श्रीस्वामी समर्थ भक्तांसाठी वास्तुकलाशेखरची नवीन प्रस्तुती
श्रीस्वामी समर्थ मुखदर्शन मूर्ती
संकल्पना -
ध्यानमूलं गुरोर्मूति: पूजामूलं गुरो: पदम् ।
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरो: कृपा ॥
गुरुमाउली श्रीस्वामी समर्थ यांच्या मुखात अनेक वेळा वरील श्लोक असे. याचा अर्थ असा की सद्गुरुच्या रूपाचे स्मरण केले असता सहजच ध्यान होते, गुरुचरणांची पूजा ही सर्व देवांची पूजा आहे, गुरुंचे वाक्य हे मंत्रमय असते आणि गुरुंची कृपा झाली तर मोक्ष मिळतो.
या उक्तीला शिरसावंद्य मानून, मुखदर्शन मूर्तीची कल्पना साकार झाली. नामस्मरण, ध्यान इत्यादीच्या वेळी स्वामिंच्या दिव्य मुखाकृतीचे भक्तांना मनसोक्त दर्शन घडावे या उद्देशाने केवळ अर्धाकृती मूर्ती केली आहे.
१८६० च्या आसपास स्वामींची जी छायाचित्रे काढलेली होतीत, त्यांचा अभ्यास करून स्वामींची वास्तविक भावमुद्रा साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. स्वामी भक्तांनी ही शिल्पकृती अतिशय भावेल अशी आशा वाटते.
वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन -
ही मूर्ती घरी, ऑफिसमध्ये, दुकानात, गाडीत कुठेही ठेवता येईल.
दिशेचा विचार केला तर वास्तूच्या ईशान्य किंवा पूर्व विभागात दक्षिण अथवा पश्चिमेस मुख करून ठेवावी. घराचे प्रवेशद्वार उघडले की अगदी समोर या मूर्तीचे दर्शन घडले तरी प्रसन्नता वाटेल. अनिष्ट ऊर्जेला खीळ बसेल. मूर्तीची अथवा चित्रातील देवाची दृष्टी तिजोरी अथवा गल्ला यावर पडू नये हा नियम या मूर्तीसही लागू होतो.
इतर तपशील :
फायबरच्या मूर्तीवर तांब्याचे टिकाऊ प्लेटिंग
उंची ४ इंच, रुंदी साधारण ४ इंच ,
वजन अंदाजे अर्धा किलो
अधिक महिती आणि ऑर्डर नोंदणीसाठी संपर्क
शेखर खांडाळेकर 98195 23551
मूर्तीच्या अधिक छायाचित्रांसाठी खालील लिंक वर जावे
https://www.facebook.com/photo?fbid=10220387320966095&set=pcb.1022038804...