लागणारे जिन्नस-
आवळे - अर्धा किलो
तुळस पाने - २० ते २५
शतावरी पाने - ७ ते ८ पाने
खजूर - १० आठ्या ( बिया काढून)
आल्याचा लहान तुकडा
काळ्या मनुका - २५ ते ३०
गुळ - १०० ग्रॅम
मध- ४ चमचे
गाईचे तूप - ३ चमचे
काळीमिरे - ४० ते ५०
लवंगा - २० ते २५
तेजपत्ता - ५ ते ६
दालचिनी - ८ ते १० तुकडे
बडीशेप - दोन चमचे
(मिक्सरला वाटून बारिक पावडर करावी)
सुंठ- दोन तुकडे
जायफळ .-१
हिरवी वेलची - ४
(मिक्सरला वाटून बारिक पावडर करावी)
नमस्कार मंडळी, तर काय रोज - रोज चमचमीत, मसालेदार , गोडधोड पदार्थ खातायं ना? खातायं ना म्हणजे काय रोज खायलाचं पाहीजे पण जिभेचे चोचले पुरवणारी पक्वाने खायची म्हणजे आपली पचनशक्ती उत्तम असायला पाहीजे की नाही? तर आमच्या घरातील सर्वांची पचनशक्ती मजबूत बनविण्यासाठी उपाय म्हणून आमच्या घरच्या वैद्यांनी ( पती) एक आरोग्यदायी उपाय अंमलात आणला आणि घरगुती च्यवनप्राश बनविले.
तसंही तुम्हां सर्वांची पचनशक्ती उत्तम असणारचं याबाबत शंका नाही ती कायम उत्तम राहो पण पचनशक्ती अजून मजबूत बनविण्यासाठी करून बघता का हे आवळ्याचे घरगुती च्यवनप्राश?
च्यवनप्राश बनविण्याची कृती -
१) प्रथम आवळे कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. आवळे थंड झाल्यावर त्यातील बिया काढून आवळ्याचा गर मिक्सरला वाटून तुपाच्या फोडणीवर मंद आचेवर शिजत ठेवावा.
२) तुळस पाने, शतावरी पाने, खजूर, काळ्या मनुका व आल्याचा तुकडा मिक्सरला वाटून आवळ्याच्या मिश्रणात एकजीव करून मिश्रण ढवळत रहावे.
३) वरिल मिश्रण शिजत असतानाच सुंठ, वेलची व जायफळाची चाळून घेतलेली पावडर घालावी तसेच लवंगा, बडीशेप, काळीमिरे, तेजपत्ता, दालचिनीची चाळून घेतलेली पावडर घालावी.
४) त्यानंतर गुळ घालून सगळे मिश्रण मध्यम आचेवर चांगले शिजू द्यावे. मिश्रण शिजत असताना ढवळत राहावे म्हणजे भांड्याला तळाला लागणार नाही.
२० ते २५ मिनिटांनी मिश्रण चांगलेच शिजेल. हे गरम च्यवनप्राश थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवावे. अश्या रितीने तुम्ही घरच्या घरी आवळ्याचे च्यवनप्राश बनवू शकता.
अधिक टिपा-
१) गुळ आणि मधाचे प्रमाण तुम्हाला जशी चव हवी त्यानुसार कमी - जास्त करता येईल.
२) सुंठ, वेलची ,जायफळाची पावडर चाळल्यानंतर उरलेली जाडसर पावडर चहात वापरता येईल.
३) काळीमिरे, लवंगा, तेजपत्ता, दालचिनी, बडीशेप ची पावडर चाळल्यानंतर उरलेली जाडसर पावडर गरम मसाला म्हणून भाजीत वापरता येईल.
आम्ही घरी बनविलेले आवळ्याचे च्यवनप्राश खरचं छान झाले आहे. तर लोकहो , पोटभरून खा, प्या..... च्यवनप्राश खा आणि निरोगी व आनंदी रहा...
छान दिसतेय
छान दिसतेय
शतावरीची पाने कुठे मिळतील?
भारी वाटतय. बनवुन बघाव लागेल.
भारी वाटतय. बनवुन बघाव लागेल.
घरात असलेले झंडु च्यवनप्राश संपले की बनवेन.
धन्यवाद विनिताजी...
धन्यवाद विनिताजी...
आम्ही आमच्या घरामागे लावली आहे शतावरी त्यामुळे ती च्यवनप्राश मध्ये वापरता आली पण बाजारात उपलब्ध असते का ह्याची काही कल्पना नाही.
नक्की बनवा जेम्स बाँड.. खरचं
नक्की बनवा जेम्स बॉन्ड.. खरचं छान बनलं आहे च्यवनप्राश..
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय
रंग पण एकदम परफेक्ट.
सही दिसतेय. एकदम पर्रफेक्ट
सही दिसतेय. एकदम पर्रफेक्ट दुकानवाले. मला आवडते च्यवनप्राश. घरी सुद्धा आहे. पण खायचे लक्षात राहत नाही. हा प्रॉब्लेम बरेच जणांचा असावा
मस्तच! भारीच लागत असेल.
