पास्ता - जो आवडेल तो आकार ( साधारण 4 सर्व्हिंग्ज)
लाईट ऑलिव्ह ऑइल
एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल
ऑरेगानो आणि बेसिल (पाने किंवा वाळका भुगा उपलब्धतेनुसार)
1 छोटा टोमॅटो, 1 काकडी
बोटभर चीजचा तुकडा (optional)
तीन छोट्या लसूण पाकळ्या.
चटणीसाठी - पुदिन्याची पाने, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले, हिरवी मिरची, लिंबू, मीठ. - सर्व मिळून तीन ते चार टेबलस्पून चटणी
गार्लिक ब्रेडसाठी - नेहमीच्या ब्रेडचे 6-7 स्लाइस, वितळल्यावर 3 टेबलस्पून होईल इतके अमूल बटर, 6-7 छोट्या लसूण पाकळ्या क्रश करून.
पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, आले, लसूण, लिंबू, मीठ हे सगळे घालून घुर्र घुर्र घुर्र करून घेतले.
घरात fusili आणून ठेवलेला होता. तो पाण्यात मीठ घालून ते उकळून शिजायला घातला.
घरात एका टोमॅटोने एका बाजूला तोंड वाकडे केले होते. हल्ली पटापट खराब होतात टो. असो.. तर त्या वाकड्या बाजूला सदगती देऊन बाकी टो चिरून घेतला.
घरात एक काकडी होती ती सोलून त्याचे पातळ काप करून घेतले. चटणीत लसूण होतीच त्यामुळे लसणीच्या तीनच छोट्या पाकळ्या सोलून क्रशून घेतल्या.
लाईट ऑलिव्ह ऑइल वर लसूण परतली, त्यात वाळका भुगा रुपातले ओरेगानो आणि बेसिल भुरभुरले. सगळ्याचा मिळून एक टिपिकल अरोमा असतो. तो आल्यावर पुदिन्याची चटणी ओतली पास्त्याच्या प्रमाणात. मग टोमॅटो घातला. पुदिन्याचा करकरीत कच्चा वास जाईपर्यंत हे परतलं.
मग ड्रेन करून ठेवलेला पास्ता त्यात ओतला. एकेका फुसलीला सगळं मिश्रण लागेतो ढवळला. पास्ता ड्रेन करून उरलेले पाणी घातले दोन डाव सगळे मिळून येण्यासाठी.
मग वरून काकडीचे काप घातले. त्यावर मिरपूड आणि मीठ घातले. एक ढवळा मारून मग नावाला थोडेसे (बोटभर. किंवा अमूलचा छोटा ब्लॉक असतो त्यातला पाव ब्लॉक) चीज किसून घातले. ते मिक्स होईतो परत एकदा ढवळा मारला आणि गॅस बंद केला. आणि पास्ता उतरून झाकून ठेवला.
भाकरीच्या लोखंडी तव्यात बटर गरम केले, बारीक क्रश केलेली लसूण परतली, ओरेगानो भुरभुर, आणि ब्रेडचे अर्धे अर्धे तुकडे करून या बटरवर भाजून घेतले. लोखंडी तव्यावर केल्याने बहुतेक मस्त खमंग झाले. गार्लिक ब्रेड तय्यार.
मग प्लेटिंग. प्लेटमध्ये घेतल्यावर वरून चमचाभर एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल गार्निश म्हणून घातले. ब्रेडवर जे चमकतय ते तेच आहे.
टेस्ट एकदम मस्त आलीये.
बरोबर सूप किंवा सॅलड मस्त वाटले असते पण वसई गावात लेटयूस मिळत नाहीये मला. आणि सूप करायचा उत्साह नव्हता त्यामुळे ते राह्यले.
यात अजूनही काही summery गोष्टी घालता येतील.
चीज नको असेल तर नाही घातले तरी चालेल. पन नंतरचे EV ऑलिव्ह ऑइलचे गार्निश टाळू नका.
वि सू: काकडी चुकूनही टोमॅटोबरोबर घालू नका. शेवटीच घाला. Crunch नाही गेला पाहिजे.
नी, फोटो अँटॅच करायला विसरलीस
नी, फोटो अँटॅच करायला विसरलीस ग. झटपट लावुन टाक. मी भरभर स्क्रोल करून आधी तेच पहायला गेले.
