आजमितीला मध्यमवर्गीय माणसाकडे असलेले विविध गुंतवणुकीचे पर्याय दिवसेंदिवस कमी होत आहेत. FD चे रेट ५ ते ६ टक्क्यात आले आहेत आणि महागाई त्याच्यापेक्षा जास्त पटीने वाढत आहे. FD मध्ये पैसे ठेऊन निवांतपणे व्याजावर दिवस काढणे अतिशय अवघड होता जाणार आहे. विशेषतः शहरात राहणाऱ्या लोकांना त्याची जास्त झळ बसते, बसणार आहे.
मध्यमवर्गीय माणसाकडे इक्विटी सोडून inflation वर मात करण्याचा अजून बहुपरीचित उपाय म्हणजे सोने. सोने या विषयावर माबोवर बरीच चर्चा झालेली आहे. त्यामुळे सध्या तिकडे वळत नाही. माझ्या मते सोने, debt फंड्स आणि इक्विटी मार्केट या मध्ये विभागून गुंतवणूक करणे जास्त सोयीस्कर आहे. मार्केट कंडिशन प्रमाणे तिन्हींचे वेटेज कमी जास्त करत राहायला हवे. ज्याला सोने , इक्विटी, debt यातलया कोणत्या instrument ला कधी आणि किती वेटेज द्यायचे कळले तो यशस्वी गुंतवणूकदार
रिटेल,नोकरदार गुंतवणूकदारांना इक्विटी मध्ये गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड हा पर्याय बराच सोयीचा पडतो. शिवाय म्युच्युअल फंडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात SIP द्वारे दर महिन्याला आपल्याला शक्य असलेली ठराविक रक्कम गुंतवता येते. मार्केट मध्ये हजारो कंपन्या लिस्टेड आहेत. त्यातल्या कोणत्या कंपन्या चांगल्या, कोणाचे शेअर्स घ्यायला हवे, कधी घ्यायला हवे, किती प्रमाणात घ्यायला हवे हे कसे ठरवणार आणि ते बरोबर आहे हे नक्की कसे कळणार? शिवाय आपले नोकरी व्यवसाय सांभाळून आपण हे सगळे कसे मॅनेज करणार या अनेक समस्यांमुळे आपण म्युच्युअल फंड कडे वळतो. पण मागील भागात लिहिल्या प्रमाणे म्युच्युअल फंड हा पर्याय खरेच जाहिरात केला जातो तितका विश्वासार्ह आहे का? मागच्या भागात मी एक दोन ओळीत म्युच्युअल फंड्सच्या रिटर्न विषयी लिहिलं होतं ते अजून थोडेसे विस्तृतपणे लिहितो.
आत्ता मार्केट मध्ये उपलब्ध असलेले एकूण फंड्स १०४५. त्यातले ५७१ हे इक्विटी आणि हायब्रीड फंड्स आहेत. थोडावेळ आपण debt, Gold फंड्स बाजूला ठेऊ कारण ते इक्विटी बेस्ड नसतात, आणि index फंड, ETF पण विचारात घेत नाही कारण ते passively managed असतात.
५७१ इक्विटी आणि हायब्रीड फंड्स पैकी ३११ फंड्स चा १० वर्षांपेक्षा अधिकचा डेटा उपलब्ध आहे, म्हणजे ते १० वर्षांपेक्षा जुने आहेत. त्यातील फक्त १३५ फंड्सने निफ्टी ५० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत. आणि या ३११ फंडस पैकी फक्त ८ फंड्सने गेल्या १० वर्षात Nifty Alpha Low Volatality ३० आणि Nifty २०० momentum ३० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत.*
याच प्रकारे जर ५ वर्षांचा विचार केला तर ४२६ फंड्सचा ५ वर्षांपासून अधिक काळचा डेटा उपलब्ध आहे. या ४२६ फंड्स पैकी फक्त ७३ फंड्स ने Nifty Alpha Low Volatality ३० पेक्षा जास्त आणि फक्त १९ फंड्स ने Nifty २०० momentum ३० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत.*
जर इतके कमी फंड्स Nifty Alpha Low Volatality ३० आणि Nifty २०० momentum ३० या दोन इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न देत असतील तर मग आपण म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करणे कितपत योग्य आहे ?
हे झालं फक्त रिटर्न्सचं, आता मला वाटत असलेले म्युच्युअल फंड मधले बाकी इश्युज....
