गोळे अन मोदक पारीचे साहित्य -
२ वाटी चणाडाळीचे पीठ,
मीठ,
तेल,
हळद,
लाल तिखट
सारणासाठी अन रस्स्या साठी लागणारे साहित्य -
अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं,
दीड वाटी किसलेले ओले खोबरे,
एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे, .
४चमचे पांढरे तीळ,
२चमचे खसखस,
१०-१२ पाकळ्या लसूण,
मीठ,
कोथिंबीर,
कडीपत्त्ता,
हिरवी मिरची - ५
दोन मध्यम आकारचे चिरलेला कांदा,
एक छोटा टोमॅटो,
तेल,
हळद
मिठ
२ ते ३ मोठे चमचे लाल तिखट (आम्ही साधे तिखट वापरत नाही कोल्हापुरी पद्धतीने घरी केलेले असते, सो तुम्ही एक चमचा साधे तिखट अन २ चमचे कांदा लसुण मसाला किंवा कोणताही दुसरा मसाला वापरु शकता) ,
प्रथम पारीसाठीचे साहित्य एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावं मग ते झाकुन ठेवावे किमान १५ मिनिटे.
आता सारण अन रस्स्यासाठीची तयारी करुन घ्यायची.
१ - मिरची, आले, लसुण, कडीपत्ता, कोथींबर देठ थोड्याश्या तेलावर परतुन घेवुन मिक्सरला वाटुन घेतले.
२ - तिळ, खसखस थोडेसे मंद आचेवर परतुन वाटुन घेतले
३ - ओले अन सुके खोबरे भाजुन वाटुन घेतले.
४ - शेंगदाण्याचा जाडसर बारिक कुट करुन घेतला
५ - कांदा तेलावर खरपुस भाजुन घेतला, त्यातच चिरलेला टोमॅटो पण परतला अन वाटुन घेतला.
हि सगळी वाटणे वेगवेगळीच ठेवायची एकत्र करायची नाही.
सारणासाठी -
कढईत थोडे तेल गरम करुन घ्यावे, त्यात वरची अर्धी मिरची आले पेस्ट , अर्धी तिळ खसखस पेस्ट, शेंगदाणे कुट, अर्धी खोबरे पेस्ट घालुन परतायचे. त्यात चविनुसार तिखट , हळद अन मिठ घालायचे.
आता सारण तयार झालेय, ते निट एकजिव करायचे, ते झाले की पारीचे पिठ परत हलक्या हाताने मळुन त्याचे छोटे गोळे करायचे. त्या गोळ्याच्या पारी करुन त्यात सारण भरुन गोल्/चपटे गोळे करा किंवा मोदक करा.
रस्सा -
एकीकडे रस्सा जेवढा करायचा आहे तितके पाणी ऊकळुन घ्यायचे. दुसरीकडे एका कढईत सढळ हाताने तेल घालायचे, तेल गरम झाले की मंद आचेवर अर्धी ऊरलेली आले मिरची पेस्ट घालुन परतायची, मग त्यात तिखट (आम्ही घरी केलेला कोल्हापुरी तिखट मसाला वापरतो, तो नसेल तर दुसरा कुठलाही चालेल), हळद घालुन परतायचे, नंतर त्यात कांदा-टोमॅटो पेस्ट घालुन तेल सुटे पर्यंत परतायचे. तेल सुटले कि ऊरलेले सगळे मसाले - तिळ-खसखस, दाण्याचे कुट, खोबरे पेस्ट घालुन निट परतुन घ्यायची. सगळे निट तेलात परतले की त्यात गरम पाणी घालुन ऊकळी येऊ द्यायची. ऊकळी आली की तयार गोळे / मोदक, मिठ घालुन मध्यम आचेवर झाकुन १० ते १५ मिनिटे वाफ द्यायची. अगदी शेवटाला गॅस बंद करताना वरुन बारिक चिरलेली कोथींबीर पेरायची.
