पनीर पराठा (व्हिडिओ सोबत)

Submitted by डीडी on 18 December, 2020 - 08:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मल्टि ग्रेन / गव्हाचे पीठ - १ १/२ कप
मीठ
तेल

पनीरचे सारण:
पनीर - २०० ग्रॅम्स
कांदा - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून
हिरवी मिरची - १ बारीक चिरून
पुदीना पाने - १२ ते १५ बारीक चिरून
कोथंबीर - १/२ कप बारीक चिरून
आले-लसूण पेस्ट - २ टिस्पून
ओवा - १/२ टिस्पून
धणे पावडर - १ टेबलस्पून
काळी मिरी पावडर - १ टिस्पून
लाल तिखट - १ टिस्पून
अमचूर पावडर - १ टिस्पून (ऐच्छिक)
कसुरी मेथी - २ टिस्पून
मीठ - चवीनुसार
तूप

क्रमवार पाककृती: 
  • एका भांड्यात गव्हाचे पीठ, तेल, मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ चांगले मळून घ्या आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.
  • पनीरचे तुकडे करून १० मिनिटे थोड्या पाण्यात घालून ठेवा.
  • पनीर पाण्यातून पिळून घेऊन एका भांड्यात छान चुरून घ्या.
  • त्यामध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून सारण बनवून घ्या.
  • कणिक थोडी मळून, कणकेचे समान आकाराचे गोळे करून त्याची पोळी थापून अथवा लाटून घ्या.
  • त्यावर पराठ्यात मावेल एव्हढं सारण घाला.
  • वरून अजून एक लाटलेली पोळी ठेऊन कडा घट्ट दाबून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर काही तेलाचे थेंब टाकून टिश्यू पेपर किंवा कापडाने पुसून टाका.
  • गरम तव्यावर लाटलेला पराठा घाला आणि कडेने थोडे तेल / तूप सोडा. एका बाजूने भाजून झाला कि पराठा परता आणि सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
  • गरम पनीर पराठे दही/ राईत्या सोबत सर्व्ह करा.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast व्हिडिओ!पनीर पराठा आवडीचा आहे. पनीर पराठयात कांदा घातला नव्हता.पुढल्यावेळी कांदा घालून करेन.

धन्यवाद जाई..!

देवकी,
आम्ही कांदा घालून व कांद्याशिवाय करतो.. पण कांद्यासोबत जास्त moist आणि टेस्टी वाटला. केला तर नक्की सांगा कसा वाटला.. व्हिडीओ आवडल्याबद्दल आभार!