
आवरण : 1 वाटी बारीक रवा, सवा वाटी पाणी, 1 चमचा तूप, पाव चमचा मीठ
सारण : 1चमचा तूप, खवलेला नारळ 2 वाटी, गूळ 1 वाटी, 2 चमचे खसखस किंवा पांढरे तीळ(यापैकी एक), आवडी नुसार काजू, बदाम, पिस्ता यांची जाडसर भरड
"आळस ही शोधाची जननी आहे ( said by someone like me)
मला विकतची तांदूळ पिठी वापरायला risky वाटते (मोदक नाही वटले तर), तसेच तांदूळ धुवून सुकवून पिठी करायचा कंटाळा व आळस
मी नेहमी कारण सांगायचे सासूबाईंना कि तांदूळ पिठी नाहीये वगैरे. त्या म्हणायच्या कि अग रव्याचे कर चांगले होतात, पण कधी केले नव्हते. काल नैवेद्याला मोदकचं हवे होते, त्यात जिकडे तिकडे मोदकाचे फोटो.. मग घेतला मनावर"
कृती अगदी तांदूळ उकडी प्रमाणे आहे फक्त तांदूळ पीठी ऐवजी रवा.
कृती:
1. सवा वाटी पाणी उकळत ठेवावे, त्यात तूप मीठ घाला. पाण्याला चांगला उकळा आला कि गॅस फ्लेम लो करा.
2. हळूहळू रवा सोडा व कलथ्याने हलवत राहा.
3. गॅस बंद करून झाकण ठेवा. 15-20 मिनिट सेट होऊ द्या.
4. तोपर्यंत सारण करून घ्या. कढई मध्ये चमचाभर तुपात ड्रायफ्रूटस भरड परतून घ्या, तीळ किंवा खसखस घाला, त्यातच गूळ घाला.
5. गूळ विरघळला कि खवलेला खोबरं घाला.
6. खोबऱ्याचा पाणी सुके पर्यंत परतत राहा.
7. वेलची जायफळ पूड घालून गॅस बंद करा.
8. रव्याची उकड जरासा पाण्याचा हात लावून मळून घ्या. अगदी मऊ शिजलेली असते अजिबात वेळ नाही लागतं मळायला.
9. आता हवे तसें मोदक वळा.
10. 5 मिनिट वाफवून घ्या.
चवीला अगदी तांदुळासारखे लागतात. कळणारही नाही खाऊन कि रव्याचे आहेत.
कलर किंचित पिवळसर येतो रव्यामुळे
मापात पाप करु नका.. रवा आणि पाणी प्रमाण
छानचं दिसत आहेत वर्णिता..
छानचं दिसत आहेत वर्णिता.. केसर घातली आहे का?
बेस्ट होतात....
बेस्ट होतात....
केसर घातली आहे का? <<< केशरी
केसर घातली आहे का? <<< केशरी रंग
आज केले
आज केले
अप्रतिम. आकार जमलाय सुंदर.
अप्रतिम. आकार जमलाय सुंदर.
ही रेसिपी वापरून नो खिटपीट
ही रेसिपी वापरून नो खिटपीट मोदक झटपट झाले. खूप खूप आभार या रेसिपीसाठी.
(No subject)
मस्त दिसत आहेत मोदक वंदना
मस्त दिसत आहेत मोदक वंदना
आज पुन्हा.. Saffron variation
आज पुन्हा.. Saffron variation..
Pages