- मटण - १/२ किलो
- बासमती तांदूळ - ४०० ग्रॅम
- जिरे पावडर - १ टीस्पून
- धणे पावडर - २ टीस्पून
- लाल तिखट - २ टीस्पून
- दालचिनीच्या काड्या - ४
- काळी मिरी - १ टीस्पून
- तमालपत्र - २
- मसाला वेलची - १
- चक्रफुल - १
- दगडफूल - १ चिमूट
- लवंग - ६ ते ८
- वेलची - १० ते १२
- कांदे - ४
- तेल - ४ टेबलस्पून
- आलं लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
- दही - २ टेबलस्पून
- पुदिना पानं - १/२ कप
- कोथंबीर - १/२ कप
- हिरवी मिरची - ३ ते ४
- कोमट दूध - १/२ कप
- केशर - १/२ टीस्पून
- लिंबाची फोड - १
- गहू पीठ १/५ कप
- मीठ
- पाणी
यावेळी पहिल्यांदा 4K 60 FPS व्हिडीओ शूट आणि edit केला. मजा आली. बघा कसा जमलाय.
१. मटण चांगले धुऊन घ्या आणि मॅरिनेशन साठी त्यामध्ये मीठ, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, अख्खे मसाले, शेंगदाणा तेल, हिरवी मिरची आणि आल-लसूण पेस्ट घाला.
२. नंतर दही घाला.
३. मॅरिनेशन मटणाला चांगले चोळून घ्या आणि झाकून ठेवा. कमीत कमी ३ ते 4 तास किंवा रात्रभर फ्रिज मध्ये ठेऊन द्या. या पद्धतीमुळे मटण नरम होईल आणि लवकर शिजेल. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले असेल तर इतर तयारी सुरू करण्यापूर्वी ते फ्रिज मधून काढून बाहेर ठेवा कारण गॅस वर चढवण्या आधी ते रूम टेम्परेचरला येणे आवश्यक आहे.
४. कांदे बारीक चिरून घेऊन ते मोकळे करा आणि गोल्डन ब्राऊन व कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्या.
५. कोथिंबीर आणि पुदीना पाने धुऊन छान कोरडी करून मग जाडसर चिरून घ्या.
६. मॅरीनेट केलेल्या मटनामध्ये १/२ तळलेले कांदे आणि १/३ चिरलेली पाने घाला.
७. केसर कोमट दुधात भिजवा आणि बाजूला ठेवा.
८. बासमती तांदूळ २ वेळा धुवा आणि ३० मिनिटे पाण्यात भिजवत ठेवा.
९. पीठ भिजवा आणि बाजूला ठेवा.
१०. भात करण्यासाठी पाणी उकळत ठेवा. त्यात मीठ, अख्खे मसाले, चिरलेला १/३ पुदीना आणि १/३ कोथिंबीर, लिंबाची फोड आणि थोडे तेल घाला.
११. उकळत्या पाण्यात तांदूळ घाला आणि भात ८०% पर्यंत शिजवा.
१२.जाड बुडाच्या पॅन मध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये सगळं मटण तळाशी घाला.
१३. भात गाळून घ्या.
१४. गाळलेला भात गरम असताना लगेचच मटणावर पसरवून टाका.
१५. भातावर आणि सर्व बाजूने तूप घालून घ्या.
१६. शिल्लक राहिलेले पुदिना आणि कोथंबीर पाने घाला.
१६. केशर भिजवलेले दूध घाला.
१७. तळलेले कांदे घाला
२०. भिजवलेली कणिक लावून भांड्याचे झाकण घट्ट बंद करा जेणेकरून वाफ जराही बाहेर जाता नये.
२१. प्रथम मोठ्या आचेवर ५ ते १० मिनिटे ठेवा.
२२. त्यानंतर आच कमी करा आणि मंद आचेवर ४० ते ४५ मिनिटं बिर्याणी दम होण्यासाठी ठेवून द्या किंवा तवा गरम करून त्यावरही हे पॅन ४० ते ४५ मिनिटांसाठी दम साठी ठेवून द्या.
विडिओ खूप भारी आहे. खूप
विडिओ खूप भारी आहे. खूप आवडला. रेसिपीही छान आहे.
मस्त रेसिपी. व्हिडिओ झकास.
