पुण्यातील रम्य अश्या प्रभात रोड व भांडारकर रोड भागाचे वैशि ष्ट्य म्हणजे ह्या भागातील जुनी टुमदार घरे, सोसायट्या व शांत गल्ल्या. काही टू वे आहेत तर काही डेड एंड. ह्या भागात वर्दळ व वाहनांची गर्दी वाढल्याचे कारण देत पुणे महापालिकेने ह्या गल्ल्या रुंद करायचा घाट घातला आहे.
प्रभात रस्ता परिसरातील दहा गल्ल्यांमधील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर करण्यात येणार आहेत. तसेच भांडारकर रस्ता परिसरातील गल्ल्यांमधील रस्त्यांचे रुंदीकरणही प्रस्तावित आहे. याविरोधात नागरिकांनी महापालिकेकडे हरकती-सूचना दिल्या आहेत. गल्लीबोळातील रस्त्यांवर हरित कवच आहे. हा भाग शांत असून गल्लीबोळातील रस्त्यांवर वाहतुकीचा ताण नाही. रस्ता रुंदीकरणामुळे वृक्षराजी नष्ट करावी लागणार आहे. काही सोसायटय़ांमधून रस्ते जाण्याची भीती आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण नको, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे. मात्र हा विरोध डावलून रस्ता रुंदीकरणाचा घाट महापालिकेने घातला आहे. प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १४ या गल्ल्यांमधील रस्ता रुंदीकरण नियोजित आहे. तसेच भांडारकर रस्त्यावरील काही गल्ल्यांमधील रस्ता रुंदीकरणासंदर्भातही महापालिकेने संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली आहे. प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्ता परिसरात मिळून जवळपास तीस गल्ल्या आहेत.
शहरातील ६ मीटर रुंदीचे ३३५ रस्ते ९ मीटर करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्याबाबत जाहीर प्रकटन देण्यात आले असून हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत. अस्तित्वातील मोठे रस्ते रुंद करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावाही करण्यात आला होता. प्रत्यक्षात मोठे रस्ते सोडून गल्लीबोळातील रस्त्यांवर घाला घातला जात आहे. नागरिकांचा विरोध असताना आणि त्याबाबत हरकती नोंदविण्यात आल्यानंतरही रस्ता रुंदीकरणासंदर्भातील नोटिसा महापालिकेने दिल्या असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा घाट नक्की कोणासाठी घातला जात आहे, असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जात असून रस्ता रुंदीकरणाची ही प्रक्रिया वादग्रस्त ठरणार आहे. मुळातच वाहतूक नसलेल्या गल्लीबोळातील रस्त्यांचे रुंदीकरण का केले जात आहे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
सहा मिटर रुंदीची गल्ली ९ मीटर रुंद करण्यात अनेक घरा सोसायट्यांचे पुढचे गार्डन नाहिसे होईल. व धूळ व प्रदुषण वाढेल. महत्वाचे
म्हणजे त्या भागातली रम्य शांतता नाहिशीच होईल. माझे पुण्यातले बालपण व किशोर वय ह्या गल्ल्यांमधे बाग ड ण्यातच गेले आहे. घर,
शाळा, क्लास मित्र मैत्रीणींची घरे, बागा ह्या सर्व ह्याच भागात आहेत. विकासाचा रेटा मला कळतो पण ते खास वातावरण आता एकदम नाहिसे होईल म्हणून वाइट वाटले. कालाय तस्मै: नमः रुंदीकरण होण्या आधी एक व्हिडीओ घेउन ठेवावा.
पुणेकर ह्या बद्दल निषेध नोंदव त आहेतच पण आपले काय मत?
मूळ बातमीची लिंक
https://www.loksatta.com/pune-news/notice-to-residents-of-bhandarkar-roa...
ताळमेळ नाहीच लागला का अजून ?
ताळमेळ नाहीच लागला का अजून ?
