Submitted by डीडी on 3 January, 2021 - 04:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
**** सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! *****
फिश मॅरीनेट आणि फ्राय करण्यासाठी
----------
फिश फिलेट ५०० ग्रॅम
मीठ १/२ टिस्पून
हळद १/२ टिस्पून
लाल तिखट २ टिस्पून
धणेपूड १ टिस्पून
मिरपूड १/२ टिस्पून
गरम मसाला १ टिस्पून
आले लसूण पेस्ट २ टिस्पून
लिंबाचा रस १ टेबलस्पून
मोहरी तेल २ टेबलस्पून
ग्रेव्हीसाठी
-------------
तेल १ टेबलस्पून
बटर १ टेबलस्पून
धणे १ टिस्पून
जिरे १/२ टिस्पून
कांदा १ मोठा किंवा २ लहान
काजू १० ते १२ नग
टोमॅटो १
तमालपत्र १
दालचिनी २ लहान तुकडे
लवंगा २
आले लसूण पेस्ट १ टिस्पून
काश्मिरी लाल तिखट १ टेबलस्पून
गरम मसाला १ टिस्पून
कसुरी मेथी १ टिस्पून
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
क्रमवार पाककृती:
- मासा स्वच्छ धुवून त्याची स्किन काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्याला वरील प्रमाणे साहित्य छान चोळून घ्यावे.
- साधारण १५ ते २० मिनिट हे तुकडे मॅरीनेट होऊ द्या.
- कांदा आणि टोमॅटोच्या उभ्या फोडी करून घ्याव्यात. एका भांड्यात तेल तापवून त्यावर धणे आणि जिरे परतावेत. त्यावर चिरलेला कांदा घालावा तो थोडा गोल्डन ब्राउन झाल्यावर काजू आणि टोमॅटो परतून घ्यावेत.
- हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.
- त्यानंतर एखादे ग्रील पॅन अथवा कोणत्याही पसरट भांड्यात मोहरीचे तेल घ्यावे. हे तेल मात्र जरा जास्त गरम म्हणजेच चांगला धूर येई पर्यंत गरम करून मग गॅस मंद करून त्यात माश्याचे तुकडे घालावेत पण त्यानंतर मध्यम मोठ्या आचेवर ते परतून घ्यावेत.
- एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल आणि बटर घेऊन त्यात तमालपत्र, दालचिनी आणि लवंग घालावेत. त्यानंतर काश्मिरी लाल मिरची पावडर घालावी आणि लगेचच वाटलेले मिश्रण घालून घ्यावे. १० ते १५ मिनिट हे मिश्रण चांगले परतून घ्यावे
- त्यात चवीपुरते मीठ आणि गरम मसाला घालून हे मिश्रण पुन्हा ५ ते १० मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून ठेवावे.
- त्यात भाजलेले माश्याचे तुकडे आणि कसूर मेथी टाकून एक ५ मिनिटं वाफ येऊ द्यावी.
- वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम फुलके, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करावी.
वाढणी/प्रमाण:
अधिक टिपा:
आम्ही इथे स्नेकहेड फिश घेतला आहे. त्याऐवजी इतर माश्याचे फिलेट देखील वापरू शकतो. याआधी आम्ही सुरमई आणि सॅल्मन वापरूनही हि पाकृ केलीय.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हिडीओ बघितला . मस्त आहे
व्हिडीओ बघितला . मस्त आहे रेसिपी
झक्कास!
झक्कास!
आभार, जाई, मानस!
आभार, जाई, मानस!
छान. व्हिडिओ पण आवडला.
छान.
व्हिडिओ पण आवडला.
मस्त रेसिपी! फोटो आणि व्हिडिओ
मस्त रेसिपी! फोटो आणि व्हिडिओ भारी एकदम.
मस्त! व्हिडिओही नेहमीप्रमाणे
मस्त! व्हिडिओही नेहमीप्रमाणे सुंदर!
मस्तच रेसीपी आणी vedio ही
मस्तच रेसीपी आणी vedio ही सुंदर
खूप आभार मंडळी..
खूप आभार मंडळी..
तोंपासु
तोंपासु