युअर फूड लॅब मध्ये हे छोले शेफ संज्योत कीर नं दाखवले तेव्हापासून करायचे ठरवत होतो पण नेहेमीप्रमाणे आळशीपणा आड आला आणि लांबणीवर पडले. मी अर्थात माझं इम्प्रॉव्ह करून त्यातही शॉर्टकट वापरला आहे. चवीची ग्यारंटी आपली!
आणि हो त्या संपूर्ण व्हिडीओ रेस्पीतून फक्त छोलेच घडवले आहेत. नक्की करून पाहा. अजिबात कठीण काम नाही.
तर साहित्य -
- २ वाट्या काबुली चणे (या कृतीत कांदा, लसूण, टोमॅटो काहीही नाही, म्हणून जरा छोले जास्त लागतात करण यील्ड त्या मानानी कमी होतं)
- ४ मिरीदाणे, २ तमालपत्रं, २ लवंगा, १ मोठी वेलची, २ हिरव्या वेलच्या, २ बारके दालचीनीचे तुकडे (इसमें उन्नीस-बीस चलेगा)
- दोन टेबलस्पून एवरेस्ट चा छोले मसाला (हाच हिरो आहे इथे तर एकदम चांगल्या प्रतीचाच वापरावा, मी सुहाना च्या मसाल्यानी केले होते हेच छोले पण तितकेसे चांगले नाही झाले)
- हवं असेल तर जराशी धने-जिरे पूड आणि लाल तिखट (मी वापरलं नाही यातलं काहीच)
- ४/५ हिरव्या मिरच्या
- एक मोठा आल्याचा तुकडा
- मीठ चवीनुसार
- पाऊण वाटी तेल (मूळ कृतीत दीड कप साजूक तूप वापरलेलं आहे)
वरून घ्यायला मसाला आलू - त्याचं साहित्य -
- ३/४ बारके बटाटे
- पाव चमचा ब्याडगी मिरचीचं तिखट
- अर्धा चमचा छोले मसाला
- मीठ चवीनुसार
- काबुली चणे स्वच्छ धुवून, ७/८ तास भरपूर पाण्यात भिजत घालावेत
- भिजल्यानंतर पुन्हा एकदा पाण्यानी धूवून घ्यावेत. आता कुकर मध्ये छोले, खडा मसाला आणि आवश्यक तेव्हढं पाणी घालून चणे चांगले मऊ शिजवून घ्यावेत.
ही झाली पूर्व तयारी.
प्रत्यक्ष कृती -
आळशीपणा करायचाय. उकडलेले चणे काढून चण्यांचं पाणी राखून ठेवावं. नको असेल तर खडा मसाला काढून घ्यावा.
लोखंडी कढईत निथळलेले चणे, छोले मसाला, आल्याचा कीस (मूळ कृतीत ज्यूलिअन्स आहेत पण आळशीपणा ठरलायं नं), मिरच्या (आख्ख्याच) आणि मीठ असं सगळं नीट मिसळून अर्धा तास झाकून ठेवावं. (हा वेळ कृतीत नाही)
अर्धा तास होत आल्यावर, एका सॉसपॅन मधे पाऊण वाटी तेल अगदी मंद आचेवर तापायला ठेवावं आणि बटाटे सोलून एकाचे ८ भाग असे चिरून, धूवून, निथळून घ्यावेत. तेल तापल्यावर बटाटे तळून चांगले तपकीरी रंगावर काढावेत. यावर ब्याडगी मिरची पावडर, छोले मसाला आणि मीठ घालून बटाटे चांगले मिसळून घ्यावेत.
तापलेलं तेल डावेनी चण्यांवर थोड घालावं आणि चणे मिसळावेत. असं जरा जरा तेल घालत जावं आणि छोले पूर्ण ओलसर झाले तेलानी की तेल घालणं बंद करावं (पूर्ण तेल शक्यतो लागणार नाही, मला अर्ध्यावाटीच्या जरा पुढे पण पाऊण पेक्षा कमी लागलं).
आता कढईखाली गॅस सुरू करावा आणि मसाले वाले चणे चांगले परतावेत. ५/७ मिनिटं मोठ्याच आचेवर तळसून झाले की २ डाव चणे शिजवलेलं पाणी त्यात घालावं अन परतणं पुढे चालू ठेवावं. असं लागेल तसं पाणी घालून लटपटी ग्रेव्ही तयार होऊ द्यावी.
नंतर अगदी मंद आचेवर १० मिनिटं ठेवून मग जरा कोथिंबीर घालून सजवावं. टिपिकल काळसर रंगाचे आणि सुरेख चवीचे छोले होतात.
वरून अजून हवं असेल तर आलं घालावं; वर तयार केलेले बटाटे घालावेत. सलाद घ्यावं आणि सोबत भटुरे, चपाती, भात असं काहीही चांगलच लागतं.
फटू हय. देताय जराटैममे...
विशेष काही नाही
हा फटू
हा फटू
(No subject)
सरळ का नाही आले नकळे
सरळ का नाही आले नकळे
छान
छान
अहाहा..मस्त आहे रेसिपी. छोले
अहाहा..मस्त आहे रेसिपी. छोले यम्मी दिसतायत
मस्त वाटतेय रेसिपी. या
मस्त वाटतेय रेसिपी. या प्रकारे कधी केलेले नाहीत. बघायला पाहिजे करून.
फोटो भारी एकदम.
फोटो भारी एकदम.
मस्त रेसिपी. करणार नक्की.
मस्त रेसिपी. करणार नक्की. शानचा मसाला वापरणार.
)
(योकु आणि सॉसपॅन?! सणसणीत तापलेल्या लोखंडी कढईला काय झालं? आणि चिमूटभरही साखर नाही ती?!