१. प्रत्येक फंड जेव्हा मार्केट मध्ये येतो तेव्हा त्याची थीम, त्याचे बाकी डिटेल्स प्रकाशित केले जातात, गुंतवणूकदारास उपलब्ध करून दिले जातात. पण त्या प्रकारे ५ ते १० वर्षे गुंतवणूक करून किती रिटर्न मिळाले असते हे कुठेही लिहिलेले नसते. जेव्हा आपण एखाद्या NFO मध्ये पैसे टाकतो तेव्हा बर्याचदा त्या थीमचे पास्ट रिटर्न उपलब्ध नसतात.
२. फंड मॅनेजर कोणता स्टॉक घेणार, का घेणार, कधी घेणार, किती विकणार, कधी विकणार, का विकणार, स्टॉक घ्यायचा आणि विकायचा क्रायटेरिया काय या बद्दल आपल्याला काहीही माहिती नसते.
३. प्रत्येक फंडचा एक्सपेन्स रेशिओ ठरलेला आहे, काही काही फंड्स चा एक्स्पेंस रेशिओ तर २ ते २.७५ टक्के आहे. तो माझे पैसे गुंतवणार, स्वतःचे कमिशन घेणार आणि मग उरलेले रिटर्न मला देणार. माझ्या गुंतवणुकीवर २ ते २.७५ टक्के कमिशन घेऊन काम करणाऱ्या माणसावर माझा काही कंट्रोल नाही. त्याला कामावर ठेवणे किंवा काढणे एवढेच माझ्या हातात आहे. आणि शिवाय मला किती रिटर्न मिळणार हे त्याच्या माहिती, ज्ञान, जजमेंटवर अवलंबून आहे. त्याची काम करण्याची स्टॉक निवडण्याची पद्धत काय आहे आणि किती शास्त्रशुद्ध आहे ते मला माहित नाही.
४. म्युच्युअल फंड्सचे होल्डिंग्स:- कित्येक वेबसाईटवर तुम्हाला मुच्युअल फंडचे होल्डिंग बघायला मिळतील. त्यातील स्टॉक लिस्ट बघितली त्यात अनेक स्टॉक असे आहेत कि ज्याचे वेटेज ०.५%, १% वगैरे असते आणि काही काही म्युच्युअल फंड मध्ये ५०, १०० स्टॉक पण आहेत. ०.५%, १% वेटेज असणारा स्टॉक टोटल रिटर्न वर असा काय परिणाम करतो कि जेणे करून तो त्या फंड मध्ये आहे? क्वॅलिटी ऑफ स्टॉक विषयी मी फार प्रभुत्वाने बोलू शकणार नाही, पण तो मुद्दा सुद्धा विचारात घ्यायला हवा.
५.खरेदी विक्री वरील बंधने.:- तुम्ही केलेल्या SIP चे पैसे ज्या दिवशी फंड हाऊस कडे जातील त्या दिवशीची NAV तुम्हाला मिळणार. शिवाय फंड मध्ये गुंतवलेले पैसे काढणे वेळखाऊ काम आहे. शिवाय तुम्ही पैसे कधी काढत आहात त्यावर exit लोड पण विचारात घ्यावा लागतो.
आपण जर नीट विचार केला तर वरील सगळे प्रॉब्लेम इंडेक्स फंड किंवा ETF मध्ये गुंतवणूक केल्याने सुटतात
१. Nifty Alpha Low Volatility ३० आणि Nifty २०० momentum ३० या दोन इंडेक्स चे रिटर्न कित्येक फंड्स पेक्षा जास्त आहेत ते मी वर लिहिले आहेच. या दोन इंडेक्स मध्ये कोणता स्टॉक येणार, त्याचा क्रायटेरिआ काय, त्याचे वेटेज कसे ठरणार, कोणता स्टॉक जाणार, कधी जाणार, त्याचा क्रायटेरिआ काय हे सगळे निफ्टी च्या वेबसाईट वर स्वच्छ लिहिलेले आहे. उगीच कोणाच्या तरी विचारक्षमतेवर अवलंबून स्टॉक ची खरेदी विक्री होत नाही. स्टॉकची एंट्री, एक्झिट, वेटेज याची पद्धत objective, well defined आहे.
या दोन्ही इंडेक्स चे गेल्या १५ वर्षांचे रिटर्न ( बहुदा back calculate करून) निफ्टी ने त्यांच्या वेबसाईट वर दिले आहेत.
२. कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले इंडेक्स फंड मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. आपण ज्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवणार हे माहित असल्यास त्यातील कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले फंड निवडून त्यात गुंतवणूक करता येते. फंड हाऊस, फंड मॅनेजर कोणतेही असले तरी फरक पडत नाही कारण शेवटी त्यांना इंडेक्स मध्ये जे स्टॉक ज्या प्रमाणात आहेत तेच त्या प्रमाणातच घ्यावे लागणार.