झाले
१ - शेंगदाण्याचा कुट एकदम बारिक करायचा नाही
२ - पाणी गरमच घालायचे नाहीतर तर्री येत नाही
३ - यात चवीसाठी हिरवी मिरची अन लाल तिखट दोन्ही घालायचे आहे.
४ - मिरची अन मीठ, पारी, सारणात सुद्धा असते, तेव्हा,ते लक्षात ठेवूनच अंदाजे तिखट मीठ रस्स्यात घालायचे नाहीतर खारट किंवा जास्तच तिखट होऊ शकते.
५ - उत्तम चवीसाठी तेल अन तिखट बिलकुल कंजूशी न करता घालायचे.
भारी पाकृ आहे, आणि बरीच मेहनत
भारी पाकृ आहे, आणि बरीच मेहनत आहे. गोळे तळायचे नाही हे पण छान.
फोटो एकदम मस्त.
आणि तुमच्या कोल्हापुरी तिखटाचीही पाकृ इथे अथवा मोठी असल्यास वेगळी लिहा ना. (हे मी तुम्हाला आधी कधी विचारलेय असे मला वाटतेय, खरंच विचारलं की देजावू आहे कळत नाही.)
फोटो जबरदस्त ! इतकं
फोटो जबरदस्त ! इतकं टेम्पटिंग ताट आहे.
मायनस दाण्याचं कुट, ही डिश अतिशय आवडेल.
VB तुमच्या रस्सा भाज्या मस्त
VB तुमच्या रस्सा भाज्या मस्त झणझणीत, चमचमीत असतात.तोंपासु.
पुण्यात असताना माझी एक मैत्रीण होती सांगली ची, तिच्याही अशाच घरच्या मसाल्याचा तर्रीवाल्या भाज्या असायच्या.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/28513
मोदकाची आमटी
मस्त रेसिपी .. लवकरच करून
मस्त रेसिपी .. लवकरच करून बघणार.
मोदकाची आमटी
नवीन Submitted by BLACKCAT on 6 September, 2020 - 08:49 >> हि रेसिपी दिसत नाहीए
मस्त फोटो आणि रेसिपी!
मस्त फोटो आणि रेसिपी!
भांडण होऊन लेखकाने सगळे डिलीट
भांडण होऊन लेखकाने सगळे डिलीट केले
म्हणूनच मला पण नाही दिसली
म्हणूनच मला पण नाही दिसली रेसिपी.
भारी मस्तच. भाकरीही फार
भारी मस्तच. भाकरीही फार सुरेख आहे.
तोंपासू! भाकरी ही तर तुझी
तोंपासू! भाकरी ही तर तुझी स्पेशालिटी .... पांढरीशुभ्र!
मस्त आहे हा पदार्थ.एखाद्या
मस्त आहे हा पदार्थ.एखाद्या पावसाळी संध्याकाळी खायला छान वाटेल.
कोल्हापुरी तिखटाचीही पाकृ >>
कोल्हापुरी तिखटाचीही पाकृ >> तो एक सरंजामी प्रकार आहे.... त्याला साहित्य आणल्यापासुन बनेपर्यंत पेशन्स ने ३ दिवस काम करावे लागते अन सगळा मसाला व्यवस्थीत बरण्यांमधे भरुन ठेवावा लागतो तेव्हा तो वर्षभर टिकतो. कोल्हापुरी/सातारी काळा मसाला/चटणी/तिखट हे फार निगुतीने करुन्/करवून घ्यावे लागते तेव्हा ते वर्षभर टिकते. साहित्यातील एक जरी वस्तु चुकुन कमी जास्त झाली तरी वर्षभर मनाला चुटपुट लागुन रहाते.
