बदाम पोळी

Submitted by क्रिशा on 17 February, 2021 - 17:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सारणाचे साहित्य :
१ वाटी आमंड मिल
अर्धी ते पाऊण वाटी गूळ
अर्धा चमचा फ्रेश वेलदोडे पावडर
अर्धा चमचा फ्रेश जायफळ पावडर
५-६ केशर काड्या

कणिक साहित्य:
नेहमीची पोळीला भिजवतो ती कणिक , मीठ, तेल, पाणी
२ चमचे जवस पावडर

क्रमवार पाककृती: 

-वरील दिलेले सारणाचे साहित्य ग्राइंडर मध्ये एकदम बारिक करून घेणे. लाडू करायचे नाहीयेत पण लाडू वळता येतील अशी कन्सिस्टन्सी हवी.
-गुळाचे प्रमाण लागेल तसे कमी जास्त करावे.
-नेहमीच्या पोळीला लागणारी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवून घ्यायची. मी रोजच्या कणकेत जवस पावडर घालते. ती नको असेल तर वगळू शकता.
-आता पुरणपोळी मध्ये जसे पुरण भरून पोळी लाटतो तशी पोळी सारण भरून लाटून घ्यायची.
-बारीक ते मध्यम आचेवर वर दोन्ही साईड ने साजूक तूप लावून खमंग पोळी भाजायची.
-पोळी पूर्णपणे गार झाली की खायला घ्यायची.

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात साधारण ३-४ पोळ्या होतील.
अधिक टिपा: 

ह्या पोळीची टेस्ट खूपशी खवा पोळी सारखी लागते.
आमंड मिल नसेल तर घरी बदामाची बारीक पूड करून वापरता येईल.
निम्मे दाण्याचे कूट आणि निम्मे आमंड मिल वापरून पण हि पोळी मस्त लागते.
आमंड मिल नसेल तर दाण्याचे कूट वापरू शकता. दाण्याची पोळी पण मस्त लागते.
कणकेत रंगासाठी अगदी थोडी हळद वापरू शकता.
ही पोळी लगेच खाण्यापेक्षा उशिरा खाल्लेली जास्त छान लागते. (म्हणजे सकाळी करून संध्याकाळी खाल्लेली वगैरे)
प्रवासात पण छान टिकेल.

माहितीचा स्रोत: 
एकदा दाण्याची पोळी करायची होती पण कूट फार शिल्लक नव्हते. मग हा प्रयोग करून पहिला होता.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगली वाटते पाककृती. छान दिसत आहे बदामपोळी.
Valentine नुकताच येऊन गेल्याने नाव वाचल्यावर बदामाच्या आकाराची पोळी असेल असे वाटले Happy

छान आहे.
अर्धे बदाम अर्धा दाण्याचा कुट घेऊन करून बघेन..
बदाम पावडर करायच्या आधी बदाम भाजून घ्यायचे का?

आमच्या कडे शाही केळं करतात,तोंडी लावणं म्हणून,त्यात काजू+बदाम+पिस्ता+अक्रोड पावडर आणि ओलं खोवलेलं खोबरं+गूळ +केळं घालतात
एकदा हेच सगळं सारण म्हणून घालून(केळं वगळून) पोळी केली होती,त्यात खारीक पावडर पण घातली,तेव्हा पासून आठवड्यात एकदा नाश्ता म्हणून लागतोच हा शाही स्वीट पराठा

इंटरेस्टिंग रेसिपी. मला पोळःया जमत नाहीत म्हणून एकंदरित पास. पण योग्य ठिकाणी पोहोचती करेन. Happy

छान.
अंजली_१२ >> नाही चालणार बहुतेक. आमंड मिल असेल तर चालेल. Wink Proud

मस्त आणि सोपी रेसिपी! बदाम पोळीचा रंग काय छान आला आहे, एकदम खमंग. नक्की करुन बघेन Happy

@मृणाली, बदाम सालासकट कच्चे मिक्सरमधून आधी पल्स मोड वर मग अगदी काही सेकंद फिरवून बदाम मील घरी करु शकाल. हे करताना फार जास्त वेळ मिक्सर सुरु ठेवलात तर मात्र बदाम बटर होईल Proud

@अंजली, क्रिशा सांगेल नक्की पण या रेसिपीमध्ये बदाम पीठ चालू शकेल बहुतेक.
बदाम मील म्हणजे कच्च्या बदामांची सालासकट केलेली पूड व बदाम पीठ हे ब्लांच्ड ( सालं काढलेल्या) बदामाची पावडर, रंगाने जरा लाईट असते मील पेक्षा.

सगळ्यांना थँक्यू !

अंजली_१२ : बदाम पीठ वापरून मी अजून केली नाहीये. पण नक्कीच चालेल असं वाटतंय.

बदाम पावडर करायच्या आधी बदाम भाजून घ्यायचे का? >> mrunali.samad : बदाम भाजायची गरज नाही.
मीपुणेकर ने सांगितल्याप्रमाणे बदाम न भाजता ग्राइंडर मधून काढू शकता.

बदाम मील म्हणजे कच्च्या बदामांची सालासकट केलेली पूड व बदाम पीठ हे ब्लांच्ड ( सालं काढलेल्या) बदामाची पावडर, रंगाने जरा लाईट असते मील पेक्षा. >>>> बरोबर