- १/२ किलो कोळंबी (सोललेली आणि मधला धागा काढलेली)
- 1 टीस्पून. हळद
- 2 टीस्पून. तिखट
- 1 टेस्पून. आलं लसूण पेस्ट
- 100-150 मिली मोहरी तेल
- 1 टेस्पून. मोहरी
- २ टीस्पून. हिंग
- पाऊण कप लसणीचे मध्यम आकाराचे तुकडे
- अर्धा कप आल्याचे मध्यम आकाराचे तुकडे
- 3 टेस्पून. लोणचं मसाला
- चवीनुसार मीठ
- लिंबाचा रस किंवा व्हाईट व्हिनेगर चवीनुसार
आज जवळ जवळ ५ वर्षाने मायबोलीवर पाकृ लिहिताना बरं वाटतंय.. इतका ब्रेक का घेतला, माझं मलाच माहित नाही.. असो..
चला सुरु करू.. कोळंबीला हळद, मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट लावून किमान अर्धा तास मुरवत ठेवा. मोहरीचं तेल तापवून त्यात मुरलेली कोळंबी माध्यम आचेवर तळून घ्या. कोळंबी थोडी डार्क ब्राउन तळावीत, जेणेकरून कोळंबी क्रिस्पी होतील आणि लोणचं टिकाऊ होईल.
तळणीच्या राहिलेल्या तेलात मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्या.
आता थोडा ब्रेक.. पुढचं काम तळलेली कोळंबी आणि फोडणी पूर्ण थंड झाली की....
एका भांड्यात तळलेली कोळंबी, आल्या-लसणाचे तुकडे, तिखट, मीठ आणि लोणचं मसाला प्रेमाने एकजीव करा. थोडक्यात कोळंबीला मसाजच करा.. आता त्यावर फोडणीचे तेल, मोहरी घालून, मस्त लिंबू पिळा. लोणचं एकजीव करून काचेच्या सुक्या जार/बरणीत काढून घ्या..
पोळी, भाकरी किंवा डाळ-भात, सोलकडी-भातासोबत लोणचं म्हणजे स्वर्गसुख.. हे लोणचं किती दिवस टिकू शकेल नाही माहित, कारण आमच्याकडे आठवड्यात बरणी रिकामी झाली.. हां, दिलेल्या जिन्नसांत फोटो मधील दोन बरण्या भरतील इतकं झालं लोणचं..
या लॉकडाऊनच्या काळात आणि खासकरून मागील एक महिन्यात विडिओग्राफी वर काम चालू केलं.. त्यामुळे यावेळी फोटोसोबत पाकृ चा विडिओ बनवायचा प्रयत्न केलाय. पहिलाच प्रयत्न आहे.. तो प्रयत्न इथे चिकटवतोय.. काही सूचना असतील तर त्यांचं मनापासून स्वागत..
- शक्यतो लहान कोळंबी घ्यावीत, चवीला जास्त चांगली लागतात
- आम्ही इथे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला वापरलाय
भारी दिसतेय प्रकरण .
भारी दिसतेय प्रकरण .
भारी एकदम... कित्ती मस्त लागत
भारी एकदम... कित्ती मस्त लागत असेल याची कल्पना करू शकते.
1 आठवडा म्हणजे खूप झाले... एवढा कंट्रोल कोण करेल..
कोळंबी खात नाही पण तुमच्या
कोळंबी खात नाही पण तुमच्या रेसिपीवर फोटो कातिल असणार म्हणून आले. तोंपासू फोटो आहे.
मी शाकाहारी आहे, पाकृ कशी ते
मी शाकाहारी आहे, पाकृ कशी ते सांगता येणार नाही
Video वर comment देऊन आले
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
हायला, डीडी बर्याच दिवसांनी
हायला, डीडी बर्याच दिवसांनी ! वेलकम !
मी पण शाकाल. पण नवर्याला दाखवता येईल.
Wow.. मस्त रेसिपी.. विडिओ पण
Wow.. मस्त रेसिपी.. विडिओ पण छानचं बनवलाय..
हाहा.. हो, रश्मी, बर्याच
हाहा.. हो, रश्मी, बर्याच वर्षांनी rather. नक्की दाखवा रेसिपी.. आवडेल नक्कीच,..
आभार ShitalKrishna, खुप
आभार ShitalKrishna, खुप धन्यावाद.. आपल्या प्रतिक्रियेमुळे हुरूप वाढला
डीडी मस्त रेसिपी, नक्कीच करून
डीडी मस्त रेसिपी, नक्कीच करून बघणार. फोटो एकदम टेम्पटिंग.
रेसिपी आणि फोटो खासच.
रेसिपी आणि फोटो खासच.
आता कोलंबी फार खाता येत नाही पण नवरा (आणि मुलं) आवडीने खातात. त्यांच्यावर प्रयोग करुन पाहिन
फार्फार वर्स्।आंनी लिहिल्याबद्द्ल आभार्स
कोळंबीचे लोणचे मस्तच दिसतेय..
कोळंबीचे लोणचं मस्तच दिसतेय..
नक्की घालून बघेन मी कोळंबीचे लोणचं..
पाकृ आणि फोटो आवडल्याबद्दल
पाकृ आणि फोटो आवडल्याबद्दल आभार सामी, वेका आणि रूपाली..
नक्की करून बघा आणि कळवा कसं झालं ते..
अप्रतिम होणारच
मस्तच ...
मस्तच ...
मी पण नुकतेच, परवा रविवारी केले आहे ...
व्हिडिओ सुद्धा पाहिला. तो ही.
व्हिडिओ सुद्धा पाहिला. तो ही. छान तोपासू आहे..
वा, मस्तच ...
वा, मस्तच ...