तुम्ही जर कार्पोरेट नोकरी करत असाल तरच या पुढे वाचा. हे माझे कॉर्पोरेट जगतातील तीस वर्षाचे अनुभव आहेत. लक्षात ठेवा कुठली ही कंपनी तुम्हाला नौकरी वर ठेवताना चॅरिटी म्हणून ठेवत नसते. तुम्ही जर नोकरी करत असाल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःला इंडिव्हिज्युअल प्रॉफिट सेंटर समजले पाहिजे.
म्हणजे काय याचा अर्थ? याचा अर्थ असा की जर तुम्ही कंपनी च्या गोल प्रमाणे उत्तम सेवा दिली आणि तुमच्यामुळे जर कंपनीला फायदा होत असेल तर तुम्हाला अधिक पैसे मिळतील. मात्र याबद्दल तुमच्या आणि तुमच्या मालक/कंपनी/ बॉस यांच्यात एक सहमती हवी नसता तुम्ही करोडोचा बिजनेस कराल आणि मालक तुम्हाला हजार हातात देईल. होय हे पण मी पाहिले आहे.
आजच्या जमान्यात आयुष्यभर एकच नोकरी, कंपनीशी लॉयल्टी वगैरे गोष्टी मिथ्या आहेत. कंपनी तुम्हाला कधीही नोकरी वरून काढू शकते कारण जर बिझनेस नसेल तर फुकट पगार कोण देईल?
नोकरी करताना तुमच्या वाचून कंपनीचे काही अडेल असा जर कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो आधी मनातून काढून टाकावा. Everybody is replacable.
"काम करी दाम" सारखेच तुमच्यात दम असेल तर "दाम देईल त्याचे काम" हा माझा नवा मंत्र लक्षात घ्या. विचार करा मी काय म्हणतोय ते.
कुठल्या ही बिजनेस मध्ये निगोसिएशन असते. तुम्ही देखील तुमच्या स्किल प्रमाणे तुमचा रेट ( पगार) ठरवला पाहिजे. मी या खाली येणार नाही कारण मी उत्तम सर्व्हिस देतो हे जर तुम्हाला ठाम माहित असेल तर तुम्हाला बेस्ट लोक हायर करतील (ज्यांना आपण पे मास्टर म्हणतो).
पुन्हा एकदा सांगतो "दाम देईल त्याचे काम" हा मंत्र लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे बिजनेस चॅरिटी करत नाही तसंच विनाकारण कमी पगार घेऊन तुम्ही पण चॅरिटी करू नका. हैं हिम्मत तो कर गंमत. आरामाची सवय असलेल्या किंवा पाट्या टाकणारे लोकांना माझं म्हणणं पटणार नाही कारण ते यामध्ये अनेक खुस्पटे काढतील अर्थात त्यांचे देखील बरोबर आहे कारण नो वन सोलुशन फिट्स ऑल.
नोकरीत असूनही जोपर्यंत स्वतःच्या स्किल ला तुम्ही एक बिजनेस म्हणून बघत नाही आणि एक प्रोफेशनल म्हणून तुम्ही काम करत नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही. बघा विचार करा.
गुडलक.
#कार्पोरेट_जगात
दाम देईल त्याचे काम
Submitted by सखा on 24 August, 2020 - 01:18
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पटतंय.
पटतंय.
सहमत
सहमत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही है। कोरपोरेट मध्ये
सही है। कोरपोरेट मध्ये सुरुवात चे 6 वर्षे काम केले आहे.
चांगले समजावले आहे सोप्या शब्दांत.
Thank you!
Thank you!
खरे आहे. सुरुवातीला मला जास्त
खरे आहे. सुरुवातीला मला जास्त किंवा योग्य तो पगार मागणे शक्य व्हायचे नाही. पण नंतर लक्षात आले की कामे तर खूपच करावी लागतात. त्या पेक्षा पगार फार कमी असला तरी तो भराभर वाढेल असेच काही नाही.
चांगला लेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विशेषतः फ्रेशर्ससाठी अतिशय
विशेषतः फ्रेशर्ससाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा.
विशेषतः फ्रेशर्ससाठी अतिशय
विशेषतः फ्रेशर्ससाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा>>> बरोबर आयटी क्षेत्रामध्ये सर्वात जास्त एक्स्प्लोईटेशन याच सेगमेंट चे होते.