाळ व शेंगा स्वच्छ धुवून घ्याव्या. कढईत मूगडाळ, शेंगा, टोमाटो व मोठ घालून मंद आचेवर शिजवून घ्यावे.
३. तव्यावर कांदा, लसूण, आल, हिरवी मिरची व खोबर लालसर होईपर्यंत परतावं व काढून घ्याव. कोथम्बीर घालून हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यावे.
४. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात अगोदर थोडे वाटण घालावे व परतून घ्यावे. आता त्यात हळद, मिरची पावडर, गरम मसाला / मटण मसाला, मीठ व राहिलेले सर्व वाटण घालावे व परतून घ्यावे. नंतर त्यात शिजलेले मूगडाळ व शेंगा घालाव्या. गरजेनुसार पाणी घालावे.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

हि भाजी चपाती व भातासोबत खूप छान लागते.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेस्पी छाण आहे, पण पैल्या मूगडाळीतच खतम् झालो मी. आपल्या जिभेचं हे काम नै.

वरणातल्या शेंगा मला आवडत नाहीत. मला शेवग्याची आमटी अशी झणकेदार आवडते. आजकाल ढाब्यांवर 'चिकन हंडी' ला पर्याय म्हणून शेवगा हंडी देतात. खसखस अन काळा मसाला लावलेला रस्सा असतो. (हाडं चोखून फेकावी तशी सालं चोखून फेकायची मजा येत असावी बहुतेक लोकांना) पण त्याची चव अफलातून असते.

.. पण म्हणून तुमच्या रेस्पीचं कौतुक नाही असं नाही, जस्ट जीभ खानदेशी मसालेदार खायला चटावलेली आहे इतकाच अर्थ.

बॉन अपेतित!

ताजा कलम,

इथे फोटूशिवाय रेस्पी टाकली तर नापास करतात. हे लक्शात ठेवा नेक्स्ट टाईम.

आम्ही जवळजवळ अशाच पद्धतीने आमटी करतो.
मला शेवग्याच्या शेंगा कशाही आवडतात.
पण चिंचगूळ आणि वाटण लावलेली भाजी विशेष आवडीची.

मूग डाळीबरोबर कधी खाल्ल्या नाहीत शेवगा शेंगा, करून बघायला हवी , छान रेसिपी पण फोटो पाहिला की करून बघायची इच्छा होते सो फोटो मस्ट.