>>>
त्यापुढे गेली चर्चा हर्पेन, नक्की का विरोध आहे विकासाला हे कोणीच स्प्ष्टपणे व प्रामाणिकपणे सांगत नाहीये.
वर डीजे यांच्या पोस्टशी सहमत आहे. चांगली लाईफ, सुंदर, स्वच्छ आणि शिस्तप्रिय शहर का नको?
चांगली लाईफ, सुंदर, स्वच्छ
चांगली लाईफ, सुंदर, स्वच्छ आणि शिस्तप्रिय शहर का नको?
>>>
हाऊ क्युट !
सुंदर, स्वच्छ आणि शिस्तप्रिय
सुंदर, स्वच्छ आणि शिस्तप्रिय >
in india?
रस्ते रुंद केल्यावर तिथे काय
रस्ते रुंद केल्यावर तिथे काय असतं?गाडी चालवायला मोकळा रस्ता की अस्ताव्यस्त पर्किंग केलेल्या गाड्या, ठेले, पान टपर्या. पानाच्या पिचकार्या?
पुणेकर ह्या बद्दल निषेध नोंदव
पुणेकर ह्या बद्दल निषेध नोंदव त आहेतच पण आपले काय मत?
---
आम्ही देखील निषेध करतो या गोष्टीचा !
बंगल्यांच्या बाबतीत आणखी एक
बंगल्यांच्या बाबतीत आणखी एक प्रश्न येतो. ७०-८० वर्षे किंवा त्याहून जुन्या बंगल्यांची देखभाल वृद्ध नागरिकांना शारीरिक आणि आर्थिक बाजूने बरेच वेळा झेपत नाही. मुलांना किंवा वारसांना त्याच शहरी रहाण्यात रस नसतो अथवा इतर ठिकाणी अधिक हिरवी कुरणे खुणावत असतात. आधुनिक सोयी असलेल्या घरांचे आकर्षण वाटते. मग बंगल्यापेक्षा एखाद्या चांगल्या सोसायटीत फ्लॅट असणे जास्त सोयीचे वाटते. देखभाल एकट्यावर पडत नाही, सुरक्षितता असते, समवयस्क समछंदी, समविचारी सहवास आणि मैत्री मिळू शकते. म्हणून बंगले तोडून नवीन इमारत बांधणे क्रमप्राप्त ठरते. त्या वेळी अर्थात एफ एस आय, पार्किंग, रहदारी, सोयीसुविधा, ड्रेनेज, वगैरे बाबी निघतात. आणि रस्ता रुंद करणे आवश्यक ठरते.
टिपिकल पेठेतली मनोवृत्ती.
टिपिकल पेठेतली मनोवृत्ती. जगात सहा लेनचे हायवे झाले तरी ह्यांना बोळातून गाडी ( गाडी पण Activa) चालवायलाच मजा येणार
सर्व भागात जमिनी परत करा आणि
सर्व भागात जमिनी परत करा आणि रस्ते परत अरूंद करा. नाहीतर प्रभात रोड भागातील व्हीआयपी लोकांना इतरांच्या जागा ताब्यात घेऊन बांधलेल्या रस्त्यावर फिरायला पासपोर्ट आणि व्हिसा कंपल्सरी करा.
ओके. मी जरा पर्यावरण आणि
ओके. मी जरा पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने विकासाचा योग्य मार्ग कोणता असू शकतो हे मांडत आहे. वस्तुस्थितीमध्ये प्रत्येक घटकाच्या vested interests आणि तात्कालिक फायद्यासाठी कदाचित हा मार्ग सगळ्यांना पटणार नाही पण किमान त्या मागची विचार प्रक्रिया आणि कारणमीमांसा प्रत्येकाने एकदा तरी आपल्या विचारांशी तपासून पाहिली तरी पुष्कळ आहे.
