*एक प्रश्न*
काही पौराणिक, मध्ययुगीन चित्रपट तथा धारावाहिक यात दिवसाचे व रात्रीचे प्रहर मोजण्याची एक पद्धत पाहिली. ज्यात एक मोठे घंघाळे पाण्याने काही उंचीपर्यंत भरलेले होते आणि त्यावर एक पाण्याचा तांब्या ठेवलेला. हा तांब्या पाण्यात बुडाला म्हणजे एक प्रहर सम्पला. मग तोच तांब्या पुन्हा तसाच पाण्याच्या पृष्ठभागावर उभा तरंगत ठेवला गेला. पुन्हा पुढचा प्रहर सुरू.
मला अनेक प्रश्न पडले.
१. घंघाळे आणि तांब्या याकरता कोणता विशेष धातू वापरला जात होता का?
2. ही भांडी कोणत्या एक विशिष्ट उंचीवर आणि विशिष्ट दिशेला ठेवली जात होती का
3. यात आर्किमिडीज च्या तत्वाचा उपयोग होत होता का?
4. या प्रक्रियेतुन मोजण्यात येणारी वेळ आणि प्रहर मोजण्याची पद्धत हो उत्तरायण आणि दक्षिणायन यात बदलत असेल का?
5. आपले पूर्वज शास्त्रीय संशोधनात अग्रेसर होतेच.
6. प्रहर कसे धरतात?
7. तेव्हा तास, मिनिटे, सेकंद हे कालमापनाचे कल्पित मार्ग होते का?
यावर जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.
नवीन माहिती उजेडात येण्यास मदत होईल.
धन्यवाद