३. Nifty Alpha Low Volatility ३० आणि Nifty २०० momentum ३० मध्ये जास्तीत जास्त ३० स्टॉक असणार आहेत.
४. आपण ज्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवणार आहोत तो जर ETF स्वरूपात उपलब्ध असेल तर आपण तो आपल्या सोयी प्रमाणे हवा तेव्हा विकू शकतो, विकत घेऊ शकतो. मी ज्या दिवशी तो विकला त्याच्या T+२ ला त्याचे पैसे माझ्या खात्यात जमा होतील.
शिवाय जर व्हॉल्यूम चांगला असेल तर ट्रेड, स्विंग ट्रेड करून, फ्री युनिट्स गोळा करणे, आपल्याकडे असलेल्या युनिट्सची सरासरी किंमत कमी करणे हे सर्व पण करता येऊ शकते.
मार्केट महाग असल्यावर युनिट्स विकून टाकणे आणि मार्केट ५ ते १० टक्के पडले कि तेच परत घेणे हे पण पर्याय उपलब्ध आहेत. खरेदीचे टायमिंग साधून, ट्रेड करून आपल्याकडील युनिट्सची सरासरी किंमत कमी करणे या विषयी पुढील एखाद्या भागात विस्तृतपणे लिहितो.
लेख अजून लांबू नये म्हणून मला म्युच्युअल फंड गुंतवणुकीमधल्या न पटलेल्या अजून काही गोष्टी टाळत आहे. मी आजकाल कोणताही गुंतवणुकीचा पर्यात समोर आला कि खालील प्रश्न विचारतो, विशेषतः जर म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड कोणतेही प्रोडक्ट जर विचारात घ्यायचे असेल तर. तुम्ही जर फंड मध्ये गुंतवणूक करणार असाल करत असाल तर खालील प्रश्न स्वतःला/ गुंतवणूक सल्लागाराला, म्युच्युअल फंड विक्रेत्याला नक्की विचारा.
१. फंड कोणते स्टॉक घेणार, काय प्रमाणात घेणार, त्याचा क्रायटेरिया काय? फंड पोर्टफोलिओ रिबॅलेन्स करण्याची फ्रिक्वेन्सी, पद्धत काय असणार आहे?
२. ज्या पद्धतीचे, पद्धतीने स्टॉक सिलेक्शन होणार आहेत त्यावर आधी काही डेटा उपलब्ध आहे का? तसे केल्यास किती रिटर्न येतात? ते Nifty Alpha Low Volatility ३० आणि Nifty २०० momentum ३० पेक्षा जास्त आहेत का?
३. फंडाचा एक्सपेन्स रेशिओ, एक्झिट लोड किती आहे. तुम्हाला जर म्युच्युअल फंडचे युनिट्स रीडिम करायचे असतील तर प्रोसेस काय आहे त्याला किती दिवस लागतात.?
४. फंड मॅनेजर कोण आहे? फंड हाऊसचे रेप्युटेशन कसे आहे? फंड मॅनेजर आणि फंड हाऊसने आधी मॅनेज केलेल्या फंड्स चे रिटर्न आणि turnover ratio काय आहे?
५. पोर्टफोलिओ मधील स्टॉकचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त वेटेज काय असणार आहे?
६. Setoral, market cap allocation किती आणि कसे केले जाणार आहे?
७. बेंचमार्क इंडेक्स कोणती आहे?
म्युच्युअल फंड घेताना तुम्ही कष्ट करून कमावलेले पैसे तुम्ही कमिशन देऊन एका माणसाला मॅनेज करायला देत आहात. ज्या पैशांवर आपले/आपल्या मुलांचे फ्युचर, निवृत्तीनंतरचे उत्पन्न अवलंबून आहे ते पैसे कोणाच्याही सांगण्यावरून चुकीच्या ठिकाणी गुंतवू नका. स्वतःचा गृहपाठ करून डोळसपणे गुंतवणूक करा.
* सर्व रिटर्न १ oct २०२० च्या बंद भावानुसार calculate केले आहेत.
माहितीचा स्रोत:-
https://www.niftyindices.com
www,rupeevest.com
Disclaimer:-
मी सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार नाही. माझ्याकडे शेअर मार्केट, आर्थिक गुंतवणुकीसंबंधित काहीही पात्रता नाही. वर लिहिलेली सर्व माहिती एक शेअर मार्केटचा अभ्यास या दृष्टीने केलेली आहेत. वर लिहिलेल्या सर्व कॅल्क्युलेशन मध्ये चूक, human error असू शकतो. वरील लिखाणावर विसंबून कोणीही गुंतवणूक करू नये. केल्यास, लेखक जबाबदार नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
मोतिलाल ओसवाल फंड हाउसने
मोतिलाल ओसवाल फंड हाउसने Nifty 200 Momentum 30 वर लॅांच केलेला ETF आज लिस्ट झाला आहे.
