फुटाण्याच्या डाळ्या ची चटणी

Submitted by अमुपरी on 4 March, 2021 - 05:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फुटाण्याची डाळ पाव किलो
सुक्के खोबरे 150 grm
मिरी 15 मिरी चे दाणे
तिखट 4 चमचे मीडियम आकाराचा पोहे खायचा चमचा
हिंग 2 चमचे
तुप पाव वाटी
गुळ 1 छोट्या लिंबाच्या आकाराचा खडा
चिंच गुळ प्रमाणापेक्षा थोडी कमी
मिठ चवी प्रमाणे साधारण 1 चमचा

क्रमवार पाककृती: 

प्रथम फुटाण्या ची डाळ मिक्सर मध्ये बारीक वाटुन पुड करुन घ्यावी.
2 चमचे तुप तव्या वर घेउन त्या वर मिरी भाजावी.
नंतर मिरी काढून तुपावर सुक्या खोबर्याच्या कातळ्या करुन खरपूस सोनेरी रंग येई पर्यंत भाजाव्यात.
म gas फ्लेम बंद करुन त्याच तापलेल्या तुपा वर हिंग भाजावा म थोडा तवा गार झाल्यावर त्यावरच म तिखट टाकावे आणी परतावे.
त्यानंतर खोबरे, मिरी, हिंग ,तिखट ,गुळ चिंच,मिठ मिक्सर ला वाटुन घ्यावे.
व हे मिश्रण डाळीच्या पुडी मध्ये टाकावे.
म नंतर हे दोन्ही एकत्र करुन परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
त्यानंतर हे सगळे एका भांड्यात काढून त्यामध्ये उरलेले तुप हाताने मिक्स करावे.

अधिक टिपा: 

ब्रेड भाजुन त्याचा टोस्ट करुन त्यावर ही चटणी लावुन वरुन थोडे तुप घालुन त्याच्या वर बारीक चिरलेला कांदा घालुन मस्त लागते.
चपाती वर ही लावुन रोल करुन खायला छान लागते.
गरम गरम भात तुप आणी ही चटणी मिक्स करुन ही भारी लागते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

हा अन्जू आम्ही पण याला डाळं च म्हणतो.
नेक्स्ट टाईम करताना मी ही कढीपत्ता घालुन बघेन.
धन्यवाद रानभुली आणी अन्जू.
मेधावी कोल्हापुर मध्ये हे मसाला टोस्ट कुठे मिळतात माहिती आहे का?

छान चटणी.
फुटाण्याचे डाळं = डाळवा = सालं काढून दोन भाग वेगळे केलेले फुटाणे.

हेच मी लिहिले , कढीलिंबाची वाळलेली पाने घातल्यास मस्त लागते >>> हो, मी नंतर वाचली तुमची कमेंट. पोस्ट लिहीली मग फोटो पाहीले, एडीट केलं. नंतर कमेंटस वाचल्या.

Pages