Submitted by pltambe@yahoo.co.in on 30 November, 2020 - 20:59

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
शिजवलेला भात, टिकत,मीठ,पिठीसाखर ,काजू पाकळी,बेदाणे,शेंगदाणे , पंढरपुरी फुटाण्याचे डाळं,कढीपत्त्याची पाने, फोडणीचे साहिती,तेल
क्रमवार पाककृती:
रात्रीचा उरलेला भात हाताने मोकळा करून घेऊन वरून तिखट, मीठ, थोडीशी पिठीसाखर चोळून घ्यायची उन्हात पूर्ण वाळवून घ्यायचा आणि असा वाळवलेला भात नंतर त्यात उभा चिरलेला कांदा,बारीक चिरलेला लसूण , पंढरपूरी डाळं , शेंगदाणे,काजू ,बेदाणे व कढीपत्त्याची पाने यांचासह तळून घ्यायचा इतका अप्रतिम लागतो ना हा चिवडा
वाढणी/प्रमाण:
४-५ जणांसाठी
माहितीचा स्रोत:
स्वनिर्मिती
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा, वेगळीच रेसिपी वाचली.
वा, वेगळीच रेसिपी वाचली.
शिळ्या भाताला काजू बेदाणे
शिळ्या भाताला काजू बेदाणे घालून अपग्रेड केलेत. आम्ही फक्त लसूण,हिरवी मिरचीने वाढवतो.
भारीच प्रकरण दिसतंय हे....
भारीच प्रकरण दिसतंय हे.... करुन पहायलाच हवं..!
वाळवुन ठेवलेला भात लगेच तळायचा की बरणीत भरुन हवा तेव्हा हवा तेवढा तळता येतो..??
म्हण्जे असा वाळवलेला भात
म्हण्जे असा वाळवलेला भात साठवून ठेवायचा का? आणि नंतर जेंव्हा लागेल तसा चिवडा करून खायचा?
हो.. हो.. तसंच विचारायचं होतं
हो.. हो.. तसंच विचारायचं होतं मल अर्पणा तै. तसा तो टिकतो की नाही तेच विचारायचं होतं.. म्हणजे कसं की आली लहर केला कहर टाईप करता आला पाहिजे.
>>>हो.. हो.. तसंच विचारायचं
>>>हो.. हो.. तसंच विचारायचं होतं मल अर्पणा तै. तसा तो टिकतो की नाही तेच विचारायचं होतं.. म्हणजे कसं की आली लहर केला कहर टाईप करता आला पाहिजे.
नुसता भात + मीठ-तिखट वाळवून ठेवला तर राहील असं वाटतय. पण पीठी साखर पण आहे कृतीत , त्यानं उन्हात पाणी सुटेल असं वाटतय.
पण छान लागेल.
आम्ही असे शिळ्या भातात हिरवी मिरची/मीठ/ जिरे घालून सांडगे करून वाळवतो. ते हवे तसे तळून खायचे.
आम्ही असे शिळ्या भातात हिरवी
आम्ही असे शिळ्या भातात हिरवी मिरची/मीठ/ जिरे घालून सांडगे करून वाळवतो. ते हवे तसे तळून खायचे.>> अरे वा.. हे पण इंटरेस्टिंग आहे की. हे मी नक्की करेन... भन्नाट प्रकार दिसतोय हा..!
नक्की करा. फार छान लागतात.
नक्की करा. फार छान लागतात. डाळीचे सांडगे जसे करतो तसेच करायचे पण डाळीचे सांडगे भाजी / भाजी नसेल तर म्हणून वापरतो आणि हे भाताचे सांडगे नुसते तळून खायला - पापडासारखे
नक्की करणार अर्पणा तै अन फोटु
नक्की करणार अर्पणा तै अन फोटु पण टाकेन
एवढा शिळा भात क्सा काय उरतो?
एवढा शिळा भात क्सा काय उरतो?
रात्रीचा थोडा भात उरला की दुसर्या दिवशी कुकरला एक शिटी का ढुन गरम करुन जेवणात खातो.
किंवा फोडणीचा भात करुन.
कधी कधी जास्त पाहुणे आले
कधी कधी जास्त पाहुणे आले म्हणुन भात जास्त केला जातो अन जास्तच शिल्लक उरतो त्या वेळी हे असं करायचं.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/20814
हे केले होते एकदा
ब्लॅककॅट, हे पण भारी दिसतंय -
ब्लॅककॅट, हे पण भारी दिसतंय - उरलेल्या भाताचे वडे..!
फोभा कुठल्याही बिर्याणीच्या
फोभा कुठल्याही बिर्याणीच्या तोंडात मारेल असा चविष्ट होतो.
अजून काही पर्याय -
वाळवलेला भात ज्वारी दळायला देताना त्यात घालून द्यायचा.
वाळवलेला भात इडली करताना वापरायचा
डोसा बॅटर मधे घालायचा
डोसा बॅटर मधे घालायचा
खूप उरला तर किंवा मुद्दाम उरवून - पाण्यात / ताकात भिजवून (पूर्ण बुड्वून) + १ कांद्याचे ४ तुकडे + २ हिरव्या मिरच्या + खडे मीठ घालून रात्रभर ठेवणे . दुसर्या दिवशी हिंग / जीरे / कढीप्त्ता / उडीद डाळची फोडणी वरून घालून उन्हाळ्यातला उत्तम नाश्ता. बी जीवनसत्वाची कमतरता असेल तर जरूर खावं. कैरी / आलं असेल तर किसून घालतात.