मस्त रेसिपी. व्हिडिओ झकास.
व्हिडिओ पाहिला नाही अजून्,पण
व्हिडिओ पाहिला नाही अजून्,पण छान केलेत.बाकी पाकृ. मस्त आहे.
छान
छान
व्हीडीओ आणि पाकृ छान
व्हीडीओ आणि पाकृ छान
वा वा वा वा.. एक्दम भन्नाट अन
वा वा वा वा.. एक्दम भन्नाट अन सोपी पद्धत शिकवल्याबद्दल धन्यवाद..!
पण मटण मॅरिनेट केलेलं आहे म्हणुन तासाभरात मंद आचेवर व्यवस्थीत शिजु शकेल ना ही एक बाळबोध शंका आली.... व्यवस्थीत शिजेल ना..? की त्यासाठी कच्च्या पपईची चमचाभर पेस्ट मटणाला चोळावी..??
रेसिपी तर उत्तम च ..पण
रेसिपी तर उत्तम च ..पण व्हिडिओ एडिटिंग भारीच जमलंय बुवा....
मस्त फोटो.नंतर पुन्हा
मस्त फोटो.नंतर पुन्हा संदर्भासाठी वापरेन. आभार्स
वा, व्हिडिओ प्रेझेन्टशन एकदम
वा, व्हिडिओ प्रेझेन्टशन एकदम भारी जमलंय!
मस्त रेसेपी. उगीच सोपी वाटतेय
मस्त रेसेपी. उगीच सोपी वाटतेय आणि करुन बघायचा मोह होतोय.
विडीओ भन्नाट आहे.
भारी विडिओ एकदम प्रोफेशनल
भारी विडिओ
एकदम प्रोफेशनल
साधना, मानव, देवकी, अभि_नव,
साधना, मानव, देवकी, अभि_नव, जाई, DJ, चिमु, वेका, maitreyee, सस्मित, ऋन्मेऽऽष, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. खूप छान वाटलं तुमच्या प्रतिसादाने..
सस्मित, खरं सांगतो, उगाच बाऊ
सस्मित, खरं सांगतो, उगाच बाऊ केलेल्या पाकृ मधील हि एक आहे. खरंच खूप खूप सोपी आहे करायला. जर meat किती tender आहे अंदाज नसेल तर १० मिनीटं जास्त शिजवा.. बास!
DJ.. ,मी बरेचदा अगदी तासभर
DJ.. ,मी बरेचदा अगदी तासभर मॅरिनेट करूनही केली आहे बिर्याणी. पण इथे मटण एकदम कोवळं मिळतं. जर मटण जुन असेल, तर पपई पेस्ट घाला.. अथवा, दह्याचं प्रमाण थोडं वाढवून, १५ मिनीटं अधिक दम होऊ द्या..
व्हिडिओ एकदम मस्त ,कलात्मक
व्हिडिओ एकदम मस्त ,कलात्मक आहे
meat किती tender आहे अंदाज
meat किती tender आहे अंदाज नसेल तर १० मिनीटं जास्त शिजवा>> म्हणजे कमी आचेवर अजुन १० मिनिट ना? ही रेसेपी करुन बघणार.
चिकन बिर्याणीची पण आहे का रेसेपी?
मस्त रेसिपी. सुंदर व्हिडिओ.
मस्त रेसिपी. सुंदर व्हिडिओ.
मस्त रेसिपी आणी वेडीयो पण
मस्त रेसिपी आणी वेडीयो पण छान
फार सुंदर झालाय विडीओ.
फार सुंदर झालाय विडीओ. पाकृही छान!
खूप आभार देवकी, अतरंगी,
खूप आभार देवकी, अतरंगी, Amupari, स्वाती२..
सस्मित, हो मंद आचेवर १०
सस्मित, हो मंद आचेवर १० मिनिटं अजून. एकवेळ राईस जास्त शिजला चालेल, meat अर्धकच्चं नको राहायला.
मी चिकनची ह्याच पद्धतीने करतो, फक्त मसाला आणि तेलाचे प्रमाण किंचित कमी करून १० मिनिटं कमी शिजवतो..
व्हिडिओ, प्रेझेन्टशन एकदम
व्हिडिओ, प्रेझेन्टशन एकदम सुंदर !!