@ मानव, तुमचे कोणी पाहुणे/घट्ट् मैत्रीचे संबध असणार्या कोल्हापुरी फॅमिलीकडुन तो मसाला मिळवा.. तुम्ही पुणे-मुंबई मधे रहाणारे असाल तर तुम्हाला साहित्य मिळाले तरी ते कडक उन्हात वाळवण्यासाठी जागा मिळणे, मिरच्या निवडण्यासाठी अन देठे मोडण्याल्यावर हातची जी आगाग होते ते सोसण्याची सहनशक्ती असणे, मिरच्या भाजल्यावर जो ठसका उठतो तो सहन करण्याची शक्ती असलेले कुटुंब अथवा शेजार असणे, आणि मुख्य म्हणजे भरमसाठ कांदा चांगला तळुन त्यासहीत सर्व मसाले कुटुन देणारा डंगवाला भेटणे तरी दुरापास्त असेल.
घरगुती मसाला अन मार्केट मधे मिळाणार्या पॅकबंद मसाल्यात बराच फरक पडतो. पॅकबंद मसाल्यात मीठाचे प्रमाण जास्त असते शिवाय तो टिकावा म्हणुन अजुन काही प्रिझरवेटिव टाकले जात असल्यास माहिती नाही.
मस्त रेसिपी आणि फोटो.
मस्त रेसिपी आणि फोटो.
२-३-४ ही वाटणं एकत्र वाटली किंवा केली तर काय बिघडेल?
सर्वप्रथम म्हणजे ही रेसिपी
सर्वप्रथम म्हणजे ही रेसिपी माझी नाही, माझ्या मम्मीची आहे. तिने काल केली होती.
<<<म्हाळसा यांचा मोदक रस्सा धागा बघितल्यापासून इच्छा होती तसे मम्मी ला बोलून दाखवले होते अन आज तिने सरप्राईज दिले. सारण अन मसाल्यात खूप फरक आहे पण त्यांच्या अन मम्मीच्या.
कधितरी म्हाळसा पद्धतीने पण करायचे आहे>>> हा माझा खाऊगल्ली वरचा प्रतिसाद, देवकीताई बोलल्या अन मलाही वाटले म्हणुन मी हा धागा काढला.
मानवकाका, थांकु
मानवकाका, थांकु
<<<तुमच्या कोल्हापुरी तिखटाचीही पाकृ इथे अथवा मोठी असल्यास वेगळी लिहा ना.>>> नक्की लिहीन, मोस्टली पुढच्या रविवारी वेगळा धागा काढुन.
मीरा... थँक्स, दाण्याच्या कुटाने छान लागतात, पण प्रत्येकाची आवड वेगळी
मृणाली, चिन्नु, अंजुताई, अनु थँक्स
म्हाळसा, नक्की करुन बघा अन सांगा कसे वाटले.
मंजूताई, भाकरी अन रस्सा दोन्ही मम्मीने केलाय. तिच्याकडुनच शिकलेय मी भाकरी (रादर तेव्हढेच जमते मला) पण हल्ली मी आराम मोडवर आहे सो आयते खातेय सगळे
DJ.. , टिकायला टिकतो वर्षभर कोल्हापुरी मसाला, पण चव टिकवायची असेल तर नुसती मिरची दळुन आणायची अन दर ४ महिन्याने त्यात मसाला मिसळायचा.
भरत थँक्स
<<<२-३-४ ही वाटणं एकत्र वाटली किंवा केली तर काय बिघडेल?>>> तसे काही बिघडणार नाही पण शक्यतो किमान सारणात तरी वेगवेगळेच परतत मिक्स करायचे, त्यामुळे स्वादात फरक पडतो. प्रत्येकाची चव वेगळी आहे म्हणुन आधी तिळ खसखस मग खोबरे अन शेवटी दाणे असे तेलात परतले की प्रत्येक पदार्थाची वेगळी चव खाताना थोडी जाणवते ( हा प्रकार माझी मम्मा चिकन मटणाला पण करते अन तिचे बघुन मी पण, तरिही तिच्यासारखे चिकन मटण काही जमत नाही, चव कितीही चांगली असली तरी वाटते कि वो बात नही )
अजुन एक वर सांगीतलेल्या
अजुन एक वर सांगीतलेल्या रस्स्यात, मोदकाची ऊकड काढतो तसे ऊकड काढायची अन ती थोडी गार झाली की शेव साच्यात घालुन ऊकळत्या रस्स्यात डायरेक्ट शेव सोडायची. मस्त लागते.