मस्तच! भारीच लागत असेल.
आता ही आयुर्वेदिक पाकृ आहे, तर आयुर्वेदानुसार मध कधीही तापवु नये अन्यथा तो टॉक्झिक होतो असे वाचले आहे. तेव्हा मध शिजलेला च्यवनप्राश गार झाल्यावर टाकुन मिसळणे उचित राहील.
धन्यवाद अनुजी,
धन्यवाद अनुजी,
धन्यवाद ऋन्मेष, मानवजी.
तेव्हा मध शिजलेला च्यवनप्राश गार झाल्यावर टाकुन मिसळणे उचित राहील.>> हो .. हे योग्य होईल.
धन्यवाद... मी आयुर्वेदिक
धन्यवाद... मी आयुर्वेदिक पाकृ वाचलेली त्यात भरपूर घटक घातलेले वाचले होते. ते सगळे घरी मिळणे कठीण. ही शॉर्ट व स्वीट रेसिपी छान आहे.
शॉर्ट अँड सिम्पल रेसिपी
मस्त आहे रेसिपी. सोपी
मीही क्ष वर्षांपूर्वी
मीही क्ष वर्षांपूर्वी च्यवनप्राश केले होते.त्यात पिंपळी आणि काय काय घातले होते.आता आठवतही नाही.ह्या recipe karita धन्यवाद.
शॉर्टकट म्हणता येईल हा
शॉर्टकट म्हणता येईल हा च्यवनप्राश चा रुपाली.
पण साधना, तुमचे बरोबर आहे . आयुर्वेदिक च्यवनप्राश मध्ये बरेच घटकपदार्थ असतात. योगरत्नाकर या ग्रंथात सांगितलेले घटकपदार्थ उदाहरणादाखल सांगते -
काकडशिंगी, भुईआवळा, हिरडा, बेहडा, चिकणामुळ, गुळवेल, भुईकोहळा, कचोरा, हरणदोडी, दशमुळे, चंदन, नागरमोथा, निळे कमळ, वेलदोडे, अडुळसा, मनुका, जीवक, ऋषभक, मेदा, महामेदा, ऋद्धी, वृद्धी, काकोली, क्षीरकाकोली, पोखरमूळ, दालचिनी, तमालपत्र, वेलदोडे, नागकेशर, पिंपळी,आवळे, मध, तूप, साखर, वंशलोचन, पाणी.
धन्यवाद साधनाताई, देवकी, जाई
धन्यवाद साधनाताई, देवकी, जाई ,
नादिशा धन्यवाद ...चांगली माहिती दिलीत. पुढच्या वेळी च्यवनप्राश बनविताना बाकीचे घटक टाकण्याचा प्रयत्न करेन...
प्रवासातील आवळा सुपारी आणि
प्रवासातील आवळा सुपारी आणि लोणचे याशिवाय हे आवळा चवनप्राश सुद्धा माहीत झाले. पाकृसाठी धन्यवाद. नादिशा तुमचेही आभार. काही पदार्थ नावे प्रथमच समजली.
छान आहे. करायला पाहिजे. सगळे
छान आहे. करायला पाहिजे. सगळे नाही मिळाले तरी थोडेफार घटक आयर्वेदीक दुकानात मिळतील कदाचित. माझ्याकडे अडुळसा ही लावला आहे. त्याची ही पाने घेईन. पण हिरवी की पिवळी घ्यावी? काढा करताना मुद्दाम पिवळी घ्यावी असं एका आजींनी सांगितलेलं. आता त्या आजी नाहीत. कोणाला माहीत असेल तर सांगा. नाहीतर दोन्ही निम्मी घेईन.
धन्यवाद किशोरजी...
धन्यवाद किशोरजी...
@ वर्णिता, मी काढा करताना अडुळस्याची हिरवी पाने घेते. पिवळी पाने घ्यायची का ह्याची काही कल्पना नाही. च्यवनप्राश बनविताना लक्षात आलंच नाही की अडळु साची पाने पण टाकायला पाहीजे होती.
रुपाली ,आता पुढच्या वेळी
रुपाली ,आता पुढच्या वेळी पिवळी घे. फ्रेश पिवळी झालेली. मला कारण आता आठवत नाही. पण इथे ही जी लोकं मागायला येतात पानं ते लोक पिवळीच काढून नेतात.
हो.. धन्यवाद वर्णिता...
हो.. धन्यवाद वर्णिता...
फारच सुरेख रेसिपी....
फारच सुरेख रेसिपी.... दिसतेयं पण अगदी पर्फेक्ट.
धन्यवाद अस्मिता...
धन्यवाद अस्मिता...
एकदम मस्त दिसतोय! आजोळी घरी
एकदम मस्त दिसतोय! आजोळी घरी च्यवनप्राश करायचे त्याची आठवण झाली.