Ticker:- MOMOTENTUM
लेखात लिहिलेल्या महत्वाच्या ईंडेक्सवर आता गुंतवणूकीसाठी पर्याय उपलब्ध आहेत.
Nifty Alpha Low Volatility 30:-
ETF:- ICICIALPLV,
ज्यांना etf मधे गुंतवणूक करायची नसेल त्यांना यावर आधारीत FoF चा पर्याय उपलब्ध आहे.
Nifty 200 momentum 30:-
Index fund:- UTI Nifty 200 momentum 30
ETF:- MOMOMENTUM
Nifty Alpha 50:-
ETF:- KOTAKALPHA
या तीन ईंडेक्सचे बॅकडेटेड रिटर्न चांगले आहेत. हे पर्याय दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी, SIP करण्यासाठी चांगले आहेत.
nippon-india-nifty-alpha-low
nippon-india-nifty-alpha-low-volatility-30-index-fun
याचं ड्राफ्ट नोटिफिकेशन सेबीच्या साइटवर दिसतंय. पण फंड लाँच झाला का?
मी वरच्या दोन्हीचे रिटर्न्स व्हॅल्यु रिसर्च ऑनलाइनवर पाहिले. रँक , बेंचमार्कच्या तुलनेत रिटर्न्स खूप इम्प्रेसिव्ह नाही वाटले.
निप्पॉनचा फंड अजून आलेला नाही
निप्पॉनचा फंड अजून आलेला नाही.
Nifty Alpha Low Volatility 30 वर ICICIALPLV हा ETF आणि त्यावरील FOF उपलब्ध आहेत.
ETF मधे liquidity चा, FOF मधे ट्रॅकिंग एरर, एक्स्पेन्स रेशिओचा प्रॉब्लेम आहे.
मी सुद्धा या ईंडेक्सवरील चांगल्या फंडच्या प्रतिक्षेत आहे.
मी वरच्या दोन्हीचे रिटर्न्स व्हॅल्यु रिसर्च ऑनलाइनवर पाहिले. रँक , बेंचमार्कच्या तुलनेत रिटर्न्स खूप इम्प्रेसिव्ह नाही वाटले.>>>>
व्हॅल्यू रिसर्चवर त्याची बेंचमार्क ईंडेक्स वेगळी दिली आहे.
ICICI च्या फॅक्ट्शीट मधे खालील प्रमाणे रिटर्न्स दिले आहेत.
मला इईटीएफ चालेल. पण एकदा
मला इईटीएफ चालेल. पण एकदा वेगवेगळ्या फेजेसमधले रिटर्न्स बघतो.
बरं.
बरं.
पण हा ETF ऑगस्ट २०२० मधील असल्याने तुम्हाला सर्व प्रकारे विश्लेषण कदाचित करता येणार नाही. ईंडेक्सचा डेटा हवा असेल तर https://niftyindices.com/reports/historical-data वर मिळेल.
निपोन इंडिया निफ्टी अल्फा लो
निपोन इंडिया निफ्टी अल्फा लो वोलॅटिलिटी ३० इंडेक्स फंड नुकताच लॉन्च झाला आहे. यावर कोणी अभ्यास केला असल्यास शेअर करावा.
मी ट्रॅक करतोय.
मी ट्रॅक करतोय.
मी आत्ता पर्यंत ICICIALPLV आणि त्यावर असलेल्या FOF मधे गुंतवणूक करत होतो.
आत्ता निप्पॉन च्या फंड मधे गुंतवणूक करणार आहे. पुढे फंडच्या expense ratio, tracking error वर कोणत्या फंड मधे गुंतवणूक चालू ठेवायची/ वाढवायची हे ठरवणार
रच्याकने,
रच्याकने,
कोणी Nifty 200 momentum 30 वरचे फंड ट्रॅक करतेय का?
३ आहेत ( UTI, Motilal Oswal, ICICI), आता IDFC ने पण लाँच केलाय. NFO आली आहे.
अतरंगी, इंडेक्स फंड विकत
अतरंगी, इंडेक्स फंड विकत घेण्यासाठी नुसतेच एक्सेंप्स रेशीओ न बघता कमीत कमी ट्रेकींग एररही एक परीणाम असले पाहिजे.
कुठलीही गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे उद्देश आणि गुंतवणूक करणार्याचे वय हेदेखील महत्वाचे निकष आहेत
Pages