साहित्य -
1) खजूर -1 वाटी
2) काळे मनुके - 1/2 वाटी
3) तीळ -1/4 वाटी
4) कोको पावडर - 50ग्रॅम.
5) शतावरी कल्प -1/2 वाटी
6) तूप -2 चमचे.
1) खजुरातील बिया काढून घेणे.
2) काळे मनुके आणि हा खजूर
1 चमचा तूप घालून मिक्सर
मधून फिरवून घेणे.
3) त्यातच तीळ आणि शतावरी कल्प घालून पुन्हा
मिक्सर मधून फिरवून घेणे.
4) परातीत हे मिश्रण घेऊन त्यात
कोको पावडर घालून छान
मळून घेणे.
5) एका ताटाला 1 चमचा तूप
छान लावून घेणे.
6) परातीतील मिश्रण या तूप
लावलेल्या ताटामध्ये पसरून
घेणे.
7) वेगवेगळ्या आकारात
कापणे. माझ्याकडे कटलेट कट
करण्याचे वेगवेगळे शेप्स
होते , ते वापरले आहेत
मी. टेस्टी - हेल्दी चॉकलेट्स
तय्यार !
शतावरी कल्प ऑप्शनल आहे. मी घरी स्वयमसाठी बनवलेला होता. पण तो दुधात घालून पीत नव्हता. म्हणून मी असे डोके चालवले.
कृतीचे क्रमवार फोटो -
कृतीचे क्रमवार फोटो -
1)खजूर, काळे मनुके, शतावरी कल्प, तीळ मिक्सर मधून काढताना
2)परातीत सर्व मिश्रण आणि कोको पावडर एकत्र मळण्यापूर्वी
3)ताटामध्ये थापून वेगवेगळ्या आकारात कापताना
मस्तच
मस्तच
वा! हेल्दी आणि सोपी पाककृती.
वा! हेल्दी आणि सोपी पाककृती. मुले आवडीने खातील. दिवाळीत या मिश्रणाचेच लाडू केले तरी चालतील!
छान.
छान.
धन्यवाद.
धन्यवाद.
किती दिवस टिकतील सामान्य
किती दिवस टिकतील सामान्य तापमनाला?
छान पौष्टीक चॉकलेट्स...
छान पौष्टीक चॉकलेट्स...
थँक्स रुपाली.
थँक्स रुपाली.
नौटंकी, मी बनवलेले 10दिवस झाले. अजून चांगले आहेत.
अच्छा. करून बघते
अच्छा. करून बघते
शतावरी फ्लेव्हर चॉकलेट्स
शतावरी फ्लेव्हर चॉकलेट्स मस्तच दिसत आहेत. साखर नाही टाकायची का?
शतावरी "कल्पात" साखर असते +
शतावरी "कल्पात" साखर असते + खजूर एवढे पुरेसे गोड होईल. पण बहुतेक शतावरी कल्पात सोडीयम बेंझोएट असते. ते टाळण्यास काही करता येईल का नादिशा?
धन्यवाद मानव.
धन्यवाद मानव.
मस्तच.
मस्तच.
पण कोको पावडर न शिजवता चालते का?
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
@किशोर, मानव यांनी बरोबर उत्तर दिले आहे साखरेबद्दल.शतावरी कल्प जरी नाही टाकला, तरी खजूर आणि मनुकांमुळे पुरेसे गोड बनते.
@ मानव, आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेल्या शतावरी कल्प मध्ये सोडियम बेन्झोएट नसते. कल्प बनवताना वापरलेले तूप आणि साखरच प्रेझर्वेटिव्ह म्हणून काम करते. त्यामुळे वेगळे काही वापरण्याची गरज पडत नाही. आपण घरी सुद्धा बनवू शकतो शतावरी कल्प. मी बरेचदा घरीच बनवते.
रसवर्धक गुणामुळे एनर्जी बुस्टर आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी म्हणून शतावरी कल्प लहान मुले आणि वृद्ध लोकांमध्ये चांगला फायदेशीर ठरतो, असा माझा वैद्यकीय व्यवसाय करतानाचा अनुभव आहे. स्वयमला बालदमा असल्याने मी नेहमी वापरते शतावरी. मला चांगले results मिळाले आहेत त्याचे.
@चिन्मयी , मुलांना चॉकोलेट टेस्ट आवडते, म्हणून कोको पावडर वापरली मी. रोज एक /दोन चॉकोलेट खाणार ती, त्यामुळे चालू शकते न शिजवता वापरली तरी.
हेल्दी चॉकलेटपेक्षा हा
हेल्दी चॉकलेटपेक्षा हा अनहेल्दी शतावरी कल्प आहे शतावरी कडू असते म्हणून ती थोड्या साखरेत कल्प करून वापरतात. इतकी साखर म्हणजे ही तर अनहेल्दी शतावरी झाली. उच्च दर्जाचे चॉकलेट मुलांना लहानपणी मिळाले नाही तर पुढे थेरपीची गरज पडते
चांगली पाककृती.
आता माझ्या घरी धूतपापेश्वरचा
आता माझ्या घरी धूतपापेश्वरचा शतावरी कल्प आहे त्यात सोडीयम बेंझोएट आहे.
आधी बैद्यनाथचा होता त्यातही होते.
अच्छा. मी नेहमी घरीच बनवते.
अच्छा. मी शक्यतो घरीच बनवते. ते टिकवण्यासाठी कधी कोणत्या प्रिझर्व्हेटिव्ह ची गरज पडत नाही. पण कंपन्यांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात बनवतात, त्यामुळे वापरत असावेत.
तुम्ही शतावरी कल्प न घालताही चॉकलेट्स बनवू शकता.
छान चोकलेट्स.
छान चोकलेट्स.
मी छोटे गोळे बनवले होते.
खजूर, काजू बदाम पावडर,तुपात परतून लाडू पेक्षा छोट्या आकाराचे गोळे.
छान झाले होते.
थँक्स mrunali.
थँक्स mrunali.
माझी आई तुमच्यासारखे खजुराचे लाडू बनवते. पण तुपावर परतत नाही. ड्रायफ्रूट ची भरड आणि मिक्सर मधून काढलेला खजूर एकत्र मळून लाडू वळते.