Submitted by माऊमैया on 20 January, 2021 - 05:20
माझ्या भाचीने टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. या महिन्याच्या शेवटी तिला पुण्यात राहायला जायचे आहे. तिला P.G. (पेईंग गेस्ट) म्हणून राहण्याची सोय पाहतोय.
सदाशिव पेठ भागातील P.G. ची माहिती असल्यास सांगावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अजुनही सुरु आहे हे माहित नव्हतं..! वाचुन छान वाटलं..!!
स.पे. मधे पेईंग गेस्ट म्हणुन रहाणं फार थ्रिलिंग असु शकेल. तरिही निर्णय झालाच असेल तर निदान तिथे रहायला जाण्याआधी स.पे. मधील रहिवाशांनी त्यांच्या पेईंगगेस्टना दिलेल्या वागणुकीबद्दल गुगल वर माहिती वाचावी. ढेकूण नामक रक्तपिपासु प्राण्याची माहिती द्यावी तसेच चौरस आहार अन सोबत रक्तवाढीच्या गोळ्या आधीपासुनच सुरु केलेल्या बर्या म्हणजे त्या परततील तेव्हा त्यांची शारिरीक अन मानसीक अवस्था अगदीच वाईट नाही निदान बरी तरी असेल. बाकी भाची बाईंना खूप शुभेच्छा..!
प्रथम तुमच्या भाचीचे अभिनंदन.
प्रथम तुमच्या भाचीचे अभिनंदन. सदाशिव पेठेत महाराणा प्रताप उद्यान च्या जवळचं आहे एक मुलींसाठी पेईंग गेस्ट - आनंदी हॉस्टेल म्हणून आणि विशेष म्हणजे तिथे विद्यार्थीच असतात. फक्त राहण्यासाठी आहे. जेवणासाठी मेस लावावी लागेल. भाडं आता साधारण प्रति महिना ५००० रुपये असेल. ते सांगतीलच तुम्हाला. अधिक माहिती तुम्हाला ह्या लिंक वर मिळेल: https://jsdl.in/DT-49QE22Y2Y2E
नव्या पेठेत चालणार असेल तर एक
नव्या पेठेत चालणार असेल तर एक माहिती आहे. चौकशी करावी लागेल.
सदाशिव पेठ चांगली आहे हो
सदाशिव पेठ चांगली आहे हो
थोडी रोखठोक असतात माणसे पण सोयीसुविधा, सुरक्षितता आणि संस्कृती या सगळ्या दृष्टीने चांगला भाग आहे.
पूर्वी बऱ्याच वाड्यातून असायचे शिकणारे विद्यार्थी रहायला आता रिडेव्हलपमेंट मुळे लोक फ्लॅटमध्ये रहायला गेलेत आणि वाड्यातले विद्द्यार्थी भाडेकरु हा प्रकार कमी झालाय!
आता जे काही ऑप्शन्स आहेत ते पूर्णतः व्यावसायिक आहेत.... घरगुती टच बराचसा कमी झालाय!
पण तरीही सदाशिव पेठ रहायला मस्त आहे
Stanza Living- हा एक option
Stanza Living- हा एक option आहे, अर्थात सदाशिव पेठ मध्ये नसेलही पण कोथरूड ला आहे
जेवण,मेड, सेक्युरिटी अश्या सगळ्या सोई असतात
चौकशी करू कळवते. नवी पेठेत
चौकशी करू कळवते. नवी पेठेत आहे.
पण तुम्ही स्वतः येऊन टिमवि मध्ये क्लार्क किंवा प्यून यांना गाठले तर कदाचित ते तुम्हाला मदत करू शकतील.
सदाशीव पेठ रहाण्यासाठी
सदाशीव पेठ रहाण्यासाठी उत्कृष्ठच आहे. माझ्या अनुभवावर मी मायबोलीवरच एक लेख लिहिला होता अगदी याच विषयावर. एकदा राहून पहा.
पण सध्या हा माझा लेख वाचा.
https://www.maayboli.com/node/10306
नुकतच पुणे हे रहाण्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ठ शहर आहे असे काहितरी वाचण्यात आले होते .:)
विक्रमसिन्ह, खुप मस्त वाचले
विक्रमसिन्ह, खुप मस्त वाचले तुमचा लेख वाचून!
शेवटचा पॅराग्राफ तर अगदीच भावला
कसे कुणास ठाऊक पण सुटला होता हा लेख नजरेतुन.... जुन्या मायबोलीवरचे असे बरेच वाचनीय राहूनच गेलेय!
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद...
लिंक दिल्याबद्दल धन्यवाद क्वीन पियू...
वावे आणि रानभुली,,, नवी पेठ
वावे आणि रानभुली,,, नवी पेठ येण्या-जाण्याच्या दृष्टीने दूर पडेल तिला, म्हणून नको.
मीही २००२ ते २००४ नवी पेठमध्येच P.G. म्हणून राहिलेय. पण आता तिथला काहीच संपर्क राहिला नाहीये.
विक्रमसिंह, तुमचा लेख आवडला.
एखादे घर भाड्याने घेउन दोन
एखादे घर भाड्याने घेउन दोन तीन विद्यार्थी राहु शकतील का ते पण बघा.
हा पर्याय सुद्धा चांगला आहे,
हा पर्याय सुद्धा चांगला आहे, अमा.