कोणत्याही एका जमीनीच्या तुकड्याची एक कमाल धारण क्षमता (carrying capacity) असते. आज जिथे एका बंगल्यात कमाल दहा माणसे रहात असतील तर उद्या तिथे 20 मजली इमारत उभी राहिली की त्याच जमीनीच्या क्षेत्रफळावर किमान 80 माणसे राहू लागतात. शहरे ही परजीवी व्यवस्था आहेत. They are net importers of resources. अन्न, पाणी, वीज आणि कचऱ्याची सांडपाण्याची विल्हेवाट या सर्व गोष्टी शहरांमध्ये externalize केल्या जातात. ही व्यवस्था शाश्वत असू शकत नाही आणि हे मेट्रो शहरांतील वाढत्या समस्या पाहिल्यावर लक्षात येतं. मग शाश्वत विकास कसा असला पाहिजे? शाश्वत विकासात विकेंद्रीकरणाचं (decentralization) महत्त्व आहे. जमीनीच्या carrying capacity चा मान राखत आत्मनिर्भर वसाहती (self sustained decentralized units of civilization) निर्माण झाल्या पाहिजेत. या वसाहतींचा विकास केवळ मानवकेंन्द्री न ठेवता निसर्गकेंन्द्रीत असावा. आत्ताचा जो शहराचा सो कॉल्ड विकास आहे तो निसर्गाची पायमल्ली करून केवळ मानवकेंन्द्रीत असा आहे.
निसर्ग शाश्वत का आहे कारण निसर्ग विकेंद्रीकरणावर भर देतो. कोणताही नैसर्गिक स्रोत centralized नाही - landscape मध्ये विविधता आहे त्यामुळे एकीकडे नदी, कुठे तळे, कुठे डोंगर कुठे उतार अशी विकेंद्रीत व्यवस्था आहे. जंगलात सर्व आंब्याची झाडं एकीकडे बेहड्याची एकीकडे असं दिसत नाही. प्रत्येक झाड आपल्या बिया दूरवर पसरायला बघतं. कळपात राहणारे प्राणी देखील एक विशिष्ट संख्या झाली की वेगळा कळप तयार करून नवीन क्षेत्राच्या शोधात स्थलांतर करतात.
माणसं काय करतात? विकासाच्या नावाखाली एकमेकांच्या उरावर बसून शहरांची लोकसंख्या वाढवत राहतात. मग या शहरांच्या बांडगुळांना १०० किलोमीटरवरच्या धरणातून पाणीपुरवठा लागतो, दोनशे किलोमीटर दूर असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रातून वीज लागते. पन्नास ते कितीही किलोमीटर वरून यांचा धान्य, भाजीपाला, दूध इत्यादीचा पुरवठा होतो. शहरं या बदल्यात भरपूर कचरा आणि सांडपाणी निर्माण करतात. नदीची गटारगंगा करून टाकतात. याला आपण विकास म्हणतो. आणि त्या शहराला एक गोंडस नाव देतो - स्मार्ट सिटी!
धरणाचं पाणी सोडून द्या आणि
धरणाचं पाणी सोडून द्या आणि त्या जमिनी मूळ मालकांना परत द्या.
प्रभात रोड, भांडारकर रोड,
प्रभात रोड, भांडारकर रोड, जंगली महाराज रस्ता या जमिनी मूळ शेतकऱ्यास परत करा. त्यांना तिथे शेती करू द्या. पर्यावरणाच्या गप्पा हाणणारे सहमत आहेत का?
रस्ते रुंद केल्यावर तिथे काय
रस्ते रुंद केल्यावर तिथे काय असतं?गाडी चालवायला मोकळा रस्ता की अस्ताव्यस्त पर्किंग केलेल्या गाड्या, ठेले, पान टपर्या. पानाच्या पिचकार्या?
>>>>
हे तेथील लोकांवर अवलंबून आहे ना..
म्हणजे बघा हं, बिल्डरने छानपैकी बिल्डींगच्या टेरेसवर स्विमिंगपूल दिले. पण तिथे लोकं तांब्या बादली घेऊन विहीरीवर आंघोळ करायला जातात तसे टॉवेल खांद्यावर टाकून गेले आणि पूलच्या काठावर साबणाचा चिखल केला तर दोष बिल्डरचा कि रहिवाश्यांचा?
