![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2021/04/13/IMG-20210410-WA0084%5B1%5D.jpg)
२ कांदे
४-५ लसूण
१ मध्यम गाजर
दोन ढोब्या मिरच्या
४ मिरच्या
४ स्लाइस ब्रेड
आवडीचे नटस (शेंगदाणे, काजू, पिस्ते, आक्रोड , ब्राझील नटस) सगळे मिळून २-३ मुठी
तिखट , मीठ, तेल, ८-१० मिर्या
चीज
दोन टेबल स्पून तेल/अमूल लोणी
कांदे, लसूण चिरून तेलात / लोण्यात परतून घ्या.
गाजर, ढोबी मिरची चिरून टाका. ४ हिरव्या मिरच्यांचे तुकडेही टाका व अर्धवट परतून घ्या. (नंतर बेक होणार आहे). तिखट, मीठ चवी प्रमाणे टाकून परता.
सगळे नटस वेगळे थोडेसे भाजून घ्या व त्याची भरड करा. मिक्सर मधे किंवा कापडात बांधून आपटून (स्ट्रेस बस्टर). ब्रेडचे चार स्लाइस हाताने बारीक कुस्करा. त्यात भरडलेले नटस मिसळा. एक चमचा साखर, चार अंडी मिसळा. या सगळ्या मिश्रणात परतलेले मिश्रण मिसळा.
ओव्हन पात्राला लोणी लाउन १८० डि.सें. वर २०-२५ मिनिटे बेक करा. शेवटी शेवटी थोडे किसलेले चीज टाकून ठोडे बेक करा. नट रोस्ट तयार.
याच्या बरोबरच मी मॅश्ड बटाटा आणि चवळीची लसूण मिरची घालून नेहमीची भाजी केली होती.
टोमॅटो सॉस मधे/किंवा कैरी लोणचे तोंडी लावायला.(दोन्ही मला आवडते म्हणून).
मॅश्ड बटाटा करण्यासाठी ४ बटाटे उकडून घ्या. मॅश करा. एका सीव मधून बारीक करून घ्या. (हे कष्टाचे काम आहे). तोडे दूध आणि लोणी आणि चविपुरते मीठ मिरी घालून त्याचा छान गोळा होईपर्यंत शिजवा. कोथींबीर टाकून सजवा.
चित्रात दाखवल्या प्रमाणे पूर्ण डिनर तयार.
अंड्याच्या ऐवजी जवस वापरून वेगन नट रोस्ट करता येतो अस एका रेसिपीत लिहिले आहे. ब्रेड न वापरता दुसरे काहितरी वापरले तर ग्लूटेन फ्री सुद्धा. बाकीच्या फॅशन वाल्या बीया वापरल्याचा पण उल्लेख आहे.
नट रोस्ट मस्त दिसतो आहे. करून
नट रोस्ट मस्त दिसतो आहे. करून पाहण्यात येईल.
रच्याकने, ती चवळीच्या ऐवजी मुगाची भाजी दिसते आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त दिसतंय ! करून बघायला हवं
मस्त दिसतंय ! करून बघायला हवं.
चवळीच्या ऐवजी मुगाची भाजी
चवळीच्या ऐवजी मुगाची भाजी दिसते आहे>> डेकोरेशन. नाकापेक्षा मोती जड.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नट रोस्ट कधी केलं नाहीये, आता
नट रोस्ट कधी केलं नाहीये, आता करून बघायला हवं. छान दिसतंय.
छान दिसतेय
छान दिसतेय
छान दिसतंय...
छान दिसतंय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने माहितीचा स्रोत वाचून धक्का बसला. मी तूमचं वय ४० च्या आसपास समजत होतो.
डेकोरेशन. नाकापेक्षा मोती जड
डेकोरेशन. नाकापेक्षा मोती जड >>>
चवळी म्हणजे चवळई का? पालेभाजी?
अगदीच अवांतर पण तुम्ही वाईकर
अगदीच अवांतर पण तुम्ही वाईकर आहात हे माहीत नव्हतं. वाईत कुठे राहायचा ? आम्ही रविवार पेठ वाले.
आम्ही रविवार पेठ वाले.>>
आम्ही रविवार पेठ वाले.>> आम्ही पण. आमच घर आहे अजून वाईत. २५० वर्ष जुने.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पालेभाजी>> हो.
रच्याकने माहितीचा स्रोत वाचून धक्का बसला. मी तूमचं वय ४० च्या आसपास समजत होतो. >> = आप इतनी उम्र के लगते नही हो ठाकूर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्या करू, मेरी शादी जल्दी हो गयी तो लडका भी जल्दी हो गया. उसकी शादीभी जल्दी हो गायी , तो सूनबाईभी जल्दी आ गयी. - ठाकूर विक्रमसिंह
खरं की काय ? आमचा वाडा पण आहे
खरं की काय ? आमचा वाडा पण आहे अजून. लोखंडे डॉक्टरांच्या घरा समोर. शिंदे हायस्कूल पाशी.
रेसिपी आवडली.