याला पखला / पाखला म्हणतात ओरिया भाषेत आणि २० मार्चला आंतराष्ट्रीय पखला/पाखला दिवस अस्तो त्यांच्याकडे, ऋतू बदल उन्हाळा चालू होतो म्हणून साजरा करतात
ओ अर्पणा तै, ते ते तुम्ही
ओ अर्पणा तै, ते ते तुम्ही प्लिज कृती सांगा ना प्लीज.. पाखला राईस ची.
अहो, १० वर्षांपुर्वीची गोष्ट. माझा टीम मेट ओरिसाचा होता. त्याची बायको माहेरपणाला गेली होती आणि तो एकटाच घरी रहायचा. जेवणासाठी तो असला राईस बनवुन आणायचा. सकाळी लवकर म्हणजे ८ ला ऑफिस ला यावं लागायचं म्हणुन तो रात्रीच जास्त भात बनवुन तुम्ही सांगता तसा पाण्यात बुडवुन ठेवायचा अन सकाळी त्यावर सोपस्कर करुन डब्यात घेऊन यायचा. त्याने हे रात्रीच पाण्यात भिजवलेलं प्रकरण सांगितल्यामुळे मी आजिबात धाडस केलं नाही त्याच्या डब्यातला तो भात खाण्याचं.. पण आता वाटतंय मी काहीतरी चवीचं खाणं मिस केलं
प्लीज एक कृती लिहाच ना आणि हवं तर आज जास्त भात बनवुन उद्या नाश्ट्यासाठी तो पखला राईस बनवा (म्हणजे फोटो टाका असा त्याचा दुसरा अर्थ
)
डीजे, इकडे कुल्फी व्हायची वेळ
डीजे, इकडे कुल्फी व्हायची वेळ आलीये इतकी थंडी पडलीये, पाखला नाही खाणार घरातले .
मी मार्च मधे नक्की करेन आणि फोटो टाकेन .
कृती वर लिहिलीये की.
१. उरलेला भात - रूम टेंपरेचर ला हवा, गरम नको.
२. मातीचं भांड असेल तर सर्वात उत्तम, नसेल तर काचेचं/स्टील्च चालेल
३. भांडयात भात मोकळा करून घेणे आणि पूर्ण बुडेल इतकं पातळ ताक घालणे . पाणी सुद्धा चालेल पण मी ताकात भिजवते.
४. त्यातच एका कांद्याचे ४ तुकडे करून टाकणे - २ वाटी भात आसेल तर एक मध्यम आकाराचा कांदा
५. त्यातच २-३ हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे करून टाकणे, थोडे मेथीचे दाणे घालायचे ( फक्त फ्लेवर साठी)
६. चवीनुसार खडे ठेवणे
७. झाकण लावून ७-८ तास / ओवरनाईट ठेवणे
८. दुसर्या दिवशी चव बघणे , खूप पातळ वाटत असेल तर थोडं पाणी काढून ठेवणेआणि २-३ चमचे दही घालणे भातात. हे पाणी टाकून नाही द्यायचं, प्यायच.
९. छान मिक्स करून घ्यायच (काही लोक्स मिक्सर मधून काढतात, मी कुस्करते). कच्ची कैरी असेल तर किसून घालायची, एकदम थोडसं आलं किसून घालायचं
१०. चर्चरीत हिंग, उडीददाळ, कढीपत्त्याची फोडणी द्यायची, मीठ अॅड्जेस्ट करायचं. कोथिंबीर चिरून घालायची आणि गट्ट्म . दाक्षिणात्य नारळाच्या तेलात फोडणी देतात, मी आपली तूपातच देते. कांदा/मिरची कच्चीच आहेत .
मँगो थोक्कू नावाचं लोणचं मिळतं ते याबरोबर अप्रतिम लागतं, तळणीच्या मिरच्या पण .
उन बाधत नाही असं खाउन उन्हात काम केलं की असं समजलं जातं .उष्णतेचे त्रास कमी होतात.
तांबे काका, सॉरी तुमचा धागा
तांबे काका, सॉरी तुमचा धागा हायजॅक झालाय माझ्याकडून .
भात पाण्यात बुडवून ठेवण्याचा
भात पाण्यात बुडवून ठेवण्याचा प्रकार मलबार, कर्णाटक, दक्षिण कोकणात असतो. कंजी म्हणतात त्याला काही ठिकाणी. वरून फोडणी किंवा भातात मिरच्या मीठ घालून चव वाढवतात. किंचित आंबसर असे हे पेय उन्हाळ्यात मुद्दाम पितात. उन्हाळा बाधत नाही या मुळे.
हा भात खातानचे व्हिडिओज
हा भात खातानचे व्हिडिओज अहेत. आपल्याला असा भात खायची सवय नसल्याने बघायल जरा डेंजर वाटतात
मी मार्च मधे नक्की करेन आणि
मी मार्च मधे नक्की करेन आणि फोटो टाकेन .>> अर्पणा तै... मनापासुन धन्यवाद..! इंटरेस्टिंग आहे हा पखला राईस पण त्या ओरिसियन मित्राने आधी खायला घालुन मग त्याबद्दल बोलायला हवे होते म्हणजे इतकी १० वर्षं त्यापासुन वंचीत राहिलो नसतो..
मी नक्की बनवेन आणि मिच फोटु टाकेन.. पण इथेही जरा थंडी वाढली आहे. थोडी गरमी वाधली की मग करेन.. भारी वाटेल..!