लहान असताना मी अन भाऊ गांडुळ रस्सा म्हणुन खायचो. यम्मी लागतो एकदम
DJ खरंच सरंजामी प्रकार आहे.
DJ खरंच सरंजामी प्रकार आहे. अवघड आहे तसं ते. पण व्हीबी मुंबईत करू शकत असतील तर शक्य होईल का करायला पहावं लागेल.
अमेझॉनवर मगन का कोणतं तरी कोल्हापूरी तिखट मागे पाहिलेले, पण करंटली अन् अव्हेलेबल असते ते नेहमी.
झणझणीत अगदी!
झणझणीत अगदी!
व्ही बी झणझणीत मस्त भरले
व्ही बी झणझणीत मस्त भरले गोळ्यांची आमटी .. आणि तुमची वर्ल्ड फेमस भाकरी..
मी उद्या नुसतेच गोळे बेक करून खाणार ( सारणामध्ये थोडी लसूण घालणार )
क्या बात व्ही बी... व्हेज
क्या बात व्ही बी... व्हेज वाल्यांसाठी तुमचा आणि म्हाळस यांचा धागा वरदान आहे..
मस्त आहे हे
मस्त आहे हे
हे तयार खायला मिळालं तर किती
हे तयार खायला मिळालं तर किती भारी वाटेल!
पण तसे होणार नाही आणि एक तासाइतका पेशन्स टिकेल का शंका येतेय.
आमटीतले मोदक खाल्लेत, मस्त लागतात
जबरदस्त !
जबरदस्त !
मस्त झणझणीत . म्हाळसा यांची
मस्त झणझणीत . म्हाळसा यांची आणि आता तुमची ही रेसिपी बघून करायचं नक्की केलय.
मस्त झणझणीत. व्हि बी, तुमची
मस्त झणझणीत. व्हि बी, तुमची आणी म्हाळसाची कृती दोन्ही करुन बघाव्या लागतील. गौरी- गणपतीत गोड खाऊन जाम कंटाळा आलाय.
डिजे, तुम्ही डिट्टेल लिहीलत. कांदा लसुण मसाला बर्याच कंपन्यां चा आहे, पण खुद्द कोल्हापूर मध्ये शेतकरी बाजारचा अस्सल आहे असे म्हणतात. पण खरय कोल्हापूर, सांगली, कर्हाड व सातारा येथले जेवण् अप्रतीम चवीच असते.
पण खरय कोल्हापूर, सांगली, कर्
पण खरय कोल्हापूर, सांगली, कर्हाड व सातारा येथले जेवण् अप्रतीम चवीच असते.>> धन्स रश्मी..वैनी . आपल्या घरच्या मसाल्याच्या रोज रोजच्या चवीमुळे दुसर्यांच्या घरच्या मसाल्याची चव भारी लागते हे वास्तव आहे. आम्हाला सुद्धा नगर, सोलापुर, नागपुरी, खानदेशी, मालवणी चवी भयानक आवडतात
बदलून असे का दिसतेय?
बदलून असे का दिसतेय?
मी तर काहीच बदल केला नाही
मी बदल केला आहे. मायबोलीवर
मी बदल केला आहे. मायबोलीवर एक नवीन सुविधा दिली आहे आणि तुमची पाककृती याची चाचणी करण्यासाठी वापरली आहे (चाचणी यशस्वी झाली) याबद्दल लवकरच घोषणा करतो.
Ok, थँक्स सांगितल्याबद्दल
Ok, थँक्स सांगितल्याबद्दल
आज मोदक आमटी केली होती.अगदी
आज मोदक आमटी केली होती.अगदी तंतोतंत कृती फॉलो केली. आमटी तले मोदक मस्त लागतात. रस्सा जरा पातळ झाला.आधी बरोबर झाला होता.मग वाटले तीळ,खोबरे वगैरेंनी आळेल म्हणून पाणी घातले.तिखट आणि तेल जरा कमीच झाले.
धन्यवाद तुला आणि मम्मीला.