मदत हवी आहे

Submitted by अमृताक्षर on 5 December, 2020 - 02:07

नमस्कार मंडळी.
मला आज तुमची थोडीशी मदत हवी आहे.
बाबांना आणि मला वाचनाचा छंद असल्यामुळे आमच्याकडे खूप वेगवेगळ्या विषयांचा पुस्तक संग्रह आहे. ही पुस्तकं थोडी थोडी बाबा आणि माझ्या रूम मधे असलेल्या कपाटात असायची पण हळूहळू ती इतकी जास्त झालिये की पुस्तकांची एक स्वतंत्र रूम असावी यावर आमचं एकमत होऊन नुकतीच वरच्या फ्लोअर ला आमची छोटीसी लायब्ररी तयार झाली आणि आमची लाडकी पुस्तकं सुद्धा त्यांच्या नव्या घरात थाटात विराजमान झाली.
आम्ही बाप लेकीने विषयानुसार पुस्तकं वेगळी केलीत आणि वेगवेगळ्या पुस्तकांच्या कपाटात सेक्शन्स करून ठेवलीय. मला आता फक्त त्या प्रत्येक सेक्शन साठी नेम प्लेट लावायची आहे म्हणजे कथा कादंबऱ्या चा एक सेक्शन. सामाजिक एक. धार्मिक एक. सेल्फ हेल्प एक..अशाप्रकारे.
घरीच प्रिंटर असल्यामुळे मी ते टाइप करून प्रिंट करणार आहे पण मराठी मधे चांगले फाँट ( जे इंग्लिश मधे variety असतात ) मोबाईल वर टाइप करता येत नाहीये. थोडे attractive background ला बुक्स रचलेली वगैरे असा काही चांगला फॉरमॅट मिळत नाहीये.
उदाहरणार्थ-
IMG_20201205_123106.jpg
यावर मस्त कथा कादंबऱ्या कविता सामाजिक असं टाइप करायचा प्रयत्न केला पण ते एकदम च सिंपल वाटतं आहे.
तुमच्यापैकी कुणाला चांगल्या फाँट मधे मराठी टायपिंग बद्दल काही आयडिया असतील किंवा कुठले ॲप्स किंवा साईट्स माहिती असेल तर कृपया कळवा.
रेडीमेड तशा इमेज मिळत असतील तरी चालेल. मी डायरेक्ट प्रिंट करून घेईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोफेशनल फोटोशॉप करणाऱ्या व्यक्ति कडून सशुल्क कैलीग्राफी करवुन घ्या म्हणजे अतिशय कलात्मक आणि पर्सनल टच मिळेल

प्रोफेशनल फोटोशॉप करणाऱ्या व्यक्ति कडून सशुल्क कैलीग्राफी करवुन घ्या म्हणजे अतिशय कलात्मक आणि पर्सनल टच मिळेल

अमृताक्षर आपली मायबोलीकर नीलू हिला कॉन्टॅक्ट करा. ती आर्टिस्ट आहे आणि हा तिचा व्यवसाय आहे. फार सुरेख असतं तिचं काम.