मस्त रेसिपी! बघतो करुन.
मस्त रेसिपी! बघतो करुन.
असे छोले पाकिस्तानी रेस्टाँन्ट मध्ये खाल्लेले आहेत.
छान
छान
छान आहे. वेगळी रेसिपी!
छान आहे. वेगळी रेसिपी!
फोटो तोंपासु!
मस्त
मस्त
फक्त ते लटपट ग्रेव्ही चं कळलं नाही.
@लटपट ग्रेव्ही -- लथपथ (
@लटपट ग्रेव्ही -- लथपथ ( छोल्याचे दाणे छोल्याच्याच घट्टसर ग्रेव्हीत लपेटलेले ) चे मराठीकरण असावे? आपण पळीवाढे म्हणतो ते.
@ योकु, दाणे नुसते परतायचे ना? काही थोडे रगडायचे नाहीत ना डावाने रस होण्यासाठी ?
कोथिंबीर नाही साहित्यात, पण भाजीला थोडा पालेभाजी लुक आलाय, तो कशाने?
छान आहे रेसिपी, बिन-कांदा-लसणीची. करून पहायला हवी.
रेसेपी चांगली आहे.
रेसेपी चांगली आहे.
पण आळशीपणाची नाही वाटली. सारखं तेल घाला मिसळा. पाणी घाला परता करायचं आहे म्हणुन.
त्यापेक्षा एकदा का कांदा टोमाटो कापुन तेलावर परतुन मसाले घालुन उकडलेले छोले ओतले की मंद आचेवर होत रहातात. ही आळशीपणाची रेसेपी वाटते.
Ho
Ho
मायबोलीवर हीच फेमस आहे
सगळे एकदाच घालून शिजवणे , मग त्याचा फोटू इथे लावणे व मग खाणे
https://www.maayboli.com/node/26710
अमृतसरी छोले मायबोलीवर अमर
अमृतसरी छोले मायबोलीवर अमर आहेत
पण पिंडी चनाही करून बघण्यात येईल
मस्त वाटतेय
मोबाईल क्याम्रा landscape
मोबाईल क्याम्रा landscape mode चिन्ह दाखवत असतानाच उभा धरलाय. फोटो exif data पाहा. Width पेक्षा लांबी कमी. माबोने आहे तसा आडवा दिला. ( एडीटर apps वापरून फिरवून मग अपलोड करावा लागेल.
बाकी 'पिंडी' म्हणजे काय?
रावळपिंडी नेताजी बोस की जय
रावळपिंडी
नेताजी बोस की जय
रेसीपी वाचल्यावर खरंच सोपी
रेसीपी वाचल्यावर खरंच सोपी आणि टेम्पटिंग वाटली. पण मला रंग नाही आवडला. चव नक्कीच मस्त असणार आहे.
रावळपिंडीला रावळपिंडीमध्ये पण
रावळपिंडीला रावळपिंडीमध्ये पण रावळपिंडीच म्हणतात का, with "ळ"?
हिंदी,उर्दूमधे ळ नाही
हिंदी,उर्दूमधे ळ नाही.त्यामुळे रावलपिंडी.बरेचदा रोजच्या वापरात फक्त "पिंड"म्हटले जाते.
हिंदी,उर्दूमधे ळ नाही
हिंदी,उर्दूमधे ळ नाही.त्यामुळे रावलपिंडी.बरेचदा रोजच्या वापरात फक्त "पिंड"म्हटले जाते. >> धन्यवाद! आपण मराठीत त्यांच्या नावात उगाच ळ का लावतो माहीत नाही. मुळात रावलपिंडी आहे ना?
जसे यमुना,उत्तरेत जमुना(जमना)
जसे यमुना,उत्तरेत जमुना(जमना) ओळखली जाते,तसे काहीसे असावे.बाप्पा रावळ्,शिवभक्त होते.त्यांच्यावरून आले असेल का हे नाव?
सॉरी फॉर अवांतर!
1493 मध्ये झंडा खानने रावल हे
1493 मध्ये झंडा खानने रावल हे नाव दिले म्हणे. (हरयाणवी भाषेत ळ आहे, हे जाता जाता नमूद करतो).
मी सुरू केलेली ही चर्चा फारच विषयाला सोडून आहे, याबद्दल क्षमस्व.
हिंदीतही ळ सुप्रीम कोर्टाने
हिंदीतही ळ सरकारने वाढवले
https://maharashtratimes.com/career/career-news/use-of-the-letter-l-in-d...
अमितव +१
अमितव +१

पण हा “ करण यील्ड ” कोण? ते “पुरवठा” वाले का?
हिंदीतही ळ सरकारने वाढवले >>
हिंदीतही ळ सरकारने वाढवले >> ते ठीक आहे. पण म्हणून आपण नको तिथे ळ वापरायचं काही कारण नाहीये.
धन्यवाद लोक्स !
धन्यवाद लोक्स !
मीरा.. >> हो रंग नक्कीच चांगला येत नाही पण चवीला फार सुरेख लागतात.
फॉर अ चेंज
कारवी >> पालेभाजी लूक वरून अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यानी आलाय. वर साहित्यात लिहायचं विसरलोय
स्वाती
काल केले आणि छान झाले.
काल केले आणि छान झाले.

योकुने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये सांगितली आहे तशी चहा पावडर (सगळे मसाले आणि चहा पावडर पुरचुंडी करुन) छोले शिजताना घातली. त्याने रंग चांगला आला. आणखी काळपट रंग हवा असेल तर कास्ट आयर्न कढईत करेन पुढच्यावेळी.
जैन छोले म्हणून लोकांनी टर उडवत खाल्ले.
मस्त फोटो
मस्त फोटो
आवर्जून करून पाहून इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद!