Submitted by BLACKCAT on 22 September, 2020 - 01:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
1 अननस बारीक चिरून
तिखट , मीठ
कांदा कापून
फोडणी साठी तेल , मोहरी , जिरे , हिंग , आले किस, सुक्या मिरच्या 4 , कढीपत्ता
अर्धी वाटी गूळ
क्रमवार पाककृती:
अननस बारीक चिरून थोडेसे पाणी , मीठ व भरपूर लाल तिखट घालून कुकरच्या भांड्यात ठेवून कुकर मधून शिजवून घ्यावे
शिजल्यानंतर फोडी एका ताटात गार करून घ्यावे , पाणी बाजूला काढून ठेवावे , फेकू नये , मग मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावे .
मग फोडणी करावी - तेल , मोहरी , जिरे , हिंग , कढीपत्ता , मिरच्या , आल्याचा किस व कांदा वापरून
त्यात अननस गर घालावा , थोडे शिजवावे , मग उरलेले पाणी व गूळ घालून दाट शिजवावे , गूळ कमीजास्त वापरून चव बदलता येते
वाढणी/प्रमाण:
2
अधिक टिपा:
यु ट्यूब
माहितीचा स्रोत:
यू ट्यूब
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Wow. मस्त.
Wow. मस्त.
खोबरे , नारळ दूध वापरले नाही
खोबरे , नारळ दूध वापरले नाही , मी जी युट्युब पाहिली , त्यातही नव्हते
पण 2,3 चमचे ओला नारळ किंवा नारळ दूध वापरले तर अजून एक फ्लेवर मिळेल
मी केलेच तर तेलात मोहरी
मी केलेच तर तेलात मोहरी,कढीलिंब n घालता मोहरी भाजून ती थोड्या khobaryabarobar वाटून घालेन.पावसामुळे सद्या बाहेर जायला कंटाळा येतो य.
वा वा... जेवणाची मस्त लज्जत
वा वा... जेवणाची मस्त लज्जत वाढवेल अशी ही करी दिसते. नक्की करुन बघेन.
मिक्सरमधून नकाढताही छान लागेल
मिक्सरमधून नकाढताही छान लागेल...
मस्त, आंबटगोड, चटपटीत लागेल.
मस्त, आंबटगोड, चटपटीत लागेल.
छान रेसिपी.
छान रेसिपी.
छान दिसतेयं करी...
छान दिसतेयं करी...
खूप छान नवीन रेसिपी , can चे
खूप छान नवीन रेसिपी , can चे अननस आहे करून बघणार.
खिचडी सोबत चिंच गूळाच्या सारा ऐवजी छान लागेल असं वाटतयं.