सुकट जवळा, सोडे चिवडा

Submitted by विक्रमसिंह on 25 November, 2020 - 07:07
javala chivada
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुकट जवळा १ वाटी
शेंगदाणे १ वाटी
कांदे
लाल तिखट
हळद
मीठ
काजू -१०
खोबरे काप -१०
लसूण - ५-६
तेल

क्रमवार पाककृती: 

सुकट जवळा आणून नीट निवडून , धूउन घ्या.

सुकट जवळा आणि शेंगदाणे तेलात वेगवेगळे तळून घ्या. कांदा लांब कापून कुरकुरीत तळून घ्या.
तेलात खोबर्‍याचे काप, कापलेले लसूण, हळद, तिखट, मीठ (चवीप्रमाणे), काजू परतून घ्या व नंतर आधी तळलेले पदार्थ मिसळून सर्व परत परतून घ्या. चवी प्रमाणे मीठ घालून नीट मिसळा.
सुकट जवळा चिवडा तयार.

साधारण बटाट्याच्या उपासाच्या चिवड्यासारखा दिसायला व तसाच कुरकुरीत झाला पाहिजे.

वाढणी/प्रमाण: 
तुम्हाला पाहिजे तेवढा करून बरणीत शेव, चिवड्याप्रमाणे भरून ठेऊ शकता.
अधिक टिपा: 

खूप दिवसांपासून माझी इच्छा होती हा पदार्थ बनवायची. मी हा उपासाच्या बटाटा चिवड्यासारखा दिसणारा पदार्थ इंडोनेशियात खाल्ला होता. नंतर शोधूनही कुठेही मिळाला नाही. शेवटी सुकट जवळा (मासा) दिसला आणि मग प्रयत्नांती परमेश्वर याचा प्रत्यय आला. एकदम टेस्टी, कुरकुरीत, आणि सुवास. Happy खोबरे, काजू माझे अ‍ॅडिशन. यात बारके झिंगे पण टाकता येतात.
सोडे आणि बटाटा कीस असलेला चिवडा बनवलाय व त्याचा फोटो खाली प्रतिसादात चिकटवला आहे.

कशालाही न लावता चिवड्या सारखा वाटीभर खाऊ शकता.

सुकटचा अर्थातच करताना उग्र वास येतो. खाताना फार जाणवत नाही.

माहितीचा स्रोत: 
मी इंडोनेशियात खाल्लेला पदार्थ आणि you tube ( Ikan Teri kacang tanah lama)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता कसं.. अशा पाककृती आल्या की वाचायला आणि बनवायला मजा येते.. जवळा कुठे मिळाला? Hmart मधे मिळेल का?
अवांतर- भारतातून बाहेर कोणी जवळा किंवा बोंबील घेऊन गेलंय का?

म्हाळसा, भारतातून जवळा वगैरे न्यायची रिस्क नका घेवू. मी इथे इंटरनॅशनल मार्केटात मिळते ती अंबाडी सुकट आणते. मेक्सिको किंवा थायलंडची असते. सुके बोंबिलही छान पॅक केलेले मिळतात , भारतातले असतात. मी ट्राय केले नाहीत कारण महाग वाटले.

मेक्सिको किंवा थायलंडची असते>> पहिल्या डिलेव्हरीनंतर दाबून सुक्क्या बोंबलाची आमटी खात होते.. पण दुसरी मुलगी मेक्सिकोत जन्मली आणि अंड्याच्या आमटीवरच समाधान मानलं होतं.. मेक्सिकोत आणि अमेरिकेत कधी जाऊन सुकी मच्छी शोधली नाही.. पण आता Hmart मधे शोधेन.. मिळेल कदाचित..

भारतातून जवळा वगैरे न्यायची रिस्क नका घेवू. ... Custom cha kahi problem asto ka?karn mazi ek नातलग भरभरून नेते.फक्त उत्सुकतेपोटी विचारतेय.

बिरबलाच्या गोष्टीतला केशर का हलवा आठवला धाग्याचे नाव वाचून
मला वाटते यात बटाट्याचा किसही टाकून सुकटाचा उग्रपणा कमी करता येईल वा ते छान लागेल. जसे की बोंबीलबटाटा कॉम्बो हिट आहे.

देवकी,
सुकी मासळीबाबत 'पर्सनल क्वांटिटी' चालेल असे म्हणतात. म्हणजे नक्की किती ते पुन्हा तुमच्या पोर्ट ऑफ एंट्रीला कोण ऑफिसर त्यावर. डिक्लेअर केले नाही आणि पकडले तर कटकटी होवू शकतात. बरेच जण आणतात. हे नियम बदलत असतात त्यामुळे निघण्याआधी माहिती बघावी. सध्या कोविड काळात प्रवास करताना सगळेच जरा कठीण झाले आहे. अशावेळी सुकी मासळी वगैरे आणणे किती वर्थ आहे असे मला तरी वाटते.

