जाड मिरच्या पाव किलो , 10 नग
तीन लहान वांगी
तीन टोमॅटो लाल
दोन कांदे चिरून
लसूण बारीक करून
कोथिंबीर मूठभर
ओले खोबरे खिसून अर्धी वाटी
साध्या मिरच्या 2 चिरून
कढीपत्ता
फोडणीसाठी तेल , मोहरी , जिरे , हळद , हिंग
चिमूटभर साखर , मीठ
जाड मिरचीचे दोन तुकडे करावेत , चाकु फिरवून आतला गर काढून टाकावा, पहिल्यांदाच केल्याने तिखटपणाचा अंदाज नसल्याने सेफर म्हणून गर काढला. नुसते नळकांडे घ्यावे,
तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करावी , जाड मिरचीचे तुकडे टाकावेत व शॅलो फ्राय करावेत , ते मउ पडतात , रंग फिका पडतो व नळ्या तडकून फुटतात,
मग कांदा लसूण घालून परतावे , कढीपत्ता व बारीक मिरच्या घालाव्यात, मग वांगी , टोमॅटो फोडी घालून परतून झाकण लावून वाफेवर शिजु द्यावे, थोडे शिजले की खोबरे व कोथिंबीर घालून मिसळून झाकण लावून शिजवावे
शेवटी साखर चिमूटभर व मीठ घालून मिसळून घ्यावे
सारण भरूनही भाजी करतात
.
दाण्याचे कूट घालूनही करता येईल
गर काढल्यावर दुसर्या दिवशी
गर काढल्यावर दुसर्या दिवशी तिखटपणा तितकाच होता की वाढला होता? जनरली ह्या मिरच्यांची भाजी केली की तो वाढतो असं लक्षात आलं आहे.
माहीत नाही
माहीत नाही
अजिबात तिखट नव्हती
अजिबात तिखट नव्हती
मस्त फोटो आणि रेसिपी !!
मस्त फोटो आणि रेसिपी !!
लसुण आणि दाण्याचा कूट यामुळे
लसुण आणि दाण्याचा कूट यामुळे छान लागते. मस्त रेसिपी.
ह्या मिरचीला हिंदी इंग्रजीत
ह्या मिरचीला हिंदी इंग्रजीत काय म्हणतात ?
पाकृ छान , पण ह्या मिरच्या
पाकृ छान , पण ह्या मिरच्या पोहे-उप्पीटात घालायच्या आहेत की वेगळ्या . भगवती मिरच्या म्हणून भाजीच्या वेगळ्या मिळतात पण रंग फिका असतो. मी ह्या म्हणतेय.
नाही , ह्या नाही वाटत
नाही , ह्या नाही वाटत
मी वापरल्या त्या फार मोठ्या व जाड होत्या
वाल आणि डाळिंब्या
वाल आणि डाळिंब्या
हळीव आणि फ्लेक्स सीडस
असे अनेक संवाद झडले आहेत
एखादा मिर्चीवर घडायला हवा
फोटो झूम केल्याने अशा दिसतायत
फोटो झूम केल्याने अशा दिसतायत बहुतेक. ह्या पण लांब आणि जाड असतात. पण रंग फोटोप्रमाणे असतो.
छान रेसिपी...
छान रेसिपी...
मला ह्या मिरचीचे नाव माहीत नाही. पण आमच्या एरियामध्ये बागायतदार ह्या मिरचीची लागवड करतात. साधारण चव सिमला मिर्चीसारखी असते. तिखट लागत नाही. आम्ही भजीची मिर्ची म्हणतो.
@ वर्णिता --- ते म्हणतायत ती
@ वर्णिता --- ते म्हणतायत ती मिरची भावनगरी मिरची नावाने नेटवर दिसतेय. मला नक्की नाव माहिती नाही.
जाड सालीची, गडद्/काळपट हिरवी, तळव्याइतकी लांब. तिखटपणाच्या बाबतीत मिरची नावाला कलंक.
भरून करायची भजी किंवा इतर पाकृ यासाठी वापरतात.
Besanwali Hari Mirchi बघा संजीव कपूर यांची (फोटोत). त्यात आहेत त्याच असाव्या बहुतेक. BLACKCAT ओळखतील.
हो
हो
https://www.google.com/search?q=bhavnagri+mirchi&client=ms-android-xiaom...
भावनगरी मिरची
ह्यात आखूड ते लांब, पोपटी ते गडद हिरवे सर्व प्रकार दिसत आहेत.
अजिबात तिखट नव्हत्या
अजिबात तिखट नव्हत्या
गर आणि बिया काढायचा उपद्व्याप नसता केला तरी कदाचित चालले असते
अरे तुम्ही दिलाय की फोटो ....
अरे तुम्ही दिलाय की फोटो .... मग वर्णिता का विचारतायत?
हो, तिखट नसतात बिलकूल. नुसत्या खाल्ल्या तरी हायहुय नाही होणार.
भरून आणि तात्पुरती लोणची / तोंडी लावणे यासाठी वापरतात.
कारवी, हो हो भावनगरी बरोबर,
कारवी, हो हो भावनगरी बरोबर, भगवती नाही, मला नाव आठवत नव्हतं.
ते मी विचारलं कारण एवढया गडद रंगाच्या कधी बघितल्या नव्हत्या. आणि मला ती ताटातली मिरची पोह्यात वगैरे घालतात तीच वाटली .
छान , मी दाण्याचा कूट, सुकं
छान , मी दाण्याचा कूट, सुकं खोबरं व तीळाचा कूट घालून वांगे न घालता करते. याला स्वतःची एक छान चव असते.
छान रेसिपी .. मी दाण्याचं कूट
छान रेसिपी .. मी दाण्याचं कूट किंवा बेसन घालून करते पण भजी जास्त आवडते .
मस्त आहे रेसेपी. फोटो खूपच
मस्त आहे रेसेपी. फोटो खूपच छान आहे. यांना भजीच्या मिर्च्या म्हणतात. वर्णिता, तू टाकलेला फोटो बहुतेक ( जर प्रत्यक्षात त्या खूप छोट्या म्हणजे बोटाच्या पेरा एवढ्या असतील तर ) कुटाच्या म्हणजे सांडगी मिर्च्यांचा आहे. वाळवुन केल्या जाणार्या त्या या मिर्च्या. ज्या आपण तळुन वापरतो.
आमच्या मुस्लिम क्लासमेटच्या आईने या भजीच्या मिर्च्या खिमा भरुन तळल्या होत्या. काही लोक यात उकडलेला बटाटा व कांदा घालतात.
सांडगी मिरची
सांडगी मिरची
मसाला भरून वाळवतात व त्याची 'ममी' उर्फ इमोटेप करतात ,
मस्त रेसिपी. ही भरलेली
मस्त रेसिपी. ही भरलेली मिरचीही तळून खूपच छान लागते.
भारी रेसिपी.. ती वाळवलेली
भारी रेसिपी.. ती वाळवलेली मिरची पण भन्नाट दिसतेय...!
रश्मी.. वैनींच्या मुस्लीम मैत्रीणीच्या आईने खीमा भरून तळलेली मिरची प्रकरण ऐकुन तोंपासु.. वैनींची मज्जा आहे राव.!
नेटवरचा आहे तो फोटो
नेटवरचा आहे तो फोटो
भावनगर मिरची / भावनगरी मिरची
भावनगर मिरची
भावनगरी मिरची