ज्वारीच्या भाकरीचा गोपाळकाला

Submitted by pltambe@yahoo.co.in on 14 September, 2020 - 04:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आदल्या रात्री चार भाकरी ,दोन वाट्या ताक किंवा एक वाटी दही ,एक चमचा मीठ आणि तीन चार चमचे साखर ,एक चमचा आंब्याचं लोणचं ,चार मोथे चमचे तेल, जिरं आणि एक दीड चमचा हिंग , चविनुसार मिठ , बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

एका पसरट भांड्यात भाकरीची भरड काढून त्यात दोन वाट्या ताक किंवा एक वाटी दही एक वाटी पाणी घालून, थोडं घुसळून यात घालावं. एक वाटी दूध घालावं.
एक चमचा मीठ आणि तीन चार चमचे साखर घालावी.
हे प्रमाण ताक किंवा दही किती आंबट आहे त्यावर अवलंबून आहे. टेस्ट करून पहावं.
यात एक चमचा आंब्याचं लोणचं घालावं.
छोट्या फोडणीच्या भांड्यात चार मोठे चमचे तेल गरम करून त्यात भरपूर जिरं आणि एक दीड चमचा हिंग घालून फोडणी करावी. गॅस बंद करून फोडणीत तीन चमचे मिरचीचे लोणचे घालावे. मस्त घमघमाट सुटतो. मिरची तळली गेली की ही फोडणी भाकरीच्या काल्यावर पसरावी आणि परत सगळं एकजीव करून घ्यावे. कढीपत्ता आवडत असेल तर घालावा, आणखी सुंदर चव येते.
दहा मिनिटे झाकून ठेवावे.
तोपर्यंत काला फुगला तर गरजेनुसार परत थोडे ताक आणि दूध घालून सारखं करून घ्यावे.
शेवटी खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून , हा काला सर्व्ह करावा.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

-

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोडणी , लोणचे ऑप्शनल आहे

नुसते दही ताक मीठ आणि थोडेसे तिखट इतकेही पुरते , बेसिक टेस्ट हीच आहे

Pages