जो सर्वनाश होऊन गेला आहे
जो सर्वनाश होऊन गेला आहे त्याच्या बदल्यात अधिक सर्वनाशाची मागणी करणे हे सूज्ञपणात बसू शकत नाही. शहरांमधून reverse migration होण्याची गरज आहे. शहराची आधीच नियंत्रणापलीकडे चाललेली लोकसंख्या वाढविण्यापेक्षा इतर कमी विकसित गावांचा शाश्वत विकास कसा होईल याचा विचार व्हायला हवा.
तिथल्या म्हणजे स्थानिक
तिथल्या म्हणजे स्थानिक रहिवाशांच्या गरजा आणि मागण्या यांना प्राधान्य द्यावे.
शनिवार वाडा पाडून ती जागा मूळ
शनिवार वाडा पाडून ती जागा मूळ मालक झांबरे पाटलांना द्या. आजूबाजूच्या वाड्याच्या जागाही मूळ मालकांना द्या.
हिलवे हिलवे गाल गालिचे
हलित त्लुणांच्या मखमलीचे
त्या मखमालीवर फूल पाखले
पंत चिमुतले निले जांभले
त्या भागात फिरताना खुप मस्त
त्या भागात फिरताना खुप मस्त आणि खुप शांत वाटते.
निगुतीने जपलेली जुनी पण नेटकी घरे, भरपूर झाडे आणि सुनियोजित रस्ते आणि गल्ल्या
खर म्हणजे आख्खे पुणे तसे व्हायला हवे पण त्यात कुणाचा आर्थिक फायदा नाही ना!
विकासाच्या नावावर त्या जे एम रोडचे काय करुन ठेवलेय ते दिसतयच!
नवीन Submitted by जिज्ञासा on
नवीन Submitted by जिज्ञासा on 14 January, 2021 - 16:29
जगभरात शहरे अशीच वसली जातात.
मुंबईतील लोकसंख्येची घनता आणि आमच्या मौजे येडगावमधील लोकसंख्येची घनता समान कशी असू शकेल. त्यात कमालीची तफावत असणारच.
थोडक्यात, विकेंद्रीकरणाची गरज भासण्याईतकी स्थिती त्या भागात आली आहे का याचा विचार व्हायला हवा. ते आकडे असतील तर जाणून घ्यायला आवडतील. जर आधीच तिथे ती मर्यादा गाठली असेल तर नक्कीच विरोध व्हायला हवा.
जो सर्वनाश होऊन गेला आहे
जो सर्वनाश होऊन गेला आहे त्याच्या बदल्यात अधिक सर्वनाशाची मागणी करणे हे सूज्ञपणात बसू शकत नाही >> बघावं तिकडे डबल ढोलकी
जर उद्या पुणे शहराची
जर उद्या पुणे शहराची लोकसंख्या आजच्या दसपटीने कमी झाली आणि इथे ground water recharge वाढला तर तेच पाणी शहराला पुरेसे होईल. मग धरणाच्या पाण्याखाली असलेली जमीन आपोआप मोकळी होईल. पण जर तुम्ही अजून टोलेजंग इमारती बांधायला समर्थन देत असाल तर मग त्यातून तुम्हाला धरणात गेलेली जमीन परत कशी काय मिळेल यामागचं लॉजिक समजावून सांगा! की सर्वनाश व्हावा हीच आंतरिक इच्छा आहे?
विकास पाहिजे, शहर पाहिजे
विकास पाहिजे, शहर पाहिजे त्यासाठी त्याग करा फक्त आमचा भाग तेव्हढा वगळा.
विकेंद्रीकरण करायचेच असेल तर
विकेंद्रीकरण करायचेच असेल तर प्रथम मुंबईचे करावे लागेल. मुंबईतली काही कार्यालये नागपुर, धुळ्याला हलवली तर मुंबईकरांना चालेल का?