वरच्या कृतीत, प्रमाणात गडबड
वरच्या कृतीत, प्रमाणात गडबड वाटतेय... काळंमिरी, लवंगा, वगैरे इतक्या प्रमाणात अशी नाही घालत.
च्यवनप्राश हे वर्धक आणि पाचक पदार्थाचे मिश्रण असते. तामसी घटक( काळंमिरी, लवंगा असे इतके घालत नाहीत , बहुधा नसतातच).
माझे आजोबा, आयुर्वेदिक वैद्य होते, त्यांच्या रेसीपीत असे एकले नाही कधी.
तुमची अशी स्वतः तयार केलेली रेसीपी असेल तर , माझी हि पोस्ट वा प्रतिसाद लागू होत नाही.
गैरसमज नको. पण तरीही, वाटले म्हणून विचारते, कोणी बैद्यानी लिहून दिली आहे का?
नादिशांनी म्हटल्याप्रमाणे, बरेच घटक असतात. त्यांचे घटक ओळखीचे वाटतात.
——-
अवांतरः इतकी मोठी पोस्ट ह्याच कारणासाठी, कारण आयुर्वेदिक घटक हे खुप पॉवरफुल असतात, चुकीच्या मात्रेने घेवून काहीही होवु शकते.
कोरोना काळात, लोकांनी चक्क लवंगा, काळंमीरी, हळद वगैरे वगैरे उकळवून पाणी पिवून , अल्सर, मूळव्याध, कावीळ दुखणी वाढवलीत. हे चांगल्या अर्थाने लिहिलेय. तेव्हा जे काही घ्याल ते जपून.
( टीपःहळद अशी पाण्यात उकळवून आणि पिवून काही फायदा नसतो)...
झंपी मग हळद कशी घ्यावी हे
झंपी मग हळद कशी घ्यावी हे सांगा.
रोज घ्यावी की गरज भासेल तेव्हाच.
आपण वापरतो ना जेवणात तशी
आपण वापरतो ना जेवणात तशी पुरेपुर आहे.
पण जर रोगप्रतिबंधक म्हणून घ्यायची असेल तर, प्रत्येकाने आपली प्रकृती कशी आहे( दोष- वात, पित्त व कफ) त्यानुसार घ्यावी. पित्तकारक प्रवृती असल्याने खाउ नये ज्यास्त. किंवा वैद्याचा सल्ला घ्याव॑.
फोडणीत घालतो ना जेवणात, ती पुरेशी आहे.
नाहितर, ताज्या उकळलेया दूधात चिमटीभर हळद पूड,वेलची पूड( कफविरोधक) कुटून प्यावे( पित्त व कफ ज्यास्त असल्यास असे दूध कधीतरी घ्यावे).
झम्पी, तुमच्याशी सहमत . मी
झम्पी, तुमच्याशी सहमत . मी BAMS डॉ आहे. MUHS ची पहिली batch होती आमची. आमचा अभ्यासक्रम 60% आयुर्वेद + 40% ऍलोपथी असा होता. त्यानंतर रुबी हॉल ला DEMS केले, गेली 17 वर्षे व्यवसाय करते आहे. वाचन पण चालू आहे. त्यामुळे आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन दोन्हीचेही ज्ञान आहे.
प्रत्येक आयुर्वेदिक औषधाचे काही गुणधर्म असतात. योग्य प्रमाणातच वापरावे लागतात. आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतात, असा समज आहे. पण ऍलोपथी प्रमाणे जरी साईड इफेक्ट्स नसले, तरी जर चुकीच्या प्रमाणात, चुकीच्या पद्धतीने काही खाल्ले, तर त्रास होणारच ना !
गैरसमज नको. पण तरीही, वाटले
गैरसमज नको. पण तरीही, वाटले म्हणून विचारते, कोणी बैद्यानी लिहून दिली आहे का?<>> गैरसमज नाही होणार झंपी.. तुम्ही चांगली माहिती दिली आहे. ही कृती इंटरनेट वरून घेतली आहे. आणि बाकीचे घटक जरी जास्त प्रमाणात वाटत असले तरी च्यवनप्राश मध्ये फार काही उग्रपणा जाणवत नाही आणि आम्ही झोपताना फक्त १ लहान चमचा एवढेच घेतो च्यवनप्राश आणि जेव्हापासून घेतोय त्याचा काही त्रास तर जाणवत नाही. चवी मध्ये सुद्धा फार काही उग्रपणा जाणवत नाही .आता हे आमच्या बाबतीत आहे ते प्रत्येकाच्या प्रकृतीला लागू होईल असे नाही. माझ्या बाबांना सुद्धा शेतातल्या काही औषधी वनस्पतींची माहिती होती आणि आम्हां मुलांना ते नेहमीच काढा वैगरे करून द्यायचे जसे की जंत होऊ नये, लघवीला त्रास होऊ नये अजून बरेच पण आता नीट आठवत नाही. मी तरी आजपर्यंत गरोदरपण आणि बाळंतपण या व्यतिरक्त लहानपणा पासून डॉक्टरकडे खूप कमी चकरा मारल्या आहेत.