माझी नातलग काय करते माहीत नाही,पण भरभरून न्यायची असे ती म्हणे .असो.

सध्या कोविड काळात प्रवास करताना सगळेच जरा कठीण झाले आहे. अशावेळी सुकी मासळी वगैरे आणणे किती वर्थ आहे असे मला तरी वाटते....he खरेच आहे.

सुकट जवळा (मासा) दिसला>>>>

हा आपला जवळाच ना?? म्हणजे बेबी कोलंबी? तुम्ही मासा असे लिहिलेय म्हणून विचारते.

मागे ह्यातलाच मासा विचारलेला तुम्ही, तो जवळा नव्हता, दुसरा कुठलातरी मासा होता.

बाकी रेसिपी छान. केल्या केल्या संपेल बहुतेक Happy Happy

बेबी कोलंबी >> वाळवलेल्या बेबी कोलंबीला सोडे म्हणतात अस आमच्याइथल्या मासेवाल्याने सांगितले. पण यात सोडे घालायची पण माझी आयडिया आहे.

केल्या केल्या संपेल बहुतेक>> नक्कीच. १०० % हमी. आमच्या कडची बरणी संपली Happy

तो जवळा नव्हता, दुसरा कुठलातरी मासा होता. >> तो मांदेली. (अँचोवी)पण तो मी पाहिलेल्या प्रकारापेक्षा मोठा होता.
सुकट जवळा अगदी फिट बसला. मी उपासाच्या बटाटा चिवड्यासारख्या दिसणार्‍या पदार्थाच्या शोधात होतो. ते सापडले.

बेबी कोलंबी>> हो..बेबी कोळंबीला जवळा आणि त्याहून जरा मोठ्या आकाराच्या वाळवलेल्या कोळंबीला सोडे म्हणतात

पण यात सोडे घालायची पण माझी आयडिया आहे.>>>

सोडे तळल्यावर कुरकुरीत होणार नाही असे वाटतेय.

यात जवलाच बेस्ट. सुकी मोदकं पण चालतील.

सुकून पोह्यासारखे पातळ झालेले कुठलेही छोटे मासे चालतील. पण जरा जाड मासे चालणार नाहीत कारण ते सुकून त्यांचे मांस कडक झालेले असते. ते एकतर बांगड्यासारखे भाजून किंवा तिकले करून खावे लागतात किंवा सोड्यासारखे आधी भिजवून नंतर भाजीत घालून शिजवावे लागतात.

कुठे फेडाल हि पापं विक्रमसिंग Happy कसला कातिल रेस्पी आहे.

म्हाळसा, भारतातून जवळा वगैरे न्यायची रिस्क नका घेवू. मी इथे इंटरनॅशनल मार्केटात मिळते ती अंबाडी सुकट आणते. मेक्सिको किंवा थायलंडची असते. सुके बोंबिलही छान पॅक केलेले मिळतात , भारतातले असतात. मी ट्राय केले नाहीत कारण महाग वाटले. >> स्वाती कुठले मार्केट ? अंबाडी सुकट काय असते ?

असामी,
आमच्या भागात सरागा इंटनॅशनल म्हणून आहे त्यांच्याकडे सुकट , खारवलेला कॉड वगैरे मिळते. मोठे मेक्सिकन ग्रोसरी स्टोअर असते तिथे देखील मिळेल सुकट. ड्राय केलेला कॉड असतो तिथे असतात पाकिटे. प्लेन आणि बार्ब्रेक्यू असे दोन प्रकार असतात. देशी प्रकार करायला प्लेन घ्यायची. साधारण $१४-$१५ ला एक पाउंड भाव असतो. पण सुकट वजनाला हलकी असल्याने भरपूर येते.
अंबाडी सुकट म्हणजे जाडी, पिवळट्,/लालसर रंगाची असते ती. जवळा सुकट बारीक आणि पांढरी असते.

असामी,
देशातले सुके बोंबिल मी पटेल कडे फ्रोजन मासे असतात तिथे बघितले होते एकदम खालच्या कप्प्यात.

We get all the suke mase (Bombil, Sode, Sukat, Javla, Karadi, Bangde) properly cleaned and packed, while returning from India to USA. Plenty of times US Customs has opened our bags, and have seen them, but no objection was taken. We bring the small quantities (0.5 or 1 kg each), so even if someone objects, we are ready to throw them away. But this hasn't happened in past 20+ years and we visit India almost every year.