निगुतीने जपलेली जुनी पण नेटकी
निगुतीने जपलेली जुनी पण नेटकी घरे, भरपूर झाडे आणि सुनियोजित रस्ते आणि गल्ल्या Happy
खर म्हणजे आख्खे पुणे तसे व्हायला हवे पण त्यात कुणाचा आर्थिक फायदा नाही ना!
>>>>>>>>
अख्खी मुम्बई अशी झाली तर मलाही आवडेल
पण मग जाणार कोण आणि राहणार कोण?
जिज्ञासा, पोस्ट पटल्या!
जिज्ञासा, पोस्ट पटल्या!
Reverse migration खुप गरजेचे आहे
छोट्या शहरात स्थानिक रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारी स्तरावर सुनियोजित प्रयत्न होणे खरच गरजेचे आहे.
जुन्या पुण्यातुन आणि जुन्या मुंबईतून खुप फिरलोय लहानपणी.... म्हणून हा अनाठायी विकास खटकतो कधीकधी!
निसर्ग शाश्वत का आहे कारण
निसर्ग शाश्वत का आहे कारण निसर्ग विकेंद्रीकरणावर भर देतो
ह्या सगळ्याचा प्रभात रोड , भांडारकर रोड रास्ता विस्तिकरणाशी काय संबंध? रस्ता विस्तारला तर ट्रॅफिकचं विकेंद्रीकरण होईलच की.
दुसऱ्याच्या जमिनी काढून
दुसऱ्याच्या जमिनी काढून घेताना विकास नाहीतर सर्वनाश!
आणि रस्ता रूंद करायला जागा लागली की पर्यावरण? एक पे कायम रहो.
या तो गधा बोलो या गोडा बोलो.
आता है बच्चा लोग. अपना एक
आता है बच्चा लोग. अपना एक भिडू दाढी बढाके बैठेला है. ऊसकु बोला था जंगल बेच, देख के आता कुछ काम कियेला की नै?
ह्या सगळ्याचा प्रभात रोड ,
ह्या सगळ्याचा प्रभात रोड , भांडारकर रोड रास्ता विस्तिकरणाशी काय संबंध? रस्ता विस्तारला तर ट्रॅफिकचं विकेंद्रीकरण होईलच की.
>>>>>>>
पण यानंतर तिथली बैठी घरे जाऊन मोठ्या ईमारती उभ्या राहतील आणि लोकसंख्येची घनता वाढेल हा मुद्दा आहे.
विकेंद्रीकरण करायचेच असेल तर प्रथम मुंबईचे करावे लागेल.
>>>>>
खरंय, एकदा मुंबईची लोकसंख्येची घनता आणि पुण्याची घनता याचे आकडे चेक करायला हवेत.
माझे कित्येक पुणेकर मित्र तर ईथल्या लोकलच्या गर्दीवरून मला हसतात, चिडवतात.
आरेचं जंगल तोडा, पावणेदोन
आरेचं जंगल तोडा, पावणेदोन डोळ्याला जंगलातली ५०० एकर जागा द्या. पर्यावरण टणाटण. विकासाचे मारेकरी
पण रस्त्याला आमच्या भागातील जागा दिली की पर्यावरण जळलं. लै भारी.
त्या भागातील कमर्शियल
त्या भागातील कमर्शियल कॉम्प्लेक्स पाडा. शोरूम्स बंद करा. घनता कमी होईल.
ना माझं पुण्यात घर आहे ना
ना माझं पुण्यात घर आहे ना मुंबईत. आणि या दोन्ही ठिकाणी घर घेण्याची ऐपतही नाही आणि इच्छाही नाही. त्यामुळे मी करते त्या विधानांमागे माझा काही स्वार्थ आहे असे आजिबात नाही.
स्वरूप, खरं आहे. सरकार आणि खाजगी कंपन्या जर चांगल्या हेतूने एकत्र आल्या तर असा विकेंद्रीत विकास नक्की घडू शकेल. यावर अजून लिहीन थोडंसं नंतर.
Pages