पुदिना आवडतो म्हणुन मला पुदिना पास्ता नक्की आवडेल. दोन्ही पदार्थ भारीच टेम्पटिंग आणि यमी वाटताहेत. त्यात रेसिपी योग्य दिवशी आली आहे. मेन्यु ठरवायचा ताप नसल्याने रविवार सुखाचा जाईल.
(मी काकडी स्कीप करुन झुकीनी घालेन मात्र)
अरे ती फाईल केली होती attach
अरे ती फाईल केली होती attach फोटोची. काय झाले कळत नाही. जुन्या मेथडनेच करावे झालं.
हा झालं!
हा झालं!
मस्त फोटो! कधीही खायला आवडेल.
मस्त फोटो! कधीही खायला आवडेल.
मस्त दिसतोय. करून बघणार नक्की
मस्त दिसतोय. करून बघणार नक्की. चीज जास्त घातलं तर काही बिघडेल का?
मीही प्रतिसाद देण्यासाठी फोटोचीच वाट बघत होते पाकृ मगाशीच वाचली होती.
Mast दिसतोय.
Mast दिसतोय.
चीज जास्त घातलं तर ते फार
चीज जास्त घातलं तर ते फार चिकचिकित होऊन बसेल. ते मला आवडत नाही. आणि खूप चीजने फ्लेवर्स मारले जातात असं आपलं मला वाटतं.
पण हा काही नियम नाही. तुम्ही जास्त चीज घालून बघू शकता. चव थोडी बदलेल नक्कीच. पण आवडली तुम्हाला तर तसे करा. इथेही सांगा.
सगळ्यांना थँक्यू!
सगळ्यांना थँक्यू!
पदार्थ सुंदर दिसतोय.
पदार्थ सुंदर दिसतोय.
मस्त
मस्त
फोटो दिसले. आता पाहिले.
फोटो दिसले. आता पाहिले.
मी आज म्हणाल्याप्रमाणे लंचला पुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड बनवला. अतिशय भन्नाट झाला होता. (नेहमीप्रमाणे मला फोटो टाकता येत नाही कारण image upload करायला insert option नाहीच. Choose file केलं की insert बटण दिसत नाही)
छान दिसतोय पास्ता आणि ब्रेड.
छान दिसतोय पास्ता आणि ब्रेड. फोटो मस्तच.
हे पेस्तोचं देसी व्हेरिएशन म्हणावं का? पण हे जास्त हेल्दी आहे.
मीरा, ब्राऊजर बदलून बघ.
मीरा, ब्राऊजर बदलून बघ.
मला क्रोम मधून व्यवस्थित अनुभव आहे.
मूळ रेसिपी: छान आहे.फक्त कच्ची काकडी टाळेन.
मीरा, परत ट्राय करा फोटोचा.
मीरा, परत ट्राय करा फोटोचा.
सनव, पेस्तोचं देशी व्हर्जन म्हणायचं तर अक्रोड, बदाम नाहीतर गेलाबाजार शेंगदाणे तरी पाहिजेत. चटणीत ऑइल आणि चीज इमल्सिफाय झालेले पाहिजे.
हेल्दीचेही माहीत नाही पण भारतात शहरात सहज उपलब्ध (पास्ता, वाळका भुगा हर्ब्ज आणि दोन्ही ऑलिव्ह ऑईल्स अमेझॉन कृपा) आणि तुलनेने स्वस्त एवढे नक्की म्हणेन.
अजून काही भाज्या घातल्या तर प्रमाणही वाढेल आणि मला वाटते हेल्थ क्वोशंटही.
मला वाटते वांग्याचे काप मस्त वाटतील. हवे तर वेगळे शॅलो फ्राय (सेमी) करून घ्यायचे. भोपळी मिरची जन्मसवित्री कशातही खपवता येते. अजून काय बरं? सुचवा
अनु, काकडी टाळू नकोस. ऐक माझं. अर्धवट शिजलेली मीठ-मिरपूड-पुदिना-EV ऑ ऑ लागलेली crunchi काकडी ही तर मजा आहे यात.
कोणीतरी मला देवनागरीत
कोणीतरी मला देवनागरीत Emulsify हे लिहून द्या म्हणजे माझ्या प्रतिसादात चिकटवेन.
इमल्सिफाय
इमल्सिफाय
चीजचा मुद्दा पटला. कमीच घालून करून बघीन.
थँक्स वावे!
थँक्स वावे!
कडक!!
कडक!!