साहित्य:
१/२ किलो चिकन ( बोनलेस )
१ कप दही - पानी कढलेले
१ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा मिरपूड
१/२ चमचा गरम मसाला पावडर
१/२ कप काजू आणि बदाम पेस्ट - काजू , बदाम भिजावुन ठेवा आणि साल कढुन पेस्ट करा.
2 चमचे फ्रेश मलई
मीठ - चवी प्रमाने
१/२ चमचा लिंबाचा रस
१/२ ग्रीन/रेड कॅप्सिकम
१ कांदा
१ चमचा तेल
१ चमचा लोणी
चिकन रेश्मी कबाब - पाककृती
प्रथम आपले बोनलेस चिकनचे लहान चौकोनी तुकडे करा.
त्यात दही, लसूण पेस्ट, आले पेस्ट, मिरपूड, गरम मसाला पावडर घाला.
आता काजू आणि बदाम पेस्ट, मलई घाला.
नंतर मीठ, लिंबाचा रस घाला.
चिकन मिसळा आणि १ तास मॅरीनेट करा.
मॅरीनेट झाल्या नंतर स्कीवर्स मधे चिकन, कांदा, कॅप्सिकम अंतर राखून घाला.
शिजवण्यासाथी पद्धत:
१. पॅन पद्धत:
आता ग्रील पॅन गरम करा, पॅनमध्ये तेल आणि बटर घाला.
चिकन कबाब पॅनमध्ये ठेवा, त्यांना वेळोवेळी व्यवस्थित फिरवा. त्यांना सर्व बाजूंनी समान भाजा/शिजवा
२.ओटीजी पद्धत:
२00 डिग्री वर १0 मिनिटे गरम करा
ओटीजी मधे १५ मिनिटे कबाब ठेवा
१५ मिनिटांनंतर थोडे लोणी लावा, फिरवा आणि पुन्हा १0 मिनिटे ठेवा (ते शिजले आहे की नाही याची काही वेळानंतर तपासणी करा )
पुन्हा थोडे लोणी लावा... ( दोन वेळा मस्का लावल्यावर चिकन चागलेच लागनार )
आता आपले चिकन कबाब सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
सर्व्ह करन्या आधि फोटो कादुन माबो वर टाकावे
मस्तच रेसिपी..आणि सोपी..
मस्तच रेसिपी..आणि सोपी..
येत्या रविवारी नक्की चिकन रेशमी कबाब
या रविवारी चिकन असेल तर नक्की
या रविवारी चिकन असेल तर नक्की करणार.
माझ्यासाठी पनीर घेणार.
मस्त!
मस्त!
धन्यवाद mrunali, देवकी ,
धन्यवाद mrunali